जिल्हा परिषदेच्या वेतन निश्चिती बाबत प्रशिक्षणात वेतन निश्चिती एक्सेल टूल सादर......




आज जिल्हा परिषदेमध्ये वसंतदादा सभागृहात सातवा वेतन आयोग वेतन निश्चिती व वेतन पडताळणी याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले साहेब यांच्या उपस्थितीत पार पडली. वेतन निश्चिती व वेतन पडताळणी बाबत लेखाधिकारी उत्कर्ष कवठेकर साहेब यांनी सखोल मार्गदर्शन केले.यातून उपस्थितांच्या वेतन निश्चिती बद्दल असणाऱ्या अनेक शंका दूर झाल्या.

याच कार्यशाळेत पी. डी. शिंदे सर यांनी शिक्षकांच्या  वेतन निश्चिती साठी  तयार केलेले एक्सेल शीट सादर करण्याची संधी जिल्हा प्रशासनाने दिल्याबद्दल आदरणीय अभिजीत राऊत साहेब यांचे मनःपूर्वक धन्यवाद.

अत्यंत सहजतेने हाताळता येणारे.तसेच केवळ आपले नाव,शाळेचे नाव,कार्यालयाचे नाव,1जानेवारी 2016 रोजी चे बेसिक व ग्रेड वेतन एवढ्याच बाबी इनपुट मध्ये भरल्यास वेतन निश्चिती जोडपत्र,विकल्प,मान्यता पत्र,1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 अखेर फरक,तसेच 1 जानेवारी 2019 ते 28 फेब्रुवारी 2019 अखेर रोखीने पगारातून दिला जाणाऱ्या फरक बिलाचे स्टेटमेंट केवळ काही सेकंदात करता येते.अगदी कोणालाही सहजतेने या एक्सेल शीट चा वापर करता येतो.

1 जानेवारी 2016 नंतर चटोपाध्याय वेतनश्रेणी अथवा पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चिती साठी एक स्वतंत्र एक्सेल शीट ही बनवली असून त्यामध्ये आपण वरील माहिती सोबत वरिष्ठ वेतन श्रेणी मिळाल्याचा केवळ दिनांक टाकल्यास आपली वेतन निश्चिती जोडपत्र,विकल्प,मान्यता पत्र,1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 अखेर फरक,तसेच 1 जानेवारी 2019 ते 28 फेब्रुवारी 2019 अखेर रोखीने पगारातून दिला जाणाऱ्या फरक बिलाचे स्टेटमेंट केवळ काही सेकंदात तयार होते.

आम्ही काही उदाहरणे घेवून वेतन निश्चिती करून पडताळणी केली असता आकडेवारी अचूक येते याचा प्रत्यय आला आहे.सर्वच उपस्थित व उत्कर्ष कवठेकर साहेब यांनी पी. डी.शिंदे सर यांचे कौतुक केले.पी. डी.शिंदे सरानी एक्सेल शीट  लेखाधिकारी उत्कर्ष कवठेकर साहेब यांच्याकडे सुपूर्द केली आहे.त्याद्वारे होणारी आकडेमोड तपासल्यानंतर ती आपल्याला उपलब्ध होईल.

वेतन निश्चिती एक्सेल शीट करण्यासाठी P.D.शिंदे सर यांनी मेहनत घेतली.सरानी वेतन एक्सेल उत्तम तयार केली त्याबद्दल P.D.शिंदे सरांचे अभिनंदन व मनःपूर्वक धन्यवाद. तसेच ही एक्सेल शीट तयार करत असताना विविध शासन आदेश,नियम,वेतन निश्चिती पद्धती याबाबत अनेक जाणकार मंडळीनी मदत केली .राजकुमार भोसले सर यांची सोबत व अन्य विभागातील काही अधिकारी मित्रांनी यास केलेले मार्गदर्शन महत्वाचे होते.पुनश्च एकदा पी. डी.शिंदे सरांचे अभिनंदन व धन्यवाद..

लवकरच आपल्या सर्वांना एक्सेल शीट उपलब्ध होईल.त्याची आपल्याला मदत होईलच.पण आपणही आपली वेतन निश्चिती व विकल्प कसा निवडावा हे समजून घ्या.अत्यंत सोपी असणारी ही बाब असून 20 फेब्रुवारी 2019 चा शासन आदेश व 30 जानेवारी 2019 ची अधिसूचना सर्वांनी वाचावी.आपल्याला सर्व बाबी ज्ञात होतील.स्वतः सजग व सक्षम बनुया

आपला
अमोल शिंदे
जिल्हाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली

9420453475
सादरीकरण करताना P.D.शिंदे सर


No comments:

Post a Comment