शिक्षक संघटना सर्व शिक्षकांचे प्रतिनिधित्व करतात की फक्त शिक्षक बँकेच्या सभासदांचे???


मित्रानो नमस्ते 
गेल्या दोन महिन्यात अंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांकडे पाहिले की वरील प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.जो पर्यंत परजिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्या झाल्या नव्हत्या प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षक संघटना या परजिल्ह्यात नोकरी करणाऱ्या शिक्षकांना हक्काचे कार्यकर्ते मानत मग कोणतेही आंदोलन असो की मेळावे हे परजिल्ह्यातील बांधव 100 टक्के त्या आंदोलनात झेंडे घेऊन पुढे.पण या बांधवांची अंतरजिल्हा बदली व्हावी म्हणून कधीच या संघटना आक्रमक नव्हत्याच पण जेव्हा अंतरजिल्हा बदल्या झाल्या तेंव्हा मात्र या संघटना व तथाकथित शिक्षक नेते आपल्या या झेंडा घेऊन पुढे असणाऱ्या कार्यकर्त्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करू लागले याचे कारण आता बदली झालेला शिक्षक हा एक शिक्षक राहिला होता पण आज पर्यंत ह्या संघटना व नेते या शिक्षकाकडे शिक्षक म्हणून नव्हे तर मतदार म्हणून पाहत होते.अन एखाद्या निवडणुकीमध्ये मतदारसंघ पुनर रचना झाल्यानन्तर एखादा पूर्वापार वार्ड दुसऱ्या मतदार संघात गेल्यानन्तर नेत्यांचा त्या प्रभागात संपर्क कमी होतो अन दुरावा निर्माण होतो तसाच अनुभव कमी अधिक प्रमाणात अंतरजिल्हा बदली झालेले बांधव घेत आहेत.

मग अगदी अर्ज भरताना स्थायित्व प्रमाणपत्र हवे म्हटल्यावर ते मिळवण्यासाठी पाठपुरावा असो की ऑनलाइन माहिती भरताना येणाऱ्या अडचणी आपण ज्यांच्या एका हकेवर धावत पळत जात होतो ते शिक्षक नेते नक्किच मदत करतील पण झालं उलट दररोज zp मध्ये येणारे नेते कशाला  ताप म्हणून त्यांनी zp ला येनेच थांबवले.त्यांनतर बदली यादी लागली कार्यमुक्त करण्याची वेळ आली त्यावेळीही हीच अवस्था काही मोजक्या नवख्या संघटना व नेते सोडले तर स्वतःला बड्या समजणाऱ्या संघटना काही जिल्ह्यातील अपवाद वगळता या सर्व प्रक्रियेपासून सुरक्षित अंतर ठेवून आहेत.बांधवाना शासनाच्या निर्णयाने झालेल्या बदल्या आपल्याच सहकाऱ्यांच्या असून त्यांच्या बदल्या सहजतेने व्हाव्यात व सोयीच्या व्हाव्यात यासाठी किती आक्रमक आहेत.आज अनेक जागा रिक्त आहेत त्याला बदली झालेले गुरुजींच जबाबदार आहेत असे चित्र रंगवून सोयीस्कर अडवणूक काही ठिकाणी सुरू असताना सर्वजण गप्प का आहेत??मुलांना शिकवण्यासोबत आता शिक्षक भरतीची जबाबदारी त्या गुरुजींची आहे काय??

सांगली मधील बांधवांसाठी-
जत मधून आजही 25 ते 30 शिक्षक सर्व आदेश ग्रामविकास सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देऊन ही कार्यमुक्त झाले नसून याबाबत काल व आज दोन दिवस या शिक्षकांनी पंचायत समिती आवारात ठिय्या मारला आहे पण परजिल्ह्यातील असल्याने त्यांची दाद कोण घेत नाही आहे.उद्या सर्वाना कार्यमुक्त न केल्यास हे सर्व शिक्षक सोमवारपासून पंचायत समिती आवारात उपोषणास बसण्याच्या तयारीत आहेत..अन या बांधवाना रिलिव्ह करावे यासाठी जत तालुक्यातील महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन पूर्ण ताकतीने या बांधवासोबत आहे व यापुढे ही राहील....(तालुक्यात एकूण 91 पैकी यापूर्वी 38 व आज 27 असे 65 शिक्षक कार्यमुक्त झाले आहेत फक्त 25 कार्यमुक्त होणे बाकी आहेत.)

अमोल शिंदे
जिल्हाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली
9420453475

No comments:

Post a Comment