Thursday, June 11, 2020

स्वर्गीय नानासो कोरे सर यांच्या विमा प्रस्ताव व अनुकंपा प्रस्ताव बाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन कडून जिल्हा परिषदेचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत साहेब यांची भेट



निवेदन पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा..
*नानासो कोरे सरांच्या पत्नीना अनुकंपा अंतर्गत सेवेत घेण्याबाबत जिल्हा परिषद शिक्षण समितीत ठराव मंजूर*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आज दिनांक 11 जून 2020 रोजी जिल्हा परिषदेचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत साहेब यांची भेट घेवून स्वर्गीय नानासो कोरे सर यांच्या विमा प्रस्ताव व अनुकंपा प्रस्ताव बाबत चर्चा करण्यात आली.यावेळी स्वर्गीय नानासो कोरे सर यांचे वडील सदाशिव कोरे (काका) उपस्थित होते. आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी नानासो कोरे सरांच्या निधनाबद्दल  दुःख व्यक्त केले.त्यांनी कुटुंबीयांना जिल्हा प्रशासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य करण्याबाबत आश्वस्त केले.

 ⚫ नानासो कोरे सर यांचा *विमा प्रस्ताव तातडीने शासनास पाठवला असल्याचे व शासनाकडून शक्य ती सर्व मदत केली जाईल याबद्दल आश्वस्त केले.*

⚫यावेळी अनुकंपा अंतर्गत नोकरीसाठी स्वर्गीय नानासो कोरे सर यांच्या पत्नी श्रीमती कोरे ताई यांचा परिपूर्ण प्रस्ताव राऊत साहेब यांच्याकडे सादर करून लवकरात लवकर कार्यवाही करण्याबाबत विनंती करण्यात आली.यावेळी सामान्य प्रशासन विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे साहेबही उपस्थित होते सदर प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे देवून योग्य ती पुढील कार्यवाही करण्यास सांगितले.

⚫श्री. नानासो कोरे सर 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आले कर्मचारी असल्याकारणाने त्यांना अंशदान पेन्शन योजना लागू आहे. त्यांच्या अंशदान पेन्शन योजना अंतर्गत कपात रक्कम रत्नागिरी व सांगली जिल्हा परिषद कडे असून  सदर रक्कम व अंशदान पेन्शन योजना अंतर्गत मृत्यू पश्चात जे लाभ मिळतात ते मिळण्याबाबत संघटन कडून विनंती करण्यात आली.सेवेत आल्यापासून दहा वर्षाच्या आत मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याबाबत शासन आदेश आहे. परंतु सरांची एकूण सेवा दहा वर्षांपेक्षा अधिक झाली असल्याकारणाने त्यांच्याबाबत कोणते लाभ दिले जातील याबाबत शासन स्तरावरून मार्गदर्शन मागवण्याची विनंती करण्यात आली.याबाबत वित्त विभागास कार्यवाही करण्याबाबत साहेबांनी लगेचच निर्देश दिले.

⚫शासनाने दिनांक 29 मे 2020 रोजीचा कोव्हीड -19 संबंधित कर्तव्य बजावताना मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्याना विमा कवच सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबत शासन आदेश  निर्गमित केला आहे. *परंतु यामध्ये कोव्हीड-19 संदर्भाने  मृत्यू  झाल्याबाबत चे वैद्यकीय प्रमाणपत्राची अट आहे.* कोव्हिड-19 शिवाय चेक पोस्ट वर ड्युटी करताना अपघाती निधन झाले आहे.आशा कर्मचाऱ्यांना ही हे 50 लाख सानुग्रह अनुदान मिळणे आवश्यक असून सदर कोव्हीड-19 संदर्भाने  मृत्यू  झाल्याबाबत चे *वैद्यकीय प्रमाणपत्राची अट बदलणे आवश्यक असून याबाबत शासनाशी पत्रव्यवहार करण्याबाबत निवेदन संघटन कडून देण्यात आले.*

*आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी अत्यंत तातडीने नानासो कोरे सरांचा विमा प्रस्ताव शासनास पाठवण्याबाबत तसेच सर्वोतोपरी कुटुंबीयांना सहकार्य करण्याबाबत आश्वस्त केल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद🙏*
🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️
*शिक्षण समिती सभापती आशाताई पाटील यांची भेट*

शिक्षण समिती सभापती आशाताई पाटील यांची भेट घेण्यात आली.यावेळी त्यांनी शिक्षणाधिकारी मॅडम यांच्याकडून नानासो कोरे सरांच्या विमा प्रस्ताव व अनुकंपा प्रस्ताव बाबत झालेल्या कार्यवाहीची माहिती घेतली.तसेच नानासो कोरे सरांच्या पत्नीना अनुकंपा अंतर्गत सेवेत घेण्याबाबत जिल्हा परिषद शिक्षण समितीत ठराव मंजूर करण्यात आला.त्याबद्दल शिक्षण समिती सभापती सौ. आशाताई पाटील मॅडम यांचे मनःपूर्वक धन्यवाद🙏


 यावेळी स्वर्गीय नानासो कोरे सर यांचा अनुकंपा व विमा प्रस्ताव वेळेत सादर करण्यात *डफळापुर केंद्राचे केंद्रप्रमुख शंकर बेले सर, उद्योगरत्न संकपाळ सर यांनी महत्वाची भूमिका पार पाडली ते स्वतः उपस्थित होते.जत पंचायत समिती शिक्षण विभाग व गट शिक्षणाधिकारी आर.डी.शिंदे साहेब यांनी सर्व बाबी गतीने पूर्ण केल्या त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद *

यावेळी जिल्हा सरचिटणीस राहुल कोळी सर,जिल्हा कोषाध्यक्ष राजकुमार भोसले सर उपस्थित होते.

आपला
 अमोल शिंदे
जिल्हाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली
9420453475

*आपल्यासाठी आपणच*

12 comments:

  1. आपल्यासाठी आपणच 👍👍👍👍👌👌👌👌

    ReplyDelete
  2. अतिउत्कृष्ट ब्लॉगा

    ReplyDelete
  3. सार्थ अभिमान वाटत आहे MRJPHS चा शिलेदार असल्याचे खरच खूप सुंदर आणि मेहनतीने केलेलं काम आहे सर धन्यवाद

    ReplyDelete
  4. न्याय मिळवून देण्यासाठी फक्त महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन

    ReplyDelete
  5. छान सर, आपल्यासाठी आपणच .....
    वाईट इतकंच वाटतं की इतर संघटनांनी देखील प्रयत्न केला पाहिजे ...

    ReplyDelete
  6. कृतिशील संघटना अतिशय सूंदर ब्लॉग

    ReplyDelete
  7. अतिसुंदर कामगिरी

    ReplyDelete
  8. अतिशय सुंदर कामगिरी

    ReplyDelete