शिक्षकांचे पगार शालार्थ वेतन प्रणाली मधून होतात.पण आज जवळपास सहा सात वर्षे ही प्रणाली अस्तित्वात येवुन ही केवळ ऑनलाईन बिले बनवणे याच्यापुढे या प्रणालीचा थेट फायदा शिक्षकांना झाला नाही.उलट ONLINE व OFFLINE डबल बिले देण्याचा व्यापच वाढला आहे.शिक्षकांचे वेतन नियमित महिन्याच्या 1 तारखेला होण्यासाठी शालार्थ प्रणालीत आवश्यक बदल करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे भेट घेवून केली.यावेळी शालार्थ प्रणालीतील सुधारणे बाबत सविस्तर निवेदन देण्यात आले.