महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली कडून मा.ना. हसन मुश्रीफ साहेब, ग्राम विकास मंत्री महाराष्ट्र शासन यांना शिक्षण सेवक पद्धत बंद करणे व शिक्षणसेवक मानधन वाढ करणेबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली कडून निवेदन देण्यात आले.लवकरच याबाबत निर्णय घेवू असे आश्वासन यावेळी ग्रामविकास मंत्री महोदयांनी दिले.
यावेळी दिलेल्या निवेदनात नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शिक्षण सेवक पद्धती बंद करण्याबाबत शिफारस करण्यात आली असून त्यानुसार आपल्या राज्यातील शिक्षण सेवक पद्धत बंद करण्यात यावी.त्याचवेळी याबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत शिक्षणसेवकाना १ जानेवारी २०१६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने भरीव मानधन वाढ देण्यात यावी.अशी मागणी करण्यात आली.
२००० साली शिक्षण सेवक पद्धत लागू करण्यात आली.त्यानंतर १७ सप्टेंबर २०११ रोजी शासनाने मानधन वाढ केली. यामध्ये प्राथमिक शिक्षण सेवक ६००० रुपये,माध्यमिक शिक्षण सेवक ८०००रुपये,उच्च माध्यमिक शिक्षणसेवक ९०००रुपये करण्यात आले.जवळपास नऊ वर्षे त्याच मानधनावर शिक्षण सेवक आजही काम करत आहेत.वाढलेल्या महागाईमध्ये कौटुंबिक जबाबदारी पार पाडणे इतक्या तुटपुंज्या मानधनात मध्ये जिकिरीचे बनले आहे.सध्या शिक्षण सेवकांना मिळणारे मानधन किमान वेतन कायद्याने निर्धारित केलेल्या किमान वेतानापेक्षा कमी आहे.रोजगार हमी कामावर काम करणाऱ्या मजुरापेक्षा कमी मानधन राज्यातील शिक्षणसेवकाना मिळत आहे.याकडे लक्ष वेधण्यात आले.
दिनांक 24 फेब्रुवारी 2020 रोजी माननीय शिक्षण संचालक यांनी शिक्षण आयुक्त साहेबांना दिलेल्या पत्रामध्ये शिक्षण सेवकांचे मानधन वाढ दुप्पट करण्याबाबत शिफारस केली आहे. वाढलेल्या महागाईचा विचार करता ही वेतन वाढ अपुरी आहे.पण वाढत्या महागाईत शिक्षणसेवकाना तात्काळ मानधन वाढ देणे गरजेचे आहे.तरी राज्यातील शिक्षणसेवकांची 1 जानेवारी 2016 पासून पूर्वलक्षी प्रभावाने मानधन वाढ करण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेवून शिक्षणसेवकाना दिलासा देण्याची विनंती करण्यात आली.निवेदनावर जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे,सरचिटणीस राहुल कोळी,कार्याध्यक्ष विरेश हिरेमठ,कोषाध्यक्ष राजकुमार भोसले,कार्यवाहक नेताजी भोसले यांनी स्वाक्षरी केली आहे.
खुप खुप धन्यवाद! शिक्षणसेवकांचा प्रश्न संघटना वारंवार तळमळीने मांडते.त्यासाठी मनापासुन धन्यवाद. कोरोनाच्या या संकटाच्या काळात घरापासून शेकडो किलोमीटर दुर घर चालवणे खरच जिकिरीचे झाले आहे.त्यामुळे शिक्षणसेवक बंद झालेच पाहिजे.तात्काळ मानधनवाढ झाली पाहिजे.
ReplyDeleteसर नक्कीच आम्ही जिल्हा स्तरावर चळवळीतून काम करत आलेले आहोत.प्रश्न अत्यंत महत्त्वाचा व तो सुटणे गरजेचे आहे.आशा वेळी पुढे काय होईल याचा विचार न करता आपली समस्या मांडायची व ती सोडवण्यासाठी आग्रही रहायचे हे आपले कर्तव्य या भावनेतून काम करत राहू...सगळेजण मिळून लवकरच या लढ्यात यशस्वी होऊ हा विश्वास आहे....
DeleteThis comment has been removed by the author.
Deleteशिक्षण सेवकांच्या मानधन वाढीसाठी साठी आपली संगठना नेहमी पाठपुरावा करत आहे त्याबद्दल संगठणेचे खूप खूप आभार सर! अजुन असाच पाठपुरावा करून आम्हाला मानधन वाढ मिळवून द्यावी व आमचे या महागाईच्या काळात होणारे हाल थांबवावे ही नम्र विनंती.
ReplyDeleteआपण सर्वजण प्रयत्न करू मी किंवा इतर कोणी असे नाही तर आपण सर्वजण मिळून नकीच यश मिळवू.
ReplyDeleteयूट्यूब वरील व्हिडिओ बघितला, आम्हा शिक्षण सेवकांच्या दृष्टिकोनातून विचार करून आमच्या अडचणी समजून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल धन्यवाद, असेच प्रयत्नात रहा सर🙏🙏🙏
ReplyDelete