पेन्शन हक्क संघटन
माध्यमातून शिक्षकांनी जपली सामाजिक बांधिलकी
महाराष्ट्र राज्य
जुनी पेन्शन हक्क संघटन तासगाव कडून दोन ऑक्सीजन मशीन व आवश्यक औषधे पंचायत समिती तासगाव
सभापती कमलकाकी पाटील यांच्याकडे जुनी पेन्शन हक्क संघटन जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे पंचायत
समिती सदस्य संतोष आठवले,संभाजी पाटील,अर्जुन (बापू) पाटील जिल्हा परिषद सदस्य सांगली,
दिपाली पाटील सहाय्यक गटविकास अधिकारी तासगाव, प्रकाश कांबळे प्रभारी गटशिक्षणाधिकारी,
गीता शेंडगे शिक्षण विस्तार अधिकारी,अनिल सुर्यवंशी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या
उपस्थितीत देण्यात आले.
कोरोना महामारी
कालावधीत शाळा बंद पण शिक्षण ऑनलाईन माध्यमातून
शिक्षकांनी सुरू ठेवत कर्तव्य पार पाडताना कोविड योद्धा म्हणून चेक पोस्ट ड्युटी, कोविड सेंटर,सर्वेक्षण यासह सर्व जबाबदारी पार पाडत आहेत.जिल्ह्यातील युवा शिक्षक
जुनी पेन्शन योजना लागू करून आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्रयत्नशील असताना.सामाजिक
जाणिवेतून नेहमी कार्य करत आहेत.याच जाणिवेतून तासगाव तालुक्यातील युवा शिक्षकांनी
एकत्र येत दीड लाख निधी स्वयंप्रेरणेने जमा केला.त्यातून ग्रामीण रुग्णालयास 2 ऑक्सीजन
मशीन व आवश्यक औषधे, ऑक्सिमिटर, डिजिटल बी पी तपासणी मशीन, सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोज
इत्यादी उपयोगी साहित्य देण्यात आले.शिक्षकांनी प्रत्येक आपत्ती मध्ये सामजिक जाणिवेतून
आदर्श घालून दिला असून यावेळी ही पेन्शन हक्क संघटन ने आदर्श काम केल्याबद्दल सभापती कमलकाकी पाटील यांनी
कौतुक केले.इतर लोक ही याचा आदर्श घेतली असे उद्गार काढले.
तालुकाध्यक्ष महादेव
जंगम व जिल्हा सरचिटणीस राहुल कोळी ,महादेव पाटील,अशोक वायकर यांनी या उपक्रमात तालुक्यातील
शिक्षकांनी उत्सपूर्त सहभाग घेतल्याबद्दल सर्व शिक्षकांचे आभार व्यक्त केले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस
राहुल कोळी,तालुकाध्यक्ष महादेव जंगम, अनिल मोरे, सागर खाडे, यशोदीप माने,चंद्रकांत
पाटील अर्जुन जाधव, मुर्गेश पाटील,चेतन छल्लरे,
शरद खरमाटे,महादेव पाटील ,अशोक वायकर उपस्थित होते.
या मोहिमेस गट शिक्षणाधिकारी प्रकाश कांबळे साहेब,शिक्षण
विस्तार अधिकारी गीता शेंडगे,पत्रकार विलास साळुंखे यांनीही मदतनिधी देत पेन्शन हक्क
संघटन करत असलेल्या कार्यास पाठबळ दिले....
No comments:
Post a Comment