सर्व सामान्य सभासदांच्या नजरेत सांगली शिक्षक बँक...
🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔
(✒️✒️ रमेश मगदूम -मिरज एक सर्वसामान्य सभासद फोन नं.9767290767)
कोणत्याही वित्तीय संस्थेच्या वाटचालीत त्या संस्थेतील कर्मचाऱ्यांचे व व्यवस्थापनाचे योगदान महत्वाचे असते. वित्तीय सहकारी संस्थेमध्ये कर्मचाऱ्यांनी आपले अधिकचे योगदान देऊन अपेक्षित नफ्यापेक्षा जास्त नफा मिळवून दिल्यास बक्षीस व बोनस पगार देऊन कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची प्रथा रूढ आहे. जर अपेक्षित नफा मिळाला नाही तर बक्षीस व बोनस पगार कर्मचाऱ्यांना देणे बंधनकारक नसते.
सांगली शिक्षक बँकेचे सध्याचे एकूण खेळते भांडवल व उलाढाल बघता प्रतिसेवक वार्षिक नफा किमान 4 लाख रु होणे अपेक्षित असून त्याच्यापेक्षा जास्त नफा मिळाल्यास कर्मचाऱ्यांना शाबासकी म्हणून बक्षीस व बोनस पगार देणे संस्थेच्या हिताचे आहे.
🔔 सांगली शिक्षक बँक - सन 2020-21 मधील आकडेवारी🔔👇🏻
वार्षिक नफा - रु.4 कोटी 49 लाख
प्रतिसेवक नफा - रु.2लाख 67हजार
तरतूद केलेला बक्षीस पगार रक्कम - 62 लाख रुपये (प्रति सेवक एक महिन्याचा पगार)


