Monday, July 27, 2020

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया कोरोना परिस्थिती पाहता यावर्षी रद्द करावी याबाबत शासनास प्रस्ताव पाठवणार;प्रस्तावास मान्यता मिळेपर्यंत 27/2शासन आदेशानुसार बदली प्रक्रिया सुरू राहणार.


 27/07/2020 रोजी दुपारी 12.00 वा.शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या संदर्भात VC चे आयोजन करण्यात आले होते.

 सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे मॅडम,मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी साहेब,शिक्षण समिती सभापती आशाताई पाटील मॅडम, बांधकाम समिती सभापती जगन्नाथ माळी साहेब, समाजकल्याण समिती सभापती प्रमोद आप्पा शेंडगे, शिक्षण समितीचे सन्माननीय सदस्य,शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी,शिक्षणाधिकारी मॅडम, सर्व गट शिक्षणाधिकारी यांच्या झालेल्या ऑनलाइन मीटिंग मध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष मॅडम तसेच विषय समिती सभापती यांच्यासह  बहुसंख्य सहभागी पदाधिकारी यांनी कोरोना संसर्ग परिस्थिती पाहता,आशा परिस्थिती  यावर्षी शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या रद्द कराव्यात असे मत व्यक्त केले.

शिक्षक संघटना प्रतिनिधींनी ही याचप्रमाणे भूमिका व्यक्त केली.आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनी सर्वांची मते समजून घेवून बैठकीतील बहुसंख्य जणांची मते व सध्याची परिस्थिती पाहता, शिक्षकांची बदली प्रक्रिया रद्द करण्यास हरकत नाही. बैठकीतील चर्चेनुसार  "बदली प्रक्रिया यावर्षी कोरोना परिस्थिती पाहता रद्द करावी" असा शासनास प्रस्ताव पाठवला जाईल असे सांगितले...परंतु जो पर्यंत शासनाकडून सदर प्रस्तावास परवानगी मिळत नाही तो पर्यंत *27/2शासन आदेशानुसार संवर्ग निहाय याद्या तयार करणे,शिक्षकांकडून अर्ज घेणे याबाबत कार्यवाही सुरू राहील.त्यासंदर्भात वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल असे स्पष्ट केले.*
🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️🖋️
*प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती सांगली*

🖋️शब्दांकन - अमोल शिंदे🖋️
सदस्य शिक्षक संघटना समन्वय समिती सांगली....

Saturday, July 18, 2020

शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन,पारदर्शी कराव्यात

सांगली जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समिती ऑनलाईन बैठकीत सुर; सोमवारी समन्वय समितीकडून निवेदन दिले जाणार
आज सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीची ऑनलाईन बैठक पार पडली.या बैठकीत समन्वय समितीचे निमंत्रक बाबासाहेब लाड, शिक्षक समितीचे नेते किरण गायकवाड,दयानंद मोरे, शिक्षक संघ थोरात गटाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, हंबीरराव पवार, शिक्षक संघ शि.द.पाटील गटाचे जिल्हाध्यक्ष मुकुंद सूर्यवंशी,सरचिटणीस अमोल माने,शिक्षक भारती उर्दुचे राज्याध्यक्ष मुश्ताक पटेल,आश्रफ मोमीण, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन चे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे,पदवीधर शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुकाराम सावंत,शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष महेश शरणाथे,मागासवर्गीय शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष शिवाजी वाघमारे, संतोष कदम,अखिल भारतीय शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष भानुदास चव्हाण, पुरोगामी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिवाणजी देशमुख, मारुती शिरतोडे तसेच संघटनांचे इतर पदाधिकाऱ्यांनीही सहभाग घेतला.
बैठकीत शिक्षकांच्या बदल्या पारदर्शी होण्यासाठी त्या ऑनलाईन कराव्यात. 27/2 शासन आदेशातील त्रुटी दूर करण्यासाठी शासनाने समिती नेमली होती.संघटनांनी अनेक सुधारणा सुचवल्या होत्या त्यानुसार 27/2 धोरणानुसार बदल न करता त्यानुसारच पुन्हा ऑफलाईन बदल्या करण्यात येवू नयेत.बदल्यांची कार्यपद्धती स्पष्ट करण्यात यावी.कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर बदल्या कराव्यात.बदल्या करताना यापूर्वी बदली प्रक्रियेत गैरसोय झालेल्या शिक्षकांच्या रिक्त जागेवर विनंती बदल्या करण्यात याव्यात.आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना विनंती बदलीची संधी मिळावी.अशी मते बहुतांश शिक्षक संघटना प्रतिनिधींनी जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीची ऑनलाईन बैठकीत मत मांडले.
 सोमवारी समन्वय समितीची बैठक घेवून यावर्षीच्या बदल्या नेमक्या कशा होणार आहेत याबाबत स्पष्टता आणण्याबाबत निवेदन दिले जाणार असल्याचे संघटना समन्वय समितीचे निमंत्रक बाबासाहेब लाड यांनी माहिती दिली.

सांगली जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समिती सांगली

शब्दांकन
🖋अमोल शिंदे🖋
सदस्य संघटना समन्वय समिती...

Friday, July 17, 2020

नोकरी लागताना जमा केलेली मूळ कागदपत्रे जिल्हा परिषदेत असणाऱ्या शिक्षकांची यादी व सदर कागदपत्रे आपल्याकडे घेण्यासाठी कार्यपद्धती

नोकरी लागताना जमा करण्यात आलेली काही शिक्षक बंधू भगिनी यांची मूळ कागदपत्रे जिल्हा परिषदेमध्ये आहेत.त्यांच्या नावाची pdf यादी खालील Click Here बटनवर क्लिक करून डाऊनलोड करू शकता.

यादीत नाव असल्यास सदर मूळ कागदपत्रे आपल्याला मिळावीत असा मागणी अर्ज शिक्षण विभागात M.Y.पाटील साहेब यांच्याकडे दिल्यास आपली कागदपत्रे मिळतील.बाहेरच्या जिल्ह्यात असणाऱ्यांनी आपल्या नावाचा एक अर्ज ज्यांच्याकडे कागदपत्रे द्यायची आहेत त्यांना कागदपत्रे देण्याबाबत सहमती पत्र सोबत दिले तर कागदपत्रे मिळू शकतील.स्वतः येण्याचीही गरज नाही.आशा पद्धतीने सध्या परजिल्ह्यात असणाऱ्यांनी एकत्र दोन - चार जणांचे अर्ज एका कडे दिले तरी कागदपत्रे  मिळू शकतील.

कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे. सर्वत्र लॉकडाऊन आहे.आशा वेळी कागदपत्रे आणण्यासाठी जिल्हा परिषदेकडे येवू नये. कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर,लॉकडाऊन उठल्यानंतरच वरील प्रमाणे आपण आपली कागद पत्रे ताब्यात घ्यावीत.

सध्या घरीच राहा..सुरक्षित रहा..

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली
आपल्यासाठी आपणच

Wednesday, July 8, 2020

शिक्षक बँकेतील सर्व प्रकारच्या कर्जाचे व्याजदर 10 टक्के होऊ शकतो

( पूर्ण वाचाच...)

🖋️अमोल शिंदे🖋️

नुकतेच covid-19 संदर्भाने 1 लाख कर्ज 11 हप्त्यात कर्ज परतफेडीची देण्याची योजना आणली.या योजनेतून कर्ज काढणाऱ्यास कर्ज हप्ता ज्यादा होतो.कर्ज परतफेडीची मुदत अधिक असावे या अनुषंगाने तुलनात्मक अभ्यास करून मांडला.परंतु तो सकारात्मक घेऊन बदल करण्यापेक्षा  इतर बँकेचे कौतुक करणाऱ्यानी शिक्षक बँकेचा विचार स्वप्नात ही करू नये असा प्रतिसाद काही जबाबदार मंडळीनी दिला.सभासद हे बँकेचे मालक आहेत याचा विसरच पडला असावा कदाचित..शिक्षक बँकेचा स्वप्नात विचार करायला पहिल्यांदा निश्चिंत झोप लागण्यासाठी पहिल्यांदा व्याजदर कमी होणे आवश्यक आहे...अनेक सभासदांच्या झोपा उडल्या आहेत व ते स्वप्नात नाही तर जागे आहेत.डोळसपणे काही बाबी मांडत आहेत.त्यांना बँकेचे स्वप्न पहायचे नाही तर आपण घेतलेले कर्ज फेडण्यासाठी व्याजदरात प्रत्यक्ष दिलासा हवा आहे.आम्ही तुलना केली ती इतर बँकेच्या स्पर्धेत आपली बँक ताकतीने उभी रहावी ती सक्षम होताना सभासद ही सक्षम व्हावेत या धारणेतून. अनेकदा पतसंस्था व बँक याची तुलना होऊ शकत नाही...जिल्हा मध्यवर्ती राष्ट्रीयकृत बँकांशी तुलना होऊ शकत नाही अशी उत्तरे दिली जातात.ठीक आहे पण इतर कर्मचाऱ्यांच्या सहकारी बँकेशी तुलना करून त्यांनी अमलात आणलेल्या काही चांगल्या बाबी करता येतील का????