शिक्षकांचे सर्व प्रलंबित प्रश्न सोडवन्यास आनंद वाटेल - शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात




जुनी पेन्शन शिक्षण सेवकांच्या मानधन वाढीची संघटन कडून आग्रही  मागणी

आज नागपूर येथे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन कडून मा.ना.एकनाथजी शिंदे,मा.ना. बाळासाहेबजी थोरात यांची भेट घेवून जुनी पेन्शन व शिक्षण विषयक प्रश्नाबाबत निवेदन देवून चर्चा करण्यात आली.यावेळी मा.आमदार रोहित दादा पवार,मा.आमदार विश्वजीत कदम साहेब,मा.आमदार मानसिंग भाऊ नाईक,मा.आमदार विक्रमदादा सावंत,मा.शिक्षक आमदार विक्रम काळे,मा.आमदार भारत नाना भालके,खा.हेमंत गोडसे यांची ही भेट घेवून चर्चा केली.

यावेळी शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या  प्रलंबित प्रश्नासंदर्भात निवेदन देण्यात आले.यावेळी प्रामुख्याने जुनी पेन्शन व शिक्षण सेवकांच्या मानधन वाढीची आग्रही मागणी केली. शिक्षण मंत्री महोदयांनी सर्व मुद्द्यांची माहिती घेवून सकारात्मक कार्यवाही केली जाईल.शिक्षण सेवक मानधन वाढीसाठी वित्त विभागासोबत चर्चा केली जाईल असे सांगितले.खरेतर सरकार स्थापन होऊन खूप कमी दिवस झाले आहेत.आजची भेट ही प्राथमिक होती.पुन्हा एकदा पेन्शन लढा निर्णायक करण्यासाठी पूर्वतयारी करण्याचा आजचा दिवस.उद्याही पाठपुरावा सुरू राहील...

शिक्षण मंत्री महोदयांना दिलेले निवेदनातील मुद्दे

1. जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी.

2. शिक्षण सेवक पद्धती बंद करण्यात यावी व सध्या कार्यरत असणाऱ्या शिक्षण सेवकाना मानधन प्रतिमाह एकवीस हजार रुपये करण्यात यावे.

3.सातव्या वेतन आयोगातील शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणी बाबत त्रुटी दूर करण्यात याव्यात.

4. नवीन आश्वासित प्रगती योजना 10,20,30 शिक्षकांना लागू करण्यात यावी.

5.मृत कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान शासन निर्णयातील दहा वर्षाची अट रद्द करण्यात यावी.

6.बी. एल.ओ.सारख्या अशैक्षणिक कामातून शिक्षकांची सुटका करावी....

7.शालेय पोषण आहार योजनेत सुधारणा करून केंद्रीय स्वयंपाकगृह द्वारा पोषण आहार वितरित करण्यात यावा.

8.शिक्षण विभागांतर्गत रिक्त विस्तार अधिकारी,केंद्र प्रमुख,मुख्याध्यापक पदे तात्काळ भरण्यात यावीत.

यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन राज्याध्यक्ष वितेश खांडेकर,सरचिटणीस गोविंद उगले,राज्य कार्याध्यक्ष सर्जेराव सुतार,नागपूर विभागीय अध्यक्ष अशितोष चौधरी,विश्वास अमोल  शिंदे,नवनाथ धांडोरे,नदीम पटेल,शैलेश राऊत,कुणाल पवार,अनिल वाकडे,गुरुदेव नवघडे,बापू मुनघाटे,पुरषोत्तम हटवार हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment