Friday, June 26, 2020

जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करा- मागणी ट्विटर वर ट्रेंडिंगमध्ये ऑनलाईन आंदोलनात पाच तासात ३लाख ८० हजार ट्विट


#RestoreOldPension हा हॅश टॅग वापरत जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करा या मागणीसाठी  देशव्यापी लक्षवेधी ऑनलाईन आंदोलनात ट्विटरच्या माध्यमातून दुपारी 12 ते 5 या वेळेत करण्यात आले. या आंदोलनाचे संयोजन राष्ट्रीय पुरानी पेन्शन बहाली कृती समिती(NMOPS)चे राष्ट्रीय अध्यक्ष विजयजी बंधू व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी केले.

माजी RBI गवर्नर विमल जालान आणि रघुराम राजन यांच्या Twitter Account वरुन  ही या हैशटैग सह ट्वीट करून जुनी पेन्शन चे समर्थन केले असून ही बाब या लढ्यासाठी सकारात्मक असून या आंदोलनात कर्मचारी वर्गाने केलेल्या मागणीचा सरकारने सकारात्मक विचार करून सर्वांना जुनी पेन्शन लागू करावी.अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनचे राज्य समन्वयक सागर खाडे यांनी केली.

Wednesday, June 24, 2020

शिक्षणसेवक मानधन वाढ करणे आवश्यक - ना. बच्चुभाऊ कडू यांची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विनंती



आज स्वतः मा.मंत्री महोदय बच्चूभाऊ कडू साहेब यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पत्र लिहून शिक्षणसेवक मानधन वाढ करणे आवश्यक असल्याची विनंती केली.मंत्री महोदय बच्चूभाऊ कडू साहेब यांनी केलेल्या मागणीने शिक्षण सेवकांच्या रास्त मागणीला बळ मिळाले असून राज्यातील शिक्षण सेवकांच्या मानधन वाढीच्या आशा पल्लवीत झाल्या.ना.बच्चूभाऊ कडू यांनी केलेल्या विनंती बद्दल राज्यभरातील शिक्षणसेवकानी त्यांचे विविध समाज माध्यमातून आभार व्यक्त केले.

Monday, June 22, 2020

शिक्षण सेवक पद्धत बंद करणे व शिक्षणसेवक मानधन वाढ करणेबाबत मा.ना. हसन मुश्रीफ साहेब यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली कडून निवेदन




महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली कडून मा.ना. हसन मुश्रीफ साहेब, ग्राम विकास मंत्री महाराष्ट्र शासन यांना शिक्षण सेवक पद्धत बंद करणे व शिक्षणसेवक मानधन वाढ करणेबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली कडून निवेदन देण्यात आले.लवकरच याबाबत निर्णय घेवू असे आश्वासन यावेळी ग्रामविकास मंत्री महोदयांनी दिले.

Thursday, June 18, 2020

आपल्या अद्वितीय कामगिरीने सांगलीकरांची मने जिंकणारे सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत साहेब

सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर सर्वाधिक काळ कार्यरत मुख्य कार्यकारी अधिकारी
पदोन्नतीने जळगाव जिल्हाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !!
🖋️अमोल शिंदे🖋️
9420453475

एखादी व्यक्ती उच्च पदावर पोहोचल्यावर तिचे पाय जमिनीवर असतील तर ती अधिकारी व्यक्ती खऱ्या अर्थाने जनसामान्यांना न्याय देते. याचे मूर्तिमंत उदाहरण आदरणीय अभिजीत राऊत साहेब...

काम करत असताना व्यवस्थेतील शेवटच्या घटकाचा व शासकीय व्यवस्था खऱ्या अर्थाने ज्या घटकासाठी कार्य करणे अपेक्षित आहे. त्या घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी ज्यांच्या दालनाचे दरवाजे सदैव सर्वासाठी उघडी होती. येणारे कोणी बडे व्यक्तिमत्व असो की अगदी सामन्यातील सामान्य व्यक्ती सर्वांना समान वागणूक हे साहेबांचं वैशिष्टय...
सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हटले की सर्वात दीर्घकाळ प्रभावी कार्य करणारे शिवाजीराव नाईक साहेब यांचे नाव प्रत्येक सांगलीकरांच्या डोळ्यासमोर येते.आता सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हटले की अभिजीत राऊत हे नाव डोळ्यासमोर येईल.ही नीवे समोर येतात ती केवळ सर्वाधिक काळ काम केले म्हणून नाही तर आपण केलेल्या लोकाभिमुख कार्यामुळे.

Friday, June 12, 2020

जिल्हा परिषदेत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन कडून शिक्षण व शिक्षक विषय प्रश्नासंदर्भात भेट

दिनांक 11 जून 2019
जिल्हा परिषदेत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत साहेब  यांची स्वर्गीय नानासो कोरे सर यांच्या विमा प्रस्ताव व अनुकंपा प्रस्ताव संदर्भात भेट घेतली यावेळी खालील काही प्रश्नाबाबत ही चर्चा करून निवेदन देण्यात आले.


⚫विविध शालेय अनुदान शाळांना वर्ग करण्याबाबत दिनांक 23 मार्च रोजी आदेश निघाले.शाळांच्या खात्यावर सदर अनुदान 15 एप्रिल रोजी जमा झाले आहे.16 मार्च पासून लॉक डाऊन असल्याने सर्व दुकाने,व्यवसाय बंद

Thursday, June 11, 2020

स्वर्गीय नानासो कोरे सर यांच्या विमा प्रस्ताव व अनुकंपा प्रस्ताव बाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन कडून जिल्हा परिषदेचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत साहेब यांची भेट



निवेदन पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा..
*नानासो कोरे सरांच्या पत्नीना अनुकंपा अंतर्गत सेवेत घेण्याबाबत जिल्हा परिषद शिक्षण समितीत ठराव मंजूर*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आज दिनांक 11 जून 2020 रोजी जिल्हा परिषदेचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत साहेब यांची भेट घेवून स्वर्गीय नानासो कोरे सर यांच्या विमा प्रस्ताव व अनुकंपा प्रस्ताव बाबत चर्चा करण्यात आली.यावेळी स्वर्गीय नानासो कोरे सर यांचे वडील सदाशिव कोरे (काका) उपस्थित होते. आदरणीय मुख्य कार्यकारी

Tuesday, June 9, 2020

शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत होण्यासाठी कडेगांव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. नायकवडी साहेब यांची भेट

आज दिनांक 05.06.2020 रोजी आपल्या कडेगांव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. नायकवडी साहेब यांची शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत होण्यासाठी भेट घेण्यात आली व पाठपुरावा करण्यात आला. सदर भेटीवेळी माननीय श्री नायकवडी साहेब यांनी मार्गदर्शन केले. शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत झाले की कोणकोणते फायदे होतात याबद्दल चर्चा करण्यात आली. यावेळी साहेबांनी सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही दिली. यावेळी 🤝🤝🤝🤝🤝

यावेळी बँक ऑफ इंडिया शाखा कडेगाव चे शाखाधिकारी श्री. पटेल साहेब यांनी श्री. नायकवडी साहेब यांची भेट घेतली. भेटीत नायकवडी साहेबांनी शिक्षकांना कोणते लाभ मिळतात याबद्दल प्रश्न विचारले. त्यावर पटेल साहेबांनी सविस्तर उत्तरे दिली.

Thursday, June 4, 2020

मिरज तालुका गटशिक्षणाधिकारी साहेब यांचे स्वागत व भेट

आज महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन मिरज च्या वतीने पंचायत समिती मिरज या ठिकाणी नव्याने हजर झालेले गटशिक्षणाधिकारी श्री. कालगावकर साहेब यांची भेट घेण्यात आली. संघटनच्या वतीने साहेबांचे स्वागत करण्यात आले.तसेच शिक्षक  प्रश्नांसंदर्भातील निवेदन देऊन साहेबांशी तालुक्यातील विविध शिक्षक प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यात आली.

 शैक्षणिक विषयावर चर्चा करत जवळ जवळ तासभर साहेबांनी संघटन साठी वेळ देत कार्यालयीन स्तरावरीलकोणताही प्रश्न प्रलंबित रहाणार नाही असे आश्वासन देत तालुक्याच्या शैक्षणिक विकासात संघटनांची भूमिका पूरक असावी , अशी अपेक्षा व्यक्त केली.


  निवेदनात नमूद केलेल्या प्रत्येक विषयावर साहेबांशी चर्चा झाले.त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँकेत केंद्रप्रमुख पगार

Monday, June 1, 2020

DCPS धारकांचा सातवा वेतन आयोग रोखीने फरकाचा दुसरा हप्ता

डी.सी.पी.एस. धारकांचा सातवा वेतन आयोग रोखीने फरकाचा दुसरा हप्ता 1 जुलै रोजी दिनांक 30 मे 2019 च्या शासन आदेशानुसार आदा करण्याबाबत गट शिक्षणाधिकारी याना सूचित करण्याबाबत शिक्षणाधिकारी मॅडमना विनंती केली असून अशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील असे शिक्षणाधिकारी मॅडम यांनीसांयांनी आहे.

- अमोल शिंदे, जिल्हाध्यक्ष