🖋️अमोल शिंदे🖋️
आज आंतरजिल्हा बदली झालेली यादी पाहिली एककिकडे आनंद तर दुसरीकडे जीवाभावाचे सहकारी दूर जात असल्याचे दुःख.
आज महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली जेथे आहे तेथे पोहचवण्यात ज्या बांधवांनी खूप मोलाचे योगदान दिले.स्वराज्यातील मावळे ज्या निष्ठेने योगदान द्यायचे त्याच तोडीचे योगदान या जुनी पेन्शन चळवळीत या लढाऊ शिलेदारांनी दिले.विशेषतः जत तालुक्यातील कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर पंपटवार मूळ नांदेड जिल्ह्याचे असणारे सर कधी परजिल्ह्यातील आहेत असे वाटत नव्हते.जत शहरात आपल्या सुस्वभावाने मोठा मित्रवर्ग जोडलेला...हिवरे मधून सोरडीला बदली झाल्याने पूर्व व पश्चिम दोन्ही भागातील शिक्षकांचा चांगला संपर्क.क्रिकेटची उत्कृष्ट गोडी व जिल्हा परिषद सांस्कृतिक कार्यक्रमात ज्यांच्या टीमचे नृत्य सर्व सभागृह दणाणून सोडे,अगदी सीईओ साहेबांनी ही गाणे वन्स मोअर घ्यायला लावून स्वतः सहभाग घेतला. शिवाजी अवताडे सर नेहमी कोणतेही काम जबाबदारीने पूर्ण करणारे व्यक्तिमत्व ....आटपाडी मधील विठ्ठल गुट्टे सर मला कार्यप्रवण करणारे व्यक्तिमत्व...कारण कोणताही प्रश्न निर्माण झाला की सरांचा मेसेज यायचा व मी वाचून दिला नाही की लगेच सरांचा मेसेज अमोलराव रिप्लाय द्या....मला ही हा हक्काचा मेसेज बरा वाटतो...म्हणून अनेकदा रिप्लाय उत्तर असून ही सरांचा तसा मेसेज यायची वाट बघत असतो... दशरथ अतीवाडकर अलिकडल्या काळात परिचय झालेले एक दिलखुलास व्यक्तिमत्व....जत टीम स्टेजवर तर सभागृहात खुर्चीवर दशरथ सर व त्यांची टीम याना पाहण्याचा आनंद वेगळाच...अगदी विनोदी पण खोचक वक्तृत्व.... मैड सर आटपाडी तालुक्यातील एक तंत्रस्नेही शिक्षक मित्र.सर्व आटपाडीकरांचा अंशदान पेन्शन हिशेब चोख ठेवणारे व्यक्तिमत्व...
शिराळ्याचे वैभव डाकरे,प्रवीण डाकरे या दोन बंधूंनी जिल्ह्याच्या शैक्षणिक उठावात दिलेले योगदान खूप महत्वाचे.वाळव्याचे सचिन पाटील,संदीप कोळी निर्मळ मनाचे मित्र.विठ्ठल पाटील,गणेश पारधी, मेश्राम सर,अमोल खरात,सुर्यवंशी सर,विनोद जाधव यासोबत आमचे ज्येष्ठ बांधव केंद्र प्रमुख भास्कर गंभीरे, दिगंबर तोरकड,आमच्या महिला भगिनी बदलीने आपल्या जिल्ह्यात जात आहेत. हे सगळे आपापल्या जिल्ह्यात जात आहेत याचा आनंद आहे सोबतच हे आपले आपल्या परिवारातील लोक थोडे दूर चालले याचे दुःख ही आहे....
आपण सर्वांनीच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन परिवाराचे सदस्य म्हणून सदैव आपले कर्तव्य पार पाडले. संघटन सक्षम करण्यात योगदान दिले.यापुढे ही आपली बदली झाली असली तरी हे ऋणानुबंध अधिक दृढ राहतील.आपल्या प्रत्येक अडचणीत,सुख दुःखाच्या प्रसंगात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन परिवार एकजुटीने सोबत असेल.आपल्या पुढील वाटचालीस मनस्वी शुभेच्छा....आपल्या जिल्ह्यात आपल्याला इच्छित सोयीचा तालुका मिळावा,त्या तालुका व जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात आपले योगदान महत्त्वाचे असावे याच माझ्याकडून आपणास सदिच्छा....संघटन वाटचालीस आपले मार्गदर्शन नेहमी आपण हक्काने करावे....
MRJPHS सांगलीचे आपले ब्रिद....आपल्यासाठी आपणच..
हे सदैव आपण असाल तेथे जपत राहू....
सदैव आपला...
🖋️अमोल शिंदे🖋️
जिल्हाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली
9420453475
Right sir 👌👌👍👍🙏🙏🙏👊👊💪💪💪
ReplyDelete