वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव राज्यात प्रथम मंजूर केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांचामहाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन कडून सत्कार



शेवटच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या चांगल्या कार्याचा सन्मान देणाऱ्या अधिकाऱ्यांस सलाम
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

सांगली जिल्ह्यातील शिक्षकांचे वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव ज्यांच्यामुळे मंजूर झाले ते आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत साहेब त्यांच्याबद्दल कृतज्ञता पूर्वक सत्कार करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन ची टीम जिल्हा परिषदेमध्ये गेली त्यावेळी पुन्हा एकदा साहेबांच्या मधील मनाचा मोठेपणा दिसला. साहेबांच्या सोबत वरिष्ठ वेतन श्रेणी चे काम पाहणारे लिपिक अर्जुन ताटे यांचा सत्कार करण्यासाठी बुके घेतला होता. साहेबांच्या साठी मोठा बुके व लिपिक अर्जुन ताटे यांच्यासाठी थोडा छोटा बुके घेतला होता. आदरणीय राऊत साहेबांनी मोठा बुके अर्जुन ताटे ना देऊन सत्कार करा असे म्हणत स्वतः मोठा बुके देऊन अर्जुन ताटे यांचा सत्कार केला. एक मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कष्टाचे मोकळ्या मनाने कौतुक करतो त्या वेळी नक्कीच अभिमानाने ऊर भरून येतो. यावेळी पेन्शन हक्क संघटन कडून साहेबांचे मनःपूर्वक आभार मानले राज्यभर सांगली जिल्हा परिषद वेतनश्रेणीबाबत पथदर्शी ठरल्याचा अभिमान असून हे केवळ आदरणीय राऊत साहेबांच्या मूळे झाले त्यांचे जिल्ह्यातील सर्व तरुण शिक्षकांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून आभार मानले. यावेळी साहेबांनी प्रलंबित प्रश्न गतीने मार्गी लागत आहेतच त्याचप्रमाणे सर्व शिक्षकांनी शाळांमध्ये उत्कृष्ट कार्यक्रम सांगली जिल्हा परिषदेचे नाव राज्यात अग्रस्थानी आणण्यासाठी कार्य करण्याच आवाहन केले.यावेळी तासगाव येथे काल कार्यशाळेत युवा शिक्षकांनी उत्कृष्ट प्रेसेंटेशन केल्याचे साहेबांनी सांगितले.आपल्या सर्वांच्या वतीने सांगली जिल्हा परिषदेतील प्रत्येक शिक्षक शंभर टक्के योगदान देऊन माझी शाळा अभियानांतर्गत सर्व शाळा पंचतारांकित करण्यासाठी मेहनत घेतील असे अभिवचन दिले असून आपल्या शाळा हाच आपला मानबिंदू समजून आपण सर्वजण यापुढेही कार्य करू. आदरणीय साहेबांना लाख लाख धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

यानंतर शिक्षण विभागात विसापूर मॅडम यांची भेट घेऊन वरिष्ठ वेतनश्रेणी फरक बिलासाठी जादाची रक्कम पंचायत समितींना वर्ग करण्याची विनंती केली पंचायत समितीकडून मागणी येताच तात्काळ अनुदान वर्ग करण्याचे विसापूर मॅडम यांनी आश्वासन दिले

यादीबद्दल आपल्या सर्वांना उत्सुकता आहे आज दुपारी सर्व पंचायत समितींना मेल द्वारे यादी प्राप्त होईल. जिल्हा परिषदेमध्ये आरोग्यविषयक कार्यशाळा असल्याने सर्व कर्मचारी सदर कार्यशाळेत उपस्थित आहेत.ती कार्यशाळा संपताच यादी पाठवली जाईल. दुपारपर्यंत ती पीडीएफ स्वरूपात उपलब्ध होईल.

सर्वांनी संघटन कडून उपलब्ध करून दिलेल्या एक्सेल शीट चा वापर करत सर्व पात्र शिक्षकांची फरक बिले तयार करून पंचायत समिती सादर करावीत तसेच फेब्रुवारी पेड इन मार्च पगारात सुधारित वेतनश्रेणी नुसार पगार करण्याबाबत गटशिक्षणाधिकारी महोदयांना विनंती करावी.

यावेळी माझ्यासोबत पेन्शन हक्क संघटन चे शिलेदार राजेंद्र देबाजे सर, भगवान वाघमोडे सर उपस्थित होते.

सदैव आपला
अमोल शिंदे
जिल्हाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली
9420453475

No comments:

Post a Comment