महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनची विश्वस्तमंडळाची बैठक योजना भवन सांगली येथे संपन्न




रविवार दिनांक 5मार्च 2017
स्थळ ÷ योजना भवन सांगली

रविवार दिनांक 5मार्च 2017  रोजी संघटनची विश्वस्तमंडळाची बैठक योजना भवन सांगली येथे राज्याध्यक्ष वितेशजी खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली व राज्यसरचिटणीस गोविंद उगले सर व कार्याध्यक्ष सर्जेराव सुतार सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.याबैठकीस राज्यभरातून महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनचे विश्वस्त उपस्थित होते.

अत्यंत सकारात्मक झालेल्या बैठकीत सर्व विश्वस्त मंडळाने प्रशासकीय,न्यायिक व आंदोलनात्मक या तिन्ही मार्गाने जुन्या पेंशनचा लढा लढत जुन्या पेंशनचे ध्येय गाठन्यासाठी राज्यातील सर्व तरुण कर्मचाऱ्याना एकवटुन लढा अधिक व्यापक करत.संघटन रजिस्ट्रेशन प्रक्रिया प्रस्ताव सांगली येथुन दाखल करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केली.

  बैठकितील खालील विषयाबाबत चर्चा करण्यात येवून काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले..

1.अर्थसंकल्पिय अधिवेशनावर एकदिवसीय उपोषण
यामध्ये विश्वस्त,राज्यकार्यकारनी व जिल्हाध्यक्ष उपस्थित रहातील.लवकरच राज्याध्यक्ष याबाबत तारीख व नियोजन जाहिर करतील.

2.संघटन च्या राज्यापासून तालुका पदाधिकाऱ्याने  इतर कोणत्याही इतर संघटनेचे पद त्याने घेवू नये. असल्यास सदर एका पदाचा राजीनामा देवून कोणतेही एकपद कायम ठेवावे.

3.सर्व विश्वस्त मंडळाने सूक्ष्म चर्चा करत संघटनेची घटना व रचना याबाबत नियमावली तसेच प्रत्येक पदाधिकारी यांची कर्तव्ये निश्चित केली.

4.whats app group वर  चर्चा करताना सुसंबंध व विषयकेंद्रित चर्चा करने.तसेच ग्रुपवर वैयक्तिक चर्चेस निर्बंध घालण्यात आले असून.पेंशन प्रश्नाबाबत प्रचार व प्रसारावर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

5.संघटन सभासद वर्गणी 300 रूपये निश्चित करुन अधिकाधिक सभासद नोंदणी करण्याचे ठरले असून प्रत्येक dcps धारकाने आपल्या तालुका अध्यक्षाना सहकार्य करत.संघटनेच्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.

6.संघटनचे राज्यअशिवेशन श्रीरामपुर येथे अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत घेन्याबाबत चर्चा झाली.याबाबत दिनांक व पुढिल घोषणा अर्थसंकल्पिय अधिवेशनानंतर राज्यकार्यकारणी जाहिर करेल.

7.राज्यातील प्रत्येक dcps धारकाच्या न्याय हक्कासाठी संपुर्ण महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन सदैव लढन्यास सज्ज असेल..

8.आज पर्यन्त स्वखर्चाने अनेक तालुक्यापासून जिल्हा राज्यस्तरावर संघटनचे कार्यकर्ते जुनी पेंशनचे ध्येय घेवून वाटचाल करत असून आजच्या बैठकीत हार तुरे स्वागत या सर्व बाबिना फाटा देत विषयकेंद्रित बैठक घेण्यात आली.

9. याबैठकीत जुनी पेंशन हक्क संघटनवर निस्सीम विश्वास असणाऱ्या प्रत्येक dcps धारक बन्धु भगिनींने संघटनेत सक्रिय सहभाग घ्यावा हे संघटन आपल्या सर्वांचे असून याची दिशा निश्चित करताना आपले मार्गदर्शन व बहुमूल्य सहभाग नोंदवावा.

10.संघटनेच्या कार्यकारी मंडळात काही सुक्ष्म बदल झाले असून त्याबाबत राज्याध्यक्ष व सरचिटणीस स्वतंत्र पोस्ट करुण माहिती देतील.

11.एका ऐतिहासिक लढ्याचि सुरवात आपन केली असून निश्चितच आपल्या ध्येयापर्यन्त पोहचन्याचा दृढ़ विश्वास सर्वाणी व्यक्त केला.(यावेळी नंदुरबार/धुळे पतपेढ़ी निवडणुकीस उभे असणारे राहुल पवार सर नंदुरबारहुन सांगली येथे हजर होते.यश अपयश याची तमा न बाळगता dcps धारकांच्या हक्कासाठी प्रस्थापितांशी लढण्याची धमक दाखवणाऱ्या पवार सराना सर्वानी शुभेच्छा दिल्या.)

एका जोषपूर्ण  निर्धाराने आजची बैठक संपन्न झाली.

आपले,
राज्याध्यक्ष व सरचिटणीस
महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन

सांगलीला आपन सर्व आलात कोणतेही नियोजन अथवा विशेष व्यवस्था न करता ही आपण सर्वानी ज्या उत्साहाने या बैठकीत सहभाग घेतलात.व आम्हास नियोजनात पुरेपूर सहकार्य केले राज्यकार्याध्यक्ष सर्जेराव सुतार सर, किशोर कांबळे सर यानी जी मेहनत घेतली त्याबद्दल सांगली जिल्हा महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन कडून आपना सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद

🖋 शब्दांकन  ✒
अमोल शिंदे
जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन सांगली...
9420453475

No comments:

Post a Comment