सर्व सामान्य सभासदांच्या नजरेत सांगली शिक्षक बँक...
वास्तव आणि अपेक्षा - भाग ०१
विषय - तुलनात्मक व्याजदर
🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔
(✒️✒️ रमेश मगदूम -मिरज एक सर्वसामान्य सभासद फोन नं.9767290767)
सर्व सामान्य सभासदांच्या नजरेत सांगली शिक्षक बँक...
वास्तव आणि अपेक्षा - भाग ०१
विषय - तुलनात्मक व्याजदर
🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔
(✒️✒️ रमेश मगदूम -मिरज एक सर्वसामान्य सभासद फोन नं.9767290767)
शिक्षक बँकेत व्यवस्था परिवर्तन म्हणजे नेमके काय होणार??
🖋️अमोल शिंदे 🖋️
स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळ सांगली
बदल छोटा...परिणाम मोठा...
🎗️भाग क्रमांक 2🎗️
कमी व्याजदरात गृह कर्ज व शैक्षणिक कर्ज योजना राबवली जाणार...
सभासद बंधू भगिनींनो 🙏🙏
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
जिल्हाभरातील शिक्षक बंधू भगिनी यांच्याशी संवाद साधताना त्या सर्वाकडून कमी व्याजदरात गृह कर्ज व शैक्षणिक कर्ज योजना राबवण्याची मागणी होत आहे.
शिक्षक बँकेत व्यवस्था परिवर्तन म्हणजे नेमके काय होणार??
🖋️अमोल शिंदे 🖋️
स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळ सांगली
शिक्षक बॅंकेतून सभासदांना लाभ देण्यासाठी खूप मोठ्या आर्थिक तरतुदीची आवश्यकता नाही... सभासद हित करण्याची इच्छाशक्ती महत्वाची आहे. काही छोट्या बाबी बदलून आपण कसा लाभ सामान्य सभासदांना देवू शकतो आपण क्रमशः पाहणार आहोत....
बदल छोटा...परिणाम मोठा...
🎗️भाग क्रमांक 1🎗️
ऑटो डेबिट पद्धत अवलंबली जाणार ती कशी व तिचे फायदे जाणून घेवू.स्वाभिमानी मंडळ सत्तेवर आल्यावर पहिल्या वर्षात प्राधान्याने ही पद्धत अस्तित्वात आणली जाईल.......
सभासद बंधू भगिनींनो आपण शिक्षक बँकेचे कर्ज काढतो...महिन्याला आपला कर्जाचा हप्ता वेतनातून कपात होतो.पण आपले वेतन प्रत्येक महिन्यात पुढे मागे होते.यामुळे
शिक्षकांचे पगार शालार्थ वेतन प्रणाली मधून होतात.पण आज जवळपास सहा सात वर्षे ही प्रणाली अस्तित्वात येवुन ही केवळ ऑनलाईन बिले बनवणे याच्यापुढे या प्रणालीचा थेट फायदा शिक्षकांना झाला नाही.उलट ONLINE व OFFLINE डबल बिले देण्याचा व्यापच वाढला आहे.शिक्षकांचे वेतन नियमित महिन्याच्या 1 तारखेला होण्यासाठी शालार्थ प्रणालीत आवश्यक बदल करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे भेट घेवून केली.यावेळी शालार्थ प्रणालीतील सुधारणे बाबत सविस्तर निवेदन देण्यात आले.
युती व उमेदवार निवड करण्याचे अधिकार निवडणूक निर्णय समितीस - जिल्हा व तालुका कार्यकारिणीच्या एकत्रित बैठकीत सर्वानुमते निर्णय
🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
निवडणूक निर्णय समितीच्या जिल्हाध्यक्षपदी स्वप्नील मंडले यांची सर्वानुमते निवड
✊✊✊✊✊✊✊
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली ची जिल्हा कार्यकारणी बैठक तासगाव येथे पार पडली.या सभेमध्ये शिक्षक बँक निवडणूक बाबत उपस्थित तालुकाध्यक्ष,जिल्हा कार्यकारणी सदस्य यांनी मते मांडली. प्राथमिक शिक्षक बँक निवडणूकीत स्वतंत्र निवडणूक लढवली तर सध्याच्या सभासदांची संख्या पाहता निर्णायक बदल न होता केवळ इतराना लाभ होईल.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली कडून मा.ना. हसन मुश्रीफ साहेब, ग्राम विकास मंत्री महाराष्ट्र शासन यांना शिक्षण सेवक पद्धत बंद करणे शिक्षणसेवक मानधन वाढ करणेबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली कडून निवेदन देण्यात आले.याबाबत मंत्रिमंडळात चर्चा आश्वासन यावेळी ग्रामविकास मंत्री महोदयांनी दिले.
यावेळी दिलेल्या निवेदनात राज्यातील शिक्षण सेवक पद्धत बंद करण्यात यावी.त्याचवेळी याबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत शिक्षणसेवकाना 24000 मानधन देण्यात यावी.अशी मागणी करण्यात आली.
"जिल्हा परिषद शाळातच गुणवत्तापूर्ण शिक्षण;प्रयत्नवादी शिक्षकांच्या प्रयत्नांना साथ देणार" -नूतन तहसीलदार डी.एस.कुंभार
आज मिरजेचे नूतन तहसीलदार डी.एस.कुंभार साहेब यांचे महारष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन कडून स्वागत जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे,तालुकाध्यक्ष रमेश मगदूम,कार्याध्यक्ष राहुल गणेशवाडे,महिला आघाडी प्रमुख जयश्री कुंभार,मिरज तालुका संघटक शुभांगी पाटील,सविता जाधव यांनी केले.
यावेळी नूतन तहसीलदार डी.एस.कुंभार साहेब यांनी जिल्हा परिषद शाळातच गुणवत्तापूर्ण शिक्षण;प्रयत्नवादी शिक्षकांच्या प्रयत्नांना साथ देवू असे प्रतिपादन केले.आज अनेक यशस्वी लोक जिल्हा परिषद शाळांमधून शिकलेले आहेत.जिल्हा परिषद शाळा खूप महत्वाच्या असून शिक्षक हा समाजाला दिशा देणारा घटक असून सक्षम शिक्षक,सक्षम समाज घडवतात असे उद्गार काढले.यावेळी शाळांच्या भौतिक विकासासाठी व गुणात्मक वाढीसाठी मार्गदर्शन करण्याची विनंती संघटन कडून करण्यात आली.