युती व उमेदवार निवड करण्याचे अधिकार निवडणूक निर्णय समितीस - जिल्हा व तालुका कार्यकारिणीच्या एकत्रित बैठकीत सर्वानुमते निर्णय
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
निवडणूक निर्णय समितीच्या जिल्हाध्यक्षपदी स्वप्नील मंडले यांची सर्वानुमते निवड
✊✊✊✊✊✊✊
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली ची जिल्हा कार्यकारणी बैठक तासगाव येथे पार पडली.या सभेमध्ये शिक्षक बँक निवडणूक बाबत उपस्थित तालुकाध्यक्ष,जिल्हा कार्यकारणी सदस्य यांनी मते मांडली. प्राथमिक शिक्षक बँक निवडणूकीत स्वतंत्र निवडणूक लढवली तर सध्याच्या सभासदांची संख्या पाहता निर्णायक बदल न होता केवळ इतराना लाभ होईल.
अशावेळी कर्जाचा व्याजदर 1 अंकी व निष्कळजी सभासदाचा मृत्यू झाल्यास वीस लाख रुपयांची मदत, वीस लाखापेक्षा कमी कर्ज असणाऱ्या कर्जदारास सर्व कर्ज माफ करून उर्वरित रक्कम देणे.(एखाद्या सभासदाचे एक लाख रुपये कर्ज असल्यास ते माफ करून उर्वरित 19 लाख रुपये त्या सभासदाच्या कुटुंबीयांना देणे.) हे होण्यासाठी निवडणुकीत युती करून वरील मुद्दे पूर्णत्वास आणण्यासाठी सर्व ताकत संघटन लावेल. तसेच येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जात असताना त्यासंदर्भात सर्व प्रकारची तयारी,सूक्ष्म नियोजन, युती व उमेदवार निवडीबाबत योग्य सर्वसमावेशक निर्णय घेण्यासाठी सर्व तालुका पदाधिकारी यांच्या चर्चेतून मा.अमोल शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते निवडणूक निर्णय समिती गठीत करण्यात आली. येणाऱ्या शिक्षक बँक निवडणुकीबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार या समितीला बहाल करण्यात आले. या समितीमध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील बांधवाना प्रतिनिधित्व देण्यात आले. ही समिती खालीलप्रमाणे
निवडणूक निर्णय समिती
स्वप्निल मंडले- अध्यक्ष-खानापूर,
संभाजी पाटील -शिराळा,
राहुल गणेशवाडे-मिरज,
महादेव जंगम-तासगाव,
रवी वारद-जत,
अजित मोहिते- कडेगाव,
बालाजी पवार-कवठेमहांकाळ,
तानाजी कांबळे-जत,
दीपक कबीर- आटपाडी
सर्व नूतन निवडणूक निर्णय समिती सदस्यांचे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन जिल्हा कार्यकारणी कडून सत्कार करण्यात आला. निवडणुक निर्णय समिती जो निर्णय घेईल तो अंतिम मानून ज्याच्यासोबत युती होईल त्या पॅनल चे 21 उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व संघटन पूर्ण ताकतीने मैदानात उतरेल.सभासदांना अपेक्षित बदल घडवण्यासाठी पेन्शन हक्क संघटन कटिबद्ध असेल असा सर्व उपस्थितांनी निर्धार व्यक्त केला.
@@ नोट अँड वोट @@
संघटनेकडून उमेदवारी मिळणाऱ्या उमेदवाराचा खर्च संघटन करणार/संचालक नेत्याला नव्हे सभासदांना बांधील हवा.पण निवडणुकीसाठी उभ्या रहाणाऱ्या उमेदवारांना स्वतः निवडणुकीसाठी खर्च करावा लागतो.निवडून आल्यावर जे स्वतःचा पैसा घालतात ते सत्तेतून त्या खर्चाची भरपाई करण्याचा प्रयत्न करतात.सभासद हित बाजूला होते.महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन कडून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचा खर्च संघटन स्वतः सभासदांकडून आर्थिक मदत घेवून करेल.सामान्य सभासदांचा आवाज बँकेत पोहचवण्यासाठी सर्व सभासदांनी पेन्शन हक्क संघटन उभा करणाऱ्या उमेदवारांना मदत करत नोट अँड वोट द्यावे.आपल्या कर्जाचा व्याजदर केवळ 1 टक्के कमी झाला तर 10 लाख कर्ज असणाऱ्या सभासदास महिन्याला जवळपास 1000 हप्ता कमी येणार आहे.आपला व्याजदर पेन्शन हक्क संघटन च्या भूमिकेमुळे जवळपास दोन टक्के कमी होणार आहे. त्यामुळे दीर्घकाळ हक्काचा फायदा सभासदांना मिळवायचा असेल तर स्वाभिमानी व आपले हक्काचे संचालक बँकेत पाठवणे आवश्यक आहे. फक्त आणि फक्त सभासद हित सामोरे ठेवून शिक्षक बँक निवडणूक लढवणाऱ्या आपल्या शिलेदारांना कोणताही जादाचा आर्थिक भार सहन करावा लागू नये. यासाठी निवडणूक कार्यासाठी अनावश्यक खर्चाला फाटा देऊन आवश्यक त्या गरजेच्या बाबींसाठी करावयाच्या खर्चासाठी सर्व बांधवानी मतासोबत आर्थिक सहकार्य करावे. असे अवाहन करत स्वतः(श्री. सागर खाडे सर ) 10000 रु दहा हजार रुपये मदतनिधी जाहीर केली व त्यांनी केलेल्या या अवाहनास ताबडतोब प्रतिसाद देत संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष स्वप्नील मंडले सर,जिल्हा कोषाध्यक्ष राजकुमार भोसले सर,जिल्हा कार्यवाहक नेताजी भोसले सर यांनी प्रत्येकी 10000 हजार रुपयांचा चेक निवडणूक मदत निधी म्हणून जिल्हा कोषाध्यक्ष राजकुमार भोसले सर यांच्या स्वाधीन केले.जिल्ह्यातील सर्वच सभासदांनी व्यवस्था परिवर्तन साठी शक्य ते सहकार्य करावे.👏👏👏👏👏👏👏👏
या संघटनप्रेमी शिलेदरांच्या सहकार्याबद्दल त्यांचे संघटन व सर्व DCPS बांधवांच्या वतीने मनःपूर्वक आभार,सर्व ज्येष्ठ शिक्षक बंधू भगिनी यांनीही संघटन करत असलेल्या प्रयत्नांना मदत करावी.नदी उगमाच्या ठिकाणी छोटी असते ती पुढे जाईल तसा प्रवाह रुंदावत जातो.छोट्या बांधवांनी सुरू केलेल्या प्रयत्नाला ज्येष्ठ बांधवांचे सहकार्य व्यवस्था परिवर्तनाचा उगम असेल.
जिल्हा मेळावा लवकरच
जिल्ह्यातील पेन्शन हक्क संघटन वर प्रेम करणाऱ्या सर्व ज्येष्ठ सभासद बंधू भगिनी यांचा मेळावा घेण्याचे ठरले.
.
तासगाव तालुकाध्यक्ष महादेव जंगम सर यांनी सर्व समावेशक असे प्रास्ताविक केले. जिल्हा सरचिटणीस राहुल कोळी सर यांनी आजपर्यंतची संघटन बांधणी व संघटनेच्या जमेच्या बाजूबाबत माहिती दिली.
सर्व तालुकाध्यक्ष व तालुका कार्यकारणी पदाधिकारी, जिल्हा कार्यकारणी सदस्य,महिला कार्यकारणी,तासगाव मधील उपस्थित सर्व बंधू भगिनी यांचे धन्यवाद🙏🙏
आजचा कार्यकर्ता मेळावा राहुल कोळी सर,जंगम सर, परीट मॅडम, अनिल मोरे सर,मुरगेश पाटील सर, अर्जुन जाधव, यशोदीप माने सर, स्नेहल मंडले मॅडम, अभिजित लंगडे, सर यांच्या सहकार्याने यशस्वी पार पाडली. सर्व बंधू भगिनी , पदाधिकारी व तासगाव टीम यांचे संघटनमार्फत आभार👏👏👏👏👏👏
व्यवस्था परिवर्तन हेच ध्येय...
आपल्यासाठी आपणच.....
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली
No comments:
Post a Comment