Saturday, May 30, 2020

राष्ट्रीयकृत बँकांच्या सॅलरी पॅकेज बाबत

 बँक ऑफ बडोदाने BSNL व MTNL सॅलरी व पेन्शन खात्यांसाठी  अपघाती निधन असणारी विमा योजना विस्तारित केली असून महाराष्ट्रातील जिल्हा परिषद कर्मचारी यांना ही मिळू शकते 90 लाखांचे विमा कवच

विविध राष्ट्रीयकृत बँकेत पगार खाते असल्यास संबंधित कर्मचाऱ्यांचे अपघाती निधन झाल्यास त्यांना विमा कवच असल्याने 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत व्हावेत यासाठी संघटन प्रयत्नशील आहे. त्यास काही प्रमाणात यश आले असून लवकरच आपल्याला आपणास हव्या त्या राष्ट्रीयकृत बँकेत पगार मिळेल...

आशावेळी बँक निवड करताना आपल्याला माहिती असावे म्हणून विविध बँकेच्या सॅलरी पॅकेज माहितीपत्रके सोबत पाठवत आहे.

यापूर्वी बँक ऑफ इंडिया कडून सर्वाधिक विमा संरक्षण मिळत होते.  त्यामुळे बँक ऑफ इंडिया मध्ये बऱ्याच जणांनी खाती काढली आहेत.
नुकतेच बँक ऑफ बडोदा ने BSNL व MTNL सॅलरी व पेन्शन खात्यांसाठी असणारी आपली विमा योजना विस्तारित करत ती महाराष्ट्रातील जिल्हा परिषद कर्मचारी यांना ही लागू करण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबत पत्रक सोबत पाठवत आहे...

बँक ऑफ बडोदा पत्रकात नमूद असले प्रमाणे अपघाती निधन झाल्यास जवळपास 90 लाखांचे विमा संरक्षण मिळणार आहे.त्याचबरोबर 3 लाखापर्यंत ओव्हर ड्राफ्ट सुविधा व अन्य सुविधा मिळणार आहेत.

याशिवाय बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया,यु बँक या राष्ट्रीयकृत बँक ही आपल्या सॅलरी पॅकेज अंतर्गत लाभ देतात.

त्यामुळे आपले पगार खाते काढताना अधिक लाभ व आपल्याला मिळणाऱ्या सुविधा,सोय यांचा विचार करून केंद्र प्रमुख यांच्याशी चर्चा करून प्रशासनाच्या मार्गदर्शनाने बँकेत खाते काढावे....

सध्या प्रत्येक बँक कमी अधिक लाभ देत असली तरी प्रत्येकजण वेगवेगळ्या बँक निवडू लागले तर केंद्रप्रमुख याना सर्व बॅंक मध्ये पगार करणे शक्य होणार नाही त्यामुळे आपल्या परिसरात सोयीची बँक निवड करणे श्रेयस्कर...जेव्हा CMP प्रणाली सुरू होईल तेव्हा प्रत्येकाला हव्या त्या बँकेत पगार घेणे शक्य.सध्या तीन जिल्ह्यात प्रायोगिक CMP प्रणालीने पगार झाले आहेत.लवकरच इतर जिल्ह्यात ही याबाबत कार्यवाही राज्य स्तरावरून होईल आशी आशा आहे...

सोबत बँक ऑफ बडोदा,बँक ऑफ इंडिया,स्टेट बँक ऑफ इंडिया यांची सॅलरी पॅकेज माहिती पत्रक पाठवत आहे.. हे माहितीपत्रक PDF स्वरूपात असून खाली बँकेच्या नावावर क्लिक करून करून ते डाऊनलोड करून घ्या.


- अमोल शिंदे, जिल्हाध्यक्ष MRJPHS सांगली

No comments:

Post a Comment