का गरजेचे आहे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन??

1 मार्च वस्तीशाळा  शिक्षकांच्या जीवनात आनंद आणणारा सोन्याचा दिवस...त्यानिमित्ताने 

का गरजेचे आहे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन??

(सर्व नव्याने लागलेले शिक्षण सेवक बंधू भगिनी व आमच्यासारखे शिक्षण सेवक मधून DCPS बनलेले बंधू भगिनी यांनी जरूर वाचन करावे.)

शिक्षण सेवक व DCPS प्रश्न निर्माण झाले तेव्हा संघटना होत्या का??त्या कोणत्या होत्या??व आज प्रश्न निर्मिती नंतर 15 ते 20  वर्षे अजुन ही आमच्या अधिवेशन, मेळाव्याना या कशासाठी तर जुनी पेन्शन मिळवण्यासाठी....
खरेच असे करून मिळेलय पेन्शन??? या प्रश्नाची उत्तरे आपण शोधावित

मित्रांनो आज 1 मार्च वस्तीशाळा  शिक्षकांच्या जीवनात आनंद आणणारा सोन्याचा दिवस...त्यानिमित्ताने आपण सर्वांनी या आपल्या बांधवांच्या लढ्यातून  प्रेरणा घेवू वस्तीशाळा शिक्षकांचा आदर्श घेण्यासारखा आहे. जो पर्यंत वस्तीशाळा शिक्षक सेवेत कायम झाले नाहीत  तो पर्यंत त्या सर्वांनी नवनाथ गेंड सरांच्या नेतृत्वात स्वतंत्र अस्तित्व ठेवले.आणि कपिल पाटील साहेब यांनी हा लढा निर्णायक केला.त्यानंतर या प्रामाणिक शिलेदारांनी शिक्षक भारती चा झेंडा हातात अभिमानानं घेतला. एक अशक्य गोष्ट शक्य झाली.पुढे ही त्यांनी ती एकी ठेवली अन् आज वस्तीशाळा शिक्षकांची मूळ सेवा धरा ही मागणी सर्व संघटना दुसऱ्या क्रमांकावर घेतात.कारण या सर्व बंधू भगिनी यांची एकजूट...(यात कार्यरत वस्तीशाळा शिक्षकांना खाजगीत विचारा अनेकदा याना अधिवेशनाना नेले पण कागदावर असलेला प्रश्न मंचावरील नेत्यांच्या ओठी आला नाही.)ज्यांनी करून दाखवलं त्यांच्यासोबत आजही हे लोक निष्ठेने उभे आहेत.हो आपण ही असेच करायला हवे....आमची एकजूट महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन माध्यमातून ठेवून जे आपल्याला जुनी पेन्शन मिळवून देतील.....त्यांच्यासोबत हा सबंध वर्ग राहील....पण जो पर्यंत हे साध्य साध्य होत नाही तोवर.... आमचं ठरल आहे...हे सांगायला हवे...वेळप्रसंगी ते दाखवले ही पाहिजे....

आज नव्याने आलेल्या शिक्षण सेवकांना आपण शिक्षण सेवक आहोत वाटते.पण मित्रानो आम्हीही याच शिक्षण सेवक पदावर लागलो.त्यावेळी आमचं अस्तित्व व संघटन नव्हते.तरीही आम्ही संघर्ष केला व 3 हजार चे मानधन 6 हजार झाले.सहा मधून ही 175 व्यवसाय कर जात होता.तो योग्य नाही हे दाखवून आम्ही बंद केला. कारण आम्ही जाणतो त्या 175 चे महत्व. पुढे तीन वर्षे गेली आणि लक्षात आले अरे ही तीन वर्षे तर गेली.पण पुढे निवृत्ती नंतर खूप मोठा खड्डा आहे.इकडे सुरवातीला कमी पगार व निवृत्ती नंतर पेन्शन नाही. मग आपल्यासारखे आशावादी होऊन आज अस्तित्वात असणाऱ्या प्रत्येक संघटनेला विनवण्या केल्या पण कोणी गांभीर्याने घेतले नाही. सगळीकडे गर्दी करायला फक्त आम्ही. प्रश्न मार्गी दुसरेच....

लक्षात आले ज्याच्या पोटात दुखते त्यानेच ओवा खाल्ला पाहिजे. आणि निर्माण झाले महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन. यादीत 30 क्रमांकावर होती पेन्शन मागणी 2014 ला. व आज ती पहिल्या क्रमांकावर आहे. उद्या ती सोडवून भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपली एकजूट निर्णायक आहे. फेटे बांधून,वाढदिवस साजरे करून,एखादा गर्दी करण्यासाठी पुरस्कार देवून डोके आपले झाले समजणारे अनेक जण असतील पण TET व CET पास होऊन आलेल्या सर्व युवा बंधू भगिनी यांनी आपण अल्प काळाचे शिक्षणसेवक व दिर्ध काळाचे DCPS धारक आहोत हे लक्षात घेवून आपल्या सर्व कार्यात सोबत असणारे संघटन कोणते हे लक्षात घ्यावे. आम्ही आपले स्वागत करू प्रवेश कधीच नाही.कारण प्रवेश केला की बाहेर ही कधी तरी जावे लागते....आणि आम्ही प्रवेश देण्या इतके मोठे नाही.आणि आपल्याच घरात कोणी कोणाचा प्रवेश घेत नाही.... आपल्या सर्वांना    एवढेच सांगेन आपल अस्तित्व असेच  ठेवूया....आपल्या समस्या आपणच सोडवू.आपल्या समूह शक्ती व प्रामाणिक प्रयत्नाने...

कारण जेव्हा आपण आंतरजिल्हा बदलीने रीलिव्ह होणार होता तेव्हा  आपल्या सोबत ठामपणे उभे असणारे संघटन पेन्शन हक्क संघटन होते.इतरांनी चौकशी ही केली नाही कारण इतर जिल्ह्यात बदलून जाणारा आता आपल्या काय कामाचा,बँकेचा राजीनामा दिला असेल आपण मग तर विषयच संपला.

आंतरजिल्हा बदली असो की जिहांतर्गत बदली मध्ये प्रत्येक टप्प्यावर सहाय्य करणारे  संघटन आपले संघटन...

तुम्ही माहिती घेतली तर लक्षात येईल स्थायी प्रमाणपत्र सुलभ नमुना व मोठ्या संख्येने करण्यासाठी आपण आग्रही होतो. 

वरिष्ठ वेतनश्रेणी प्रश्न 23/10  शासन आदेशाने आमच्याच नशिबी आला.थांबली वेतन श्रेणी.. एवढ्या संघटना,एवढा श्रेय वाद... पण प्रश्न सोडवला आपणच....

जुलै विकल्प 2010/11 बॅच ला लाभ होणार होता,सगळीकडे संभ्रम आशात निर्णायक पाठपुरावा आपण केला व शासन आदेश निघाला. अनेकांना लाभ झाला.....

सातवा वेतन आयोग वेतन निश्चिती ते फरक बिल अत्यंत सहजतेने मिळाले ते एक्सेल शिट राज्याला मोफत देणारे संघटन आपले....सांगलीचे MRJPHS अर्थात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन....

अजुन खुप काही झाले आपल्या एकत्र येण्याने....

अनेक आपल्यातील मृत कर्मचारी कुटुंबांना मदत झाली...

अंशदान हिशेब तपासणी सुरू,हिशेब चिट्टी.....

अंशदान शासन हिस्सा 14 टक्के झाला...

मृत कर्मचारी कुटुंबास 10 लाख मदतीचा शासन निर्णय...

अपघात विमा योजना लागू झाली...

पण

आपल अंतिम ध्येय एकच मिशन जुनी पेन्शन हे आजही आपण साध्य करू शकलो नाही.

अशावेळी आपण सर्वांनी वस्तीशाळा शिक्षकांच्या लढ्याचा आदर्श घेणे आवश्यक आहे.कारण आपण बाजूला आहोत. प्रवाहात नाही म्हणून मागणी 1 क्रमांकला आहे. *जो पर्यंत जुनी पेन्शन साध्य होत नाही तो पर्यंत तरी आपण ठाम पने सांगितले पाहिजे हो आम्ही महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन मद्ये आहोत व तेच आमचे संघटन.....

नाहीतर एकटा वितेश खांडेकर,अमोल शिंदे काही करू शकणार नाहीत.....

आपण सगळेजण आपले व्यक्तिगत संबंध सांभाळत बसू तर आपण नक्कीच आपल्याच पायावरच दगड मारून घेवू. आमचा कोणाला विरोध नाही पण याचा अर्थ सर्वांना समर्थन असा नाही.  जिथे आमचे हित असेल तेथे आम्ही ठाम व एक आहोत हे दाखवणे काळाची गरज.आपण सर्वजण समजदार आहात.मला माहित आहे.आपल्याला ओढले जाते.पण आपणही आता एक सांगायला हवे _आम्हाला जुनी पेन्शन द्या जो देईल त्याचा झेंडा हाती घेवू....पण आता नुसते अधिवेशन व मेळाव्यात गर्दी साठी आमचा विषय घ्यायचा असे व्हायला नको.आजुन कितीही आंदोलन करायला लागली तर आम्ही सहभागी होऊ.पण आम्ही नुसते वेगळे विषय रेटून आमचा विषय तेथेच राहत असेल तर प्रश्न नक्की विचारू.सध्या ही 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी व नंतर या दोन शब्दात खेळ चालू आहे 2005 पूर्वीच्या लोकांना जुनी पेन्शन आहेच ती त्यांना लागू असलीच पाहिजे.पण 2005 नंतर लागलेल्या प्रत्येकाला ही ती हवीच...त्यामुळे केवळ पूर्वीच्या लोकाना जुनी पेन्शन मिळवून देवून विजयोत्सव साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या नेत्याना आमचं काय हे विचारायला नको का??

हे लीहण्यचा उद्देश केवळ आपल्याला सजग करणे आहे.कारण ही तर सूरवात आहे......

आपला

अमोल शिंदे
अनेक संघटना अस्तित्वात असताना ही  शिक्षण सेवक व DCPS धारक दुर्लक्षित बनल्यामुळे निर्माण झालेल्या
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगलीचा जिल्हा अध्यक्ष

No comments:

Post a Comment