Saturday, July 18, 2020

शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन,पारदर्शी कराव्यात

सांगली जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समिती ऑनलाईन बैठकीत सुर; सोमवारी समन्वय समितीकडून निवेदन दिले जाणार
आज सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीची ऑनलाईन बैठक पार पडली.या बैठकीत समन्वय समितीचे निमंत्रक बाबासाहेब लाड, शिक्षक समितीचे नेते किरण गायकवाड,दयानंद मोरे, शिक्षक संघ थोरात गटाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, हंबीरराव पवार, शिक्षक संघ शि.द.पाटील गटाचे जिल्हाध्यक्ष मुकुंद सूर्यवंशी,सरचिटणीस अमोल माने,शिक्षक भारती उर्दुचे राज्याध्यक्ष मुश्ताक पटेल,आश्रफ मोमीण, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन चे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे,पदवीधर शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुकाराम सावंत,शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष महेश शरणाथे,मागासवर्गीय शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष शिवाजी वाघमारे, संतोष कदम,अखिल भारतीय शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष भानुदास चव्हाण, पुरोगामी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिवाणजी देशमुख, मारुती शिरतोडे तसेच संघटनांचे इतर पदाधिकाऱ्यांनीही सहभाग घेतला.
बैठकीत शिक्षकांच्या बदल्या पारदर्शी होण्यासाठी त्या ऑनलाईन कराव्यात. 27/2 शासन आदेशातील त्रुटी दूर करण्यासाठी शासनाने समिती नेमली होती.संघटनांनी अनेक सुधारणा सुचवल्या होत्या त्यानुसार 27/2 धोरणानुसार बदल न करता त्यानुसारच पुन्हा ऑफलाईन बदल्या करण्यात येवू नयेत.बदल्यांची कार्यपद्धती स्पष्ट करण्यात यावी.कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर बदल्या कराव्यात.बदल्या करताना यापूर्वी बदली प्रक्रियेत गैरसोय झालेल्या शिक्षकांच्या रिक्त जागेवर विनंती बदल्या करण्यात याव्यात.आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना विनंती बदलीची संधी मिळावी.अशी मते बहुतांश शिक्षक संघटना प्रतिनिधींनी जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीची ऑनलाईन बैठकीत मत मांडले.
 सोमवारी समन्वय समितीची बैठक घेवून यावर्षीच्या बदल्या नेमक्या कशा होणार आहेत याबाबत स्पष्टता आणण्याबाबत निवेदन दिले जाणार असल्याचे संघटना समन्वय समितीचे निमंत्रक बाबासाहेब लाड यांनी माहिती दिली.

सांगली जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समिती सांगली

शब्दांकन
🖋अमोल शिंदे🖋
सदस्य संघटना समन्वय समिती...

1 comment: