सातवा वेतन आयोग वेतन निश्चिती एक्सेल शंका समाधान-


नमस्कार,
मी परशुराम शिंदे. उपशिक्षक जि.प.प्रा शाळा कौठुळी ता.आटपाडी जि. सांगली. काल आपल्यापर्यंत आलेल्या वेतन निश्चिती एक्सेल फाइल वापरासंदर्भात असंख्य मेसेज व ईमेल आले आहेत त्यासंदर्भातील आपल्या शंकांना उत्तरे देण्याचा हा प्रयत्न. काल आपल्याला मिळालेल्या एक्सेल फाईल मध्ये काही किरकोळ त्रुटी राहिल्या होत्या त्या त्रुटी आता दुरुस्त केलेल्या आहेत व अचूक फाईल देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याकडे असलेल्या कालच्या फाईल डिलिट कराव्यात व खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून नवीन फाईल डाउनलोड कराव्यात ही विनंती. 

http://www.pdshinde.in/?m=1

तत्पूर्वी काही बाबी आपण लक्षात घेणे महत्त्वाचे आहे त्या खालील प्रमाणे.

१) सदर फाईल संगणकावरच पहावी. ती युनिकोडमध्ये तयार केलेली असल्यामुळे विंडोज एक्सपी वर व्यवस्थित ओपन होत नाही. तेव्हा संगणकावरील विंडोज 7 किंवा त्यापुढील व्हर्जन वर फाईल व्यवस्थित ओपन होईल.

२) जर आपल्याला मोबाईलवर फाईल ओपन करायचीच असेल तर डाउनलोड केलेली एक्सेल फाईल मोबाईलच्या WPS ऑफिस मध्ये अजिबात ओपन करू नये. त्यासाठी प्ले स्टोअर वरून मायक्रोसोफ्ट एक्सेल नावाचे ॲप डाऊनलोड करावे व त्यामधून फाईल ओपन करावी. कारण संगणकाची सर्व सूत्रे WPS ऑफिस रन करत नाही. त्यामुळे कॅल्क्युलेशन होत नाही असा मेसेज बऱ्याच जणांचा येत आहे. मोबाईलवर मायक्रोसॉफ्ट एक्सेल इन्स्टॉल करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.

https://play.google.com/store/apps/dev?id=6720847872553662727

आता आपले काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहूया

शंका १) इन्क्रिमेंटचा डेट फॉरमॅट उलटा दिसत आहे.
उत्तर- हा दोष एक्सेल फाईलचा नसून जर आपण मोबाईल मध्ये फाईल ओपन करत असाल आणि आपण मायक्रोसोफ्ट एक्सेल ॲप इन्स्टॉल केले नसेल तर गुगलचा डिफॉल्ट डेट फॉरमॅट MMDDYYYY असा असतो. त्यामुळे इन्क्रिमेंट तारीख उलटी दिसत आहे. जर आपल्याला संगणकावरही हाच प्रॉब्लेम येत असेल तर आपल्या संगणकातील डेट फॉरमॅट DDMMYYYY अशा स्वरूपात सेट करावा.

शंका २) जुलैचा विकल्प निवडल्यास एक इन्क्रिमेंट जास्त येत आहे.
उत्तर- माहिती भरण्याच्या पानावर फक्त आणि फक्त 1 जानेवारी 2016 चाच ग्रेड पे व बेसिक टाकायचे आहे. जरी आपण जुलैचा विकल्प निवडला तरी जुलै महिन्यातील ग्रेड पे व बेसिक टाकू नये कारण जानेवारीची माहिती भरल्यानंतर जुलैची माहिती आपोआप तयार होईल अशी सोय केलेली आहे. आपण जुलै ची माहिती भरत आहात त्यामुळे एक इन्क्रिमेंट जास्त पडत आहे.

शंका ३) घरभाडे भत्ता ८ टक्के प्रमाणे दिसत नाही.
उत्तर- सातव्या वेतन आयोगात 8 16 व 24 टक्के प्रमाणे घरभाडे भत्ता १ जानेवारी दोन हजार एकोणीस पासून पुढे मिळणार आहे. याच्या अगोदर घरभाडे भत्ता सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे दिला जाणार आहे.

शंका ४) Without Pramotion या शीट मध्ये काही ठिकाणी आकडेमोड बदलत नाही.
उत्तर- तो दोष आता काढून टाकलेला असून वर दिलेल्या लिंक वरून सुधारित शीट डाऊनलोड करून घ्यावी.

शंका ५) वरिष्ठ वेतन श्रेणी लागू झाल्यावर एक इन्क्रिमेंट मिळायला पाहिजे होती ती या शीट मध्ये दिसत नाही.
उत्तर- वरिष्ठ वेतन श्रेणी अर्थात चटोपाध्याय वेतनश्रेणी ही अकार्यात्मक वेतन श्रेणी असल्यामुळे ही पदोन्नती नव्हे. त्यामुळे ज्या महिन्यात आपल्याला वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर होते त्या महिन्यात आपण फक्त S10 वरून S13 वर जाल, वेतनवाढ मिळणार नाही.

शंका ६) वाहन भत्ता व घरभाडे भत्ता एडीट करता येत नाही.
उत्तर- हा दोष देखील काढून टाकण्यात आलेला असून नवीन शीट मध्ये ही समस्या उद्भवणार नाही.

७) अंशदान पेन्शन कपातीचे आकडे फरक बिलात दिसत नाहीत.
उत्तर- ही कपात सर्वांना लागू नाही. तसेच काही काही तालुक्यात दोन हप्ते कपात होत आहेत. काही जणांची कपातच नाही त्यामुळे निश्चित सूत्र देता येत नाही. त्या ठिकाणी आपली कपात मॅन्युअली टाईप करावी.

शंका ८) पदोन्नती झालेली असून देखील बेसीक कमी दिसत आहे.
उत्तर- पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही शीट अचूक काम करत नाही. कारण पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यास एक इन्क्रिमेंट जास्त मिळत असते तसेच इन्क्रिमेंट तारीख बदलत असते. अशी सोय या एक्सेल मध्ये केलेली नाही. फक्त वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी मिळालेल्या शिक्षकांसाठी किंवा शिक्षकांच्या बरोबरीने वेतन बँड असणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांसाठी ही फाईल वापरता येईल.

याशिवाय आपल्या आणखी काही समस्या असतील किंवा शिट वापरत असताना अडचण येत असेल तर कृपया आपण माझ्या 9011116040 या व्हाट्सअप नंबर वर मेसेज पाठवा कोणीही फोन करू नये.

कृपया सदर मेसेज आपल्याकडे असणाऱ्या सर्व शैक्षणिक ग्रुपवर पाठवा जेणेकरून काल ज्यांना एक्सेल शीट वापरण्यात अडचण येत होती त्यांची अडचण दूर होईल.

No comments:

Post a Comment