आंदोलन म्हणजे पेन्शन हक्क संघटनच ध्येयवेड्या तरुणांचे ध्येयवेडे संघटन



निवृत्तीनंतर घंटा घेण्यापेक्षा आता घंटा वाजवून झोपलेल्या शासनास जागे करण्याचा प्रयत्न
🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔
मित्रानो आजचे घंटानाद आंदोलन फक्त 1 दिवस आधी ठरवून आपण सर्वांच्या सहकार्याने प्रभावी झाले.

खरेतर 4 तारखेला मेळावा झाला अन 7 ला आंदोलन,4 तारखेला हजारोंच्या संख्येने आपण सर्वजण गुडडापुरला आलो.भव्य निर्धार मेळावा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.आता पुन्हा लगेच सर्वाना गोळा करावे की नको या मनस्थितीत होतो.राज्यकार्यकारणीने ही 36 जिल्ह्यात आंदोलन आहे.आपण मेळावा घेतला असल्याने निवेदन द्या असे सांगीतले.पण सर्व जिल्हे आंदोलन करताना सांगली मागे रहाणार.जे गेली 15 दिवस मेळाव्यासाठी धडपडत होते तेच शिलेदार 5 तारखेला म्हणाले सर बघा परवानगी मिळते का आपण आंदोलन करूच.जिल्हा कार्याध्यक्ष विरेश हिरेमठ,गुरुबसू वाघोली,शाम राठोड,बालाजी पडलवार, रवी सत्तारी, अविनाश कडोलकर,नवराज सर,पंपटवार सर,आंधळे सर,तानाजी कांबळे,रवी वराद,जंगम सर,दिलीप वाघमारे,कटीमनी सर, नागरे सर व जत मधील सर्व टीमने आंदोलन करूच असा निग्रह व्यक्त केला.खरच जतच्या टीमचे पेन्शन प्रश्नाबाबतचे समर्पण अन त्याग मोठा असून आपल्या या प्रेरणेने जिल्हा पेन्शनमय होईल व सर्व पेन्शन फायटर एक दिवसाच्या आंदोलनाने थांबत नाही व एका दिवसात तो आंदोलन ताकतीने करू शकतो याची प्रचिती मिळाली.

आंदोलन परवानगी,मंडप,पाणी, सतरंजी हे नियोजन करायचे होते,6 तारखेला जिल्हा कार्यवाहक नेताजी भोसले सरांनी पोलीस परवानगी साठी पत्र दिले,पण मंडपाला परवानगी मिळाली नव्हती.घंटा नाद साठी घंटा मिळवायची होती.सर्व जबाबदारी नेताजीनी घेतली.डिजीटल रमेश मगदूम सरानी काल रात्री करून घेतले.
दिवसभर शाळा करून नेताजी 12.30 वाजता सांगलीत आले.घरी न जाता ऊन असल्याने मंडप हवाच म्हणून मंडप व्यवस्था केली,थंड पाण्याची सोय केली.अन हरिपूरला मंदिरात जाऊन घंटा आणली.नेताजी गुडडापुरला सहकुटुंब उपस्थित होते,मेळाव्याचे सर्व फोटो त्यांनीच काढले होते.पण ते कंटाळले नाहीत. मित्रानो आपल्यातला एक भाऊ इतके झटतोय.ज्याची शाळा सांगलीतुन 45 किमीवर आहे असे नेताजी इतका वेळ देत असताना सांगलीतच असून ही काहीजण नुसतं उपस्थित ही राहू शकले नसतील तर काय म्हणावे???नक्कीच आपली टीम या सर्वाना एकत्र करण्यात यशस्वी होईल.

आजच्या मेळाव्यात सर्वात सकारात्मक बाब आम्ही जाण्याच्या अगोदर बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे हिटणीकर सर,पोतदार सर व टीम आंदोलन स्थळी हजर होती.महानगर पालिकेतील शिक्षक मित्र मोरलवार सर व टीम  उपस्थित होती. मिरजेतील ज्येष्ठ शिक्षक बंधू व भगिनी हजर होत्या.आरती बुवा मॅडम व dcps धारक महिला भगिनी यांचा सहभाग व त्यांच्या मनोगतातून प्रेरणा मिळाली.

सर्वच तालुक्यातून आलेले dcps धारक बंधू,भगिनी यांनी अत्यन्त कमी वेळात नियोजन होऊन ही आजचे आंदोलन यशस्वी केल्याबद्दल धन्यवाद...

आंदोलनास उपस्थित अरविंद गावडे सर,कृष्णा पोळ सर,विनायक शिंदे सर,अविनाश गुरव सर,मुश्ताक पटेल सर,फैसल पटेल सर,दीपक काळे,चंद्रशेखर क्षीरसागर या विविध संघटनांच्या मान्यवरानी संघटनेच्या वतीने उपस्थित राहून पाठींबा दिल्याबद्दल आभार🙏

#1 जून लॉंगमार्च पेन्शनसाठी

आपला 
अमोल शिंदे
जिल्हाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली

No comments:

Post a Comment