जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी विधीमंडळात अनेक मान्यवरांच्या भेटी


नमस्कार सहकाऱ्यांनो..

                  आज महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या टीमचे नागपूर विधानभवन मंत्रिमंडळ भेटीगाठीचा दुसरा दिवस होता. सतत 2दिवस विधिमंडळ कामबंद नंतर आज तिसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात आमदार व मंत्र्यांच्या भेटी आपल्या टीमने घेतल्या.

मा. श्री. शरदचंद्र पवार साहेब यांची भेट.
             आजच्या दिवसाची सुरवातच मा. शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या भेटीने झाली. "देवगिरी" या उपमुख्यमंत्री यांच्या बंगल्यावर साहेबांची भेट घेण्यात आली. यावेळी आपला प्रश्न व त्यासंबंधी समाधानकारक चर्चेसाठी पुन्हा एकदा सविस्तर भेटीसाठी मुंबई किंवा दिल्ली येठे भेटीसाठी वेळ देण्यात येणार आहे. यासाठी काही दिवसांत शिष्टमंडळ पुन्हा भेटीसाठी जाणार आहे. यावेळी राज्याध्यक्ष श्री.वितेश खांडेकर, राज्यसचिव- श्री. गोविंद उगले, कार्याध्यक्ष श्री. रावसाहेब सुतार, सल्लागार श्री. सुनील दुधे, विश्वस्त श्री. कुणाल पवार, अमोल शिंदे, नवनाथ धांडोरे,मनीषा मडावी इत्यादी उपस्थित होते.

मुख्यमंत्री मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब भेट
             विधानभवनात मुख्यमंत्री दालनात आपल्या शिष्टमंडळाने अमरावतीच्या आमदार आदरणीय सुलभाताई यांच्या मदतीने भेट घेतली व साहेबांना निवेदन देण्यात आले. आजच्या मुख्यमंत्री भेटीसाठी महासचिव-श्री. गोविंद उगले , राज्यसहकार्याध्यक्ष- श्री.कुणाल पवार, अमरावती जिल्हाध्यक्ष-श्री. गौरव काळे, उपाध्यक्ष श्री. नामदेव मेटांगे,अमरावती विभाग सचिव-कासीम जमादार प्रज्वल घोम, इत्यादी उपस्थित होते.

मा. अजितदादा पवार साहेब यांची भेट
विधानभवन परिसरात मा. अजितदादा पवार यांनाही भेट दिली. यावेळी आपली मागणी रास्त आहे, आमची ही ईच्छा आहे तुमची मागणी पूर्ण व्हावी अशी परंतु आधी आम्हाला स्थिर होऊ द्या अशी टिप्पणी दादांनी केली.

मा. बाळासाहेब थोरात साहेब.
            मा. बाळासाहेब थोरात साहेब यांनाही प्रत्येक्ष भेटून निवेदन शिष्टमंडळाने दिले, साहेबांनी अतिशय सकारात्मक उत्तर दिले आहे. तसेच आम्ही नक्की यासाठी प्रयत्न करू असेही म्हटले आहेत.
            याबरोबरच मा. रोहितदादा पवार, मा. दिलीप वळसे पाटील साहेब,मा. बबनरावजी पाचपुते साहेब, मा. नवाब मलिक साहेब, मा. जितेंद्र आव्हाड साहेब, मा. धीरजदादा देशमुख मा. अनिलदादा पाटील, मा. खा. उन्मेषदादा पाटील यांच्यासह 25 ते 30 आमदार व सर्व शिक्षक पदवीधर आमदार यांच्याही भेटी शिष्टमंडळाने घेतल्या. यावेळी अधिवेशन अतिशय कमी कालावधीचे असल्याने अतिशय घाईगडबडीत सर्व मंत्री आमदार आहेत.  तरीही अत्यंत प्रयत्नाने मागील 2दिवसात अनेक महत्त्वाच्या भेटी झाल्या आहेत.पुन्हा उद्या राज्याध्यक्ष वितेश खंडेकर, नागपूर विभागीय अध्यक्ष आशुतोष चौधरी, राज्य सल्लागार सुनील दुधे सर भेटी घेणार आहेत. आज दिवसभर पडद्यामागे भूमिका बजावणारे यवतमाळ जिल्हाध्यक्ष श्री. नदीम पटेल, पुरुषोत्तम हटवार, हेमंत पारधी, शैलेश राऊत इत्यादी शिलेदार देखील उपस्थित होते. 

=============================
आपलाच
श्री. कुणाल मुरलीधर पवार
विश्वस्त व राज्यसहकार्याध्यक्ष- महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन, जळगाव.



No comments:

Post a Comment