होय आम्ही वेडे आहोत..


सर्व ज्येष्ठ बंधू भगिनी व डीसीपीएस धारकांनी उद्याच्या आंदोलनात मोठ्या ताकतीने सहभागी व्हावे ही नम्र विनंती..

होय आम्ही वेडे आहोत.....

पण प्रामाणिक आहोत ध्येयासाठी.....

कोण साथ देईल,कोण देणार नाही,किती नेते कार्यकर्त्यांना सांगलीस आणण्यासाठी नियोजन करतील,त्यासाठी ताकत लावतील माहीत नाही...
पण आम्ही आमचे कर्तव्य पार पाडूच...

आंदोलन स्थळी नसो सतरंजी नसो मंडप ... पण असेल असतील आमच्या टोप्या व आमची डोकी.....जी घडवतील इतिहास....

मित्रानो काल सकाळी शाळा,दुपारी जत,संध्याकाळी येवून निवेदन,जिल्ह्यातील सर्वांचे फोन रिसिव्ह करत आंदोलनासाठी आवाहन करायचे,त्यानंतर आज सकाळी लवकर शिक्षक बँक सभा,त्यानंतर शेवट पर्यंत बदली समुपदेशन साठी उपस्थित व आता पुन्हा उद्यासाठी जागृती.उद्या सर्वात आधी सांगलीत जाऊन इतर तयारी.धरणे आंदोलन,निवेदन देणे,माध्यमांना प्रेस नोट,त्यानंतर पुन्हा उद्यासाठी आभार.व पुढील आंदोलनाची तयारी...हो आमच्याकडे वेळ आहे..नव्हे तुम्ही दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करायचा एवढेच....मी नाही तर आपली टीम याप्रमाणे कार्य करत आहे...मग आपण काय करणार???साथ देणार की घरी बसणार???

महिला भगिनींना एक नम्र निवेदन  कृपया राग येवू देवू नका व आला तर आपले भाऊ समजून माफ करा...जो पर्यंत आपण या लढ्यात सक्रीय होत नाही तोपर्यंत हा लढा 100 टक्के यशस्वी होणार नाही....

आपण आपल्या अधिकाराबाबत जागरूक असतो मग पेन्शन बाबत का उदासीन...कृपया ना मुंबई,ना नागपूर,सांगली ही अनेकदा चुकवली...आता पुन्हा आलेली संधी चुकवू नका...

सांगलीला उद्या येताना 100 कामे घेवून आला तरी वेळ पाळू, 11 ते 2 केवळ आंदोलनासाठी राखीव ठेवू....

शिस्त पाळू....

आपली टोपी सोबत आणु....टोपी छापील नसली तरी आहेराच्या घरात असतील तेवढ्या टोप्या पिशवीत टाकून आणा आम्ही छपाई करून देवू....

फोटो सेशन टाळूया...समूहात आल्यानंतर आपले वेगळेपण टाळू...घोषणा ताकतीने देवू...मिळेल त्या जाग्यावर बसू...कपडे खराब होतील म्हणून बसायला टाळायला नको....पाऊस आला तर लगेच निवारा शोधायला पसार व्हायला नको....उन ,वारा,पाऊस काहीही असो आता कर्मचारी आपली शिस्त व ताकत दाखवतील.....

निश्चित हे सगळे सांगण्याचा आम्हाला अधिकार नसेल पण तुमच्यासाठी नसेल पण आमच्यासाठी एक दिवस तीन तास द्या....नक्कीच आपला वेळ सदुपयोग लावू....

यापूर्वी आपल्यातील काही जन आले तर खालील बाबी घडल्या...👇

मृत DCPS धारकांना 10 लाख मदतीचा शासन आदेश निघाला...

23/10 शासन आदेश रद्द झाला...

शासन हिस्सा 10 वरून 14 टक्के झाला....

विकल्प निवडीत संधी मिळून 1000बेसिक वाढ मिळाली.....

शिक्षक बँकेने DCPS सभासद मृत झाल्यास 2 लाख ज्यादा मदत देण्याचा निर्णय घेतला....

अजुन ही अनेक बाबी घडल्या व घडतील आपल्या एकजुटीने....

चला एक होऊया...उद्या सांगली मध्ये....

काही चुकले असेल तर माफ करा....

पण उद्या थांबू नका...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सदैव आपला

अमोल शिंदे
जिल्हाध्यक्ष 
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली
9420453475
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सकाळी 11 वाजता 
जिल्हा परिषद सांगली समोर.....

No comments:

Post a Comment