( पूर्ण वाचाच...)
🖋️अमोल शिंदे🖋️
नुकतेच covid-19 संदर्भाने 1 लाख कर्ज 11 हप्त्यात कर्ज परतफेडीची देण्याची योजना आणली.या योजनेतून कर्ज काढणाऱ्यास कर्ज हप्ता ज्यादा होतो.कर्ज परतफेडीची मुदत अधिक असावे या अनुषंगाने तुलनात्मक अभ्यास करून मांडला.परंतु तो सकारात्मक घेऊन बदल करण्यापेक्षा इतर बँकेचे कौतुक करणाऱ्यानी शिक्षक बँकेचा विचार स्वप्नात ही करू नये असा प्रतिसाद काही जबाबदार मंडळीनी दिला.सभासद हे बँकेचे मालक आहेत याचा विसरच पडला असावा कदाचित..शिक्षक बँकेचा स्वप्नात विचार करायला पहिल्यांदा निश्चिंत झोप लागण्यासाठी पहिल्यांदा व्याजदर कमी होणे आवश्यक आहे...अनेक सभासदांच्या झोपा उडल्या आहेत व ते स्वप्नात नाही तर जागे आहेत.डोळसपणे काही बाबी मांडत आहेत.त्यांना बँकेचे स्वप्न पहायचे नाही तर आपण घेतलेले कर्ज फेडण्यासाठी व्याजदरात प्रत्यक्ष दिलासा हवा आहे.आम्ही तुलना केली ती इतर बँकेच्या स्पर्धेत आपली बँक ताकतीने उभी रहावी ती सक्षम होताना सभासद ही सक्षम व्हावेत या धारणेतून. अनेकदा पतसंस्था व बँक याची तुलना होऊ शकत नाही...जिल्हा मध्यवर्ती राष्ट्रीयकृत बँकांशी तुलना होऊ शकत नाही अशी उत्तरे दिली जातात.ठीक आहे पण इतर कर्मचाऱ्यांच्या सहकारी बँकेशी तुलना करून त्यांनी अमलात आणलेल्या काही चांगल्या बाबी करता येतील का????
रयत सेवक को ऑपरेटिव्ह बँकेचे 26 मे 2020 चे परिपत्रक वाचनात आले.त्यामध्ये कोणत्याही कर्ज प्रकाराचा जास्तीत जास्त व्याजदर 10 टक्के व कमीत कमी व्याज दर 5 टक्के इतका आहे.....ही बँकेच आहे,पगारदार नोकरदारांची त्यामुळे आपली बँक व ही बँक यांना रिझर्व बँकेचे नियम सारखेच असावेत....बऱ्याच दा नियमांची अडचण सामान्य सभासदास सांगितली जाते....
वेगवेगळ्या प्रकारची जमीन की कर्ज 10 टक्के व 9.75 टक्के तर गृहकर्ज 7.25 टक्के व्याजदराने,शैक्षणिक कर्ज 45 लाखापर्यंत केवळ 5 टक्के व्याजदराने रयत सेवक को ऑपरेटिव्ह बँक देते व आपली?
पुन्हा ही तुलना योग्य अयोग्य यापेक्षा व्याजदर कमी करण्याबाबत विचार होणे आवश्यक...लाखोंची कर्ज काढताना महिन्याला हजारोंची कात्री सभासदाच्या खिशाला लागत आहे.ती कमी झाल्यास नक्की सभासद हित साधले जाईल.पण प्रत्येक बाबीकडे राजकारण म्हणून पाहणे सोडणे आवश्यक आहे.काही जण तर हे तुम्हाला करणे शक्य आहे का? असा प्रतिप्रश्न ही करतात.आम्ही सामान्य सभासद आहोत.बँकेचा कारभार पुढे नेण्यासाठी आम्ही संचालक मंडळ निवडून दिले आहे व त्यांनीच ते करायचे आहे.आणि वरील इतर बँकेप्रमाने कमी व्याजदरात कर्ज नक्की आपण देवू शकू असा विश्वास वाटतो.काहीजण सुधारणा सुचवायचे तर समाजमाध्यमात न लिहता प्रत्यक्ष बँकेस कळवावे असे सांगतात.पण एखाद्या व्यक्तीच्या म्हणण्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते.त्यामुळे काही बाबी तुलनात्मक सभासदांपुढे मांडल्यास ते अधिक संख्येने मागणी केल्यास सकारात्मक बदलाचा विचार बँकेचे कार्यकारी संचालक मंडळ करेल यासाठी समाज माध्यमात लिहने क्रमप्राप्त...तसेही सभासदाला मोकळेपणाने आपले म्हणणे मांडण्यासाठी काही मिनिटे चालणाऱ्या सर्वसाधारण सभेत संधी मिळत नाही अशावेळी समाज माध्यम आमचे म्हणणे मांडण्याचे एक व्यासपीठ....
वरील काही बाबींचा सकारात्मक विचार करून बदल होण्यासाठी प्रयत्न व्हावेत ही विनंती...तसेच सुज्ञ सभासदांनी थोडेसे जागृत असणे गरजेचे सत्ताधारी,विरोधक या दोन गटातील विभागणी त सभासद मात्र हरवत आहे.त्या सामान्य सभासदाचा आवाज मांडण्याचा प्रयत्न आहे.कोणाला विरोध करण्याचा किंवा कोणाला मदत करण्याचा हेतू नाही.....
आपला
🖋️अमोल शिंदे🖋️
एक सामान्य सभासद
9420453475

Nice thoughts
ReplyDelete