मा.आमदार विक्रमदादा सावंत यांची भेट व सन्मान


   


    महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या शिलेदारणी घेतली जत तालुक्याचे नवनिर्वाचित मा.आमदार विक्रमदादा सावंत यांची भेट घेऊन दादाच्या विजयाचा ,त्यांच्या कृतत्वांचा, नेतृत्वाचा आणि दादांचा यथोचित सन्मान केला.दादाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
     दादाकडे 1नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या dcps धारक बांधवांच्या व्यथा मांडल्या.जुनी पेंशन मिळवण्यासाठी विधिमंडळात आवाज उठवण्यासाठी विनंती केली.त्यावेळी दादा म्हणाले,
"पाणी,शेतकऱ्यांचे प्रश्न आणि तिसरा प्रश्न हा जुनी पेंशन चा असेल.या प्राधान्य क्रमाने तिसरा प्रश्न पूर्ण ताकतीने सदैव मांडत राहीन.आणि तुम्हास न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू "
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
     शिक्षण सेवक बांधवाना आजच्या महागाईच्या काळात केवळ 6000 रु.मानधन मिळत आहे.आणि त्यासाठीही आवाज उठवण्यास दादांना विनंती केली असता दादा म्हणाले,"आज मजुरी करणाऱ्यास किमान 400रु.मजुरी मिळते.या मानधनात नक्की वाढ झाली पाहिजे.हाही प्रश्न विधिमंडळात उपस्थित करणार.असे दादा म्हणाले."
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment