Saturday, December 28, 2019

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन मिरज तालुकाध्यक्षपदी रमेश मगदूम यांची निवड

दिनांक  28 डिसेंबर 2019 रोजी मिरज तालुक्यातील सर्व 1 नोव्हेंबर 2005 सेवेत आलेल्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची कार्यशाळा संपन्न झाली.

जुनी पेन्शन हा हक्क मिळवण्यासाठी गेली चार वर्षे आपले संघटन सातत्याने प्रयत्न करत आहे.याच अनुषंगाने जिल्हातील प्रत्येक तालुक्यात या कार्यशाळेचे आयोजन केले जाणार असून.यातील पहिली कार्यशाळा मिरज तालुक्यात घेतली.

या कार्यशाळेमध्ये 
सागर खाडे  (राज्य समन्वयक)
अमोल शिंदे (जिल्हाध्यक्ष)
विरेश हिरेमठ(कार्याध्यक्ष)
नेताजी भोसले (जिल्हा कार्यवाहक)
राजकुमार भोसले(जिल्हा कोषाध्यक्ष)
पी.डी.शिंदे(IT सेल प्रमुख)
गूरुबसू वाघोली(जत तालुका अध्यक्ष)
मिलन नागने (जिल्हा संघटक)
यांनी 1.नवीन सरकार येताच संघटन कडून अधिवेशन काळात केलेला पाठपुरावा व सरकारचा दृष्टिकोन याबाबत माहिती...

2.जुनी पेन्शन कधी व कशी मिळणार??

3.जुनी पेन्शन चळवळ आता पर्यंत आपल्याला काय देवून गेली?

4.NPS मध्ये शिक्षकांना वर्ग केले जाणार आहे त्याबाबत संघटन भूमिका....

5.तालुका,जिल्हा स्तरावरील प्रश्न तसेच शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव मंजुरी कार्यवाही याबाबत माहिती....

6.संघटन पुढील दिशा व आपली भूमिका..
याबाबत माहिती देवून चर्चा केली.

यावेळी राज्य संघटन कडून पुढील काळात घेतल्यास जाणाऱ्या कार्यक्रमांची कल्पना दिली. नागपूर अधिवेशनाच्या वेळी राज्य कार्यकारणीकडून केलेल्या कामांचा पाठपुरावा तसेच मुख्यमंत्री व मंत्रीमहोदयांच्या भेटी मध्ये झालेल्या चर्चा व त्यातून पुढील काळात संघटनेकडून करावा लागणारा पाठपुरावा यासंबंधी चर्चा झाली.

जुनी पेन्शन साठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नासाठी वस्तीशाळा शिक्षकांनी दिलेला लढा प्रेरणादायक असून त्यासंदर्भात शिवाजी सूर्यवंशी सर यांनी अतिशय मार्मिक मार्गदर्शन केले. पेन्शनचा हा लढा सर्वांनी एकत्रित येऊन आक्रमकपणे लढला गेला पाहिजे तरच अंतिम ध्येयापर्यंत पोहोचू यासाठी सर्वांना विनंती ही केली.

मिरज तालुका कार्यकारणीने तालुका अध्यक्ष आकाश जाधव यांच्या नेतृत्वात नेहमीच पेन्शन चळवळ पुढे नेली.जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांना खंबीर साथ दिली.तालुका अध्यक्ष आकाश जाधव सर यांची जिल्हा कार्यकारणी वर जिल्हा संघटक पदावर निवड करण्यात आली. तसेच मिरज तालुका कार्यकारणी कालावधी पूर्ण झाल्याने नव्याने कार्यकारणी तयार करण्यात आली.

यामध्ये एक अभ्यासू,आक्रमक व संघटनात्मक कार्याची आवड असणारे,कुशल व्यक्तिमत्व रमेश मगदूम यांची तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. 

यावेळी निवडण्यात आलेली मिरज तालुक्याची नूतन कार्यकारणी खालील प्रमाणे.....

1.रमेश मगदूम (तालुकाध्यक्ष)
2.दिलीप नरुटे (कार्याध्यक्ष)
3.राहुल गणेशवाडे (उपाध्यक्ष)
4.अनिल मोहिते (सरचिटणीस)
5.निलेश कांबळे (कोषाध्यक्ष)
6.परशुराम जाधव (मीडिया प्रमुख)
7.सुनील लांडगे (संपर्क प्रमुख)
8.अमोल सातपुते (प्रवक्ते)
9. सुखदेव बंडगर (तालुका संघटक)
10. संजय गडदे (माध्य. विभाग प्रमुख)
11.प्रमोद होनमोरे(प्रसिध्दी प्रमुख)

तालुका महिला संघटक
1. योगिता रघुवीर अथनीकर
2.प्रीती कांबळे
3.शुभांगी पाटील
4.सविता जाधव
5.संपदा भानुसे
6.सुवर्णा गळवे
7.स्नेहा रणदिवे 

तालुका कार्यकारिणीवर असणाऱ्या सदस्यांपैकी काही सदस्यांची जिल्हा कार्यकारिणीवर निवड करण्यात आल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन करण्यात आले.

 🏵 आकाश जाधव सर (जिल्हा संघटक ) 

 🏵 जयश्री कुंभार (महिला जिल्हा संघटक)* 

केंद्र संघटक-
पांडुरंग नाईक (आरग )
सुनील लांडगे (खटाव )
प्रशांत गायकवाड (एरंडोली) रिजवाना बगारे ( मालगाव) विनायक पाटील (खंडेराजुरी) गणेश ढेरे (सोनी)
 प्राची मगदूम (माधवनगर)
 सुधीर जाधव (कसबे डिग्रज) सुनील गावडे (बेडग)
वैजनाथ आवताडे (म्हैसाळ)

नूतन तालुका कार्यकारणी व केंद्र संघटक यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा

यावेळी कार्यशाळेस माध्यमिक शिक्षक भरती चे पदाधिकारी संजय पवार सर,आरिफ गोलंदाज,रतन कुंभार सर उपस्थित होते.तसेच उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक,शिक्षकेतर DCPS धारक उपस्थित होते.
💐💐💐💐💐💐💐💐

🖋राजकुमार भोसले🖋
जिल्हा कोषाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली

No comments:

Post a Comment