Saturday, May 30, 2020

राष्ट्रीयकृत बँकांच्या सॅलरी पॅकेज बाबत

 बँक ऑफ बडोदाने BSNL व MTNL सॅलरी व पेन्शन खात्यांसाठी  अपघाती निधन असणारी विमा योजना विस्तारित केली असून महाराष्ट्रातील जिल्हा परिषद कर्मचारी यांना ही मिळू शकते 90 लाखांचे विमा कवच

विविध राष्ट्रीयकृत बँकेत पगार खाते असल्यास संबंधित कर्मचाऱ्यांचे अपघाती निधन झाल्यास त्यांना विमा कवच असल्याने 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत व्हावेत यासाठी संघटन प्रयत्नशील आहे. त्यास काही प्रमाणात यश आले असून लवकरच आपल्याला आपणास हव्या त्या राष्ट्रीयकृत बँकेत पगार मिळेल...

आशावेळी बँक निवड करताना आपल्याला माहिती असावे म्हणून विविध बँकेच्या सॅलरी पॅकेज माहितीपत्रके सोबत पाठवत आहे.

यापूर्वी बँक ऑफ इंडिया कडून सर्वाधिक विमा संरक्षण मिळत होते.  त्यामुळे बँक ऑफ इंडिया मध्ये बऱ्याच जणांनी खाती काढली आहेत.

Friday, May 29, 2020

शिक्षकांच्या पगारा बाबत निघणार पत्रक


महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगलीचे सातत्यपूर्ण प्रयत्न..

1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू नाही. आशावेळी राष्ट्रीयकृत बँकेत सॅलरी पॅकेज अंतर्गत पगार झाल्यास विमा संरक्षण मिळते.नुकतेच बँक ऑफ बडोदा ने या योजने अंतर्गत सर्वाधिक 40 लाख विमा संरक्षण देणारी योजना आणली असून,बँक ऑफ इंडिया,स्टेट बँक ऑफ इंडिया,युनियन बँक याही कमी अधिक प्रमाणात लाभ देतात.यातील अधिक लाभ देणारी व सोयीस्कर बँक निवडण्याचे स्वातंत्र्य शिक्षकांना असावे....

त्या अनुषंगाने 13 मार्च रोजी वेतन व अन्य शासकीय ठेवी खाती राष्ट्रीयकृत बँकेत ठेवण्याबाबत शासन निर्णय निर्गमित झाला आहे. शिक्षकांना त्यांचा पगार त्यांना हव्या त्या बँकेत घेण्याचे स्वातंत्र्य

Friday, May 22, 2020

वरिष्ठ वेतन श्रेणी बाबत

 २४/०२ व २०/०३ मध्ये मंजूर झालेल्या वरिष्ठ वेतन श्रेणी यादीमधील शिक्षकांचे वेतन निश्चिती आदेश यापूर्वी तयार केले होते. या संदर्भातील काम पंचायत समिती कार्यालयातील क्लार्क एस.डी. पाटील करत होते. त्यांनी तयार केलेले वेतन निश्चिती आदेश मधील वेतनाचे अंतिम आकडे जरी बरोबर असले तरी वेतन निश्चितीची पद्धत थोडी चुकीची होती.
 
या सर्व गोष्टींचा व वेतन निश्चिती त्रुटींचा अभ्यास करून अमोल शिंदे सर , पी. डी. शिंदे सर व मी शनिवार व रविवार दोन दिवस प्रत्येक बाबीवर चर्चा करून पी. डी. शिंदे सरांच्या मदतीने अचूक असे वेतन निश्चिती आदेश पुन्हा तयार केले.

Friday, May 15, 2020

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन कडून ना.विश्वजित कदम साहेबाना निवेदन

आज दिनांक 15 मे 2020 रोजी मा.ना.विश्वजित कदम सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा राज्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली कडून covid-19 संदर्भाने चेक पोस्ट व अन्य ठिकाणी कार्य करत असलेल्या शिक्षक कर्मचारी यांच्या सुरक्षितता व विमा व राष्ट्रीयकृत बँकेत वेतन बाबत  जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे,जिल्हा कोषाध्यक्ष राजकुमार भोसले,जयसिंग पाटील सर यांनी निवेदन देवून चर्चा केली.

    यावेळी जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कोळी वस्ती येथे कार्यरत असणारे शिक्षक नानासो सदाशिव कोरे यांचे covid-19 साथ रोखण्यासाठी चेक पोस्ट वर कर्तव्य बजावताना ट्रक चालकाने चिरडल्याने दुर्दैवी निधन झाले. या दुःखद घटनेने covid-19 विरोधात

Thursday, May 14, 2020

जत टीमकडून तहसीलदार व गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन.

👆👆👆👆👆👆
*आज दिनांक 14 मे 2020 रोजी जुनी पेन्शन हक्क संघटन जत यांच्यावतीने जत तहसीलदार माननीय पाटील साहेब  व आपले पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी माननीय श्री शिंदे साहेबांना विविध मागणीसाठी निवेदन देण्यात आले*..   
या निवेदनात 
👉 *डफळापुर केंद्रातील कोळी वस्ती शाळेचे श्री. नानासो कोरे सर यांनी चेक पोस्टवर काम करत असताना दुर्देवी घटनेत निधन झाले. त्यांचे पश्चात  कुटुंबाला कोरोना कर्तव्य बजावताना झालेल्या बलिदान लक्षात घेता विमा मिळावा. ही  प्रमुख मागणी करण्यात आली.त्यांच्या धर्मपत्नीला अनुकंपा खाली नोकरी द्यावी, केंद्र व राज्य शासनामार्फत