Well begun is half done


2020 ची सुरवात नक्कीच आपल्या जुनी पेन्शन लढ्यास बळकटी देणारी म्हणावी लागेल. कारण आम्ही गेली चार वर्षे लढा देताना 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या अधिकारी कर्मचारी याना जुनी पेन्शन लागू करावी अशी मागणी केली की अनेकाकडून उत्तर यायचे अशक्य....ही मागणीच चुकीची आहे....हे होणे नाही....पण तरीही आम्ही जुनी पेन्शन हवीच यावर ठाम होतो,आहे व पुढे ही जोवर ती आम्हाला मिळत नाही तोवर राहू....

आज 1 जानेवारी 2020 रोजी 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या न्यायिक अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत शासन निर्णय राज्याच्या विधी व न्याय विभागाने निर्गमित केला आणि अखेर 15 वर्षानंतर पुन्हा एकदा कोणाला का असेना पण 1982 व 84 ची जुनी पेन्शन मिळणार हे निश्चित झाले.....आणि खऱ्या अर्थाने आम्ही जे म्हणत होतो ते योग्य होते हे सिद्ध झाले.....मित्रानो एकच मिशन जुनी पेन्शन म्हटले की काही लोक चेष्टा करायचे टोपी पाहून हसायचे पण आपण थांबलो नाही व पुढे ही थांबायचे नाही.

न्यायव्यवस्थेत कार्यरत अधिकाऱ्यांना जर शासन पेन्शन निवडण्याचा विकल्प देत असेल तर इतर कर्मचारी याना का नाही??? आम्हाला ही हवी जुनी पेन्शन...समान काम,समान वेतन,समान पेन्शन

पेन्शन हा केंद्राचा विषय म्हणून पहिली 10 वर्षे प्रस्थापित संघटना व नेतृत्वानी तलवारी म्यान केल्या व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन मागणी करत असताना ही सुरवातीच्या काळात दुर्लक्ष केले.पण आता मागे काय झाले हे न पाहता सर्वांना एकजूट करावी लागेल. आंदोलने घाई गडबडीने न करता नियोजन पूर्वक व तयारीने करणे गरजेचे.सरकार नवीन आहे.सरकारच्या सकारात्मक दृष्टिकोनाचा लाभ मिळवण्यासाठी संघटना राज्य नेतृत्वाने तयारी करायला हवी. सरकारने न्यायालयाच्या आदेशानुसार का होईना सुरवात केली आहे.राज्यातील तमाम DCPS व NPS धारकांनी एकत्र येत जुनी पेन्शन मिळवण्याची हीच ती वेळ.....

एकत्र येवू.....पेन्शन मिळवू....

चला प्रत्येक तालुका संघटन मजबूत करू....एक एक DCPS धारक NPS धारक या लढ्यात जोडू....हो आता थांबायचे नाही..... सुरवात झाली.....

#हीच ती वेळ

एकच मिशन जुनी पेन्शन

चला सोबत येणार ना जुनी पेन्शन साठी???

आता विभागून नाही एकत्र,एकच व्यासपीठ... MRJPHS अर्थात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन... कारण केवळ पहिली मागणी नाही तर एकमेव मागणी....राज्यातील सर्व संवर्गाच्या अधिकारी,कर्मचारी याना जुनी पेन्शन लागू करावी

आपला

🖋अमोल शिंदे🖋
जिल्हाध्यक्ष 
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली
9420453475
✊✊✊✊✊✊✊✊

2020 सकारात्मक सुरवात.....

No comments:

Post a Comment