Tuesday, August 18, 2020

हिशेब मिळाला म्हणजे झाले ???

 PDF स्वरूपात सोबत एक अर्ज नमुना देत आहोत. योग्य वाटल्यास आपण तो देवून आपला असंतोष व्यक्त करू...

खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन अर्ज नमुना डाऊनलोड करा.


🖋️अमोल शिंदे🖋️

जिल्हाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली

9420453475

शिक्षकांना NPS मध्ये वर्ग करण्याबाबत सुरू कार्यवाही संदर्भात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.NPS मध्ये वर्ग होताना पूर्वी झालेल्या कपातीचा हिशेब मिळाला म्हणजे झाले??

आपल्याला माहीत आहे यापूर्वी आपण हिशेब चिट्टी मिळण्यासाठी आंदोलन केले होते.त्यानंतर 2016 पर्यंत हिशेब देण्यात आला होता.त्यात अनेक त्रुटी होत्या.मुळात आपल्या कपातीचा हिशेब देणे प्रशासनाची जबाबदारी आहे.पण DCPS योजना अमलबजाणीकडे इतके दुर्लक्ष होते की आपल्या पगारातून कपात रकेमचे शेड्युल नियमित जिल्ह्याला तालुक्यातून पाठवली गेली नाहीत.त्यामुळे प्रत्यक्ष पगारातून झालेली कपात व मिळालेल्या हिशेब चिट्टी यांच्यात तफावत दिसत होती.यानंतर सदर सर्व शेड्युल पंचायत समिती कडून मागवून सर्व नोंदी वित्त विभागात रजिस्टर वर करण्याचे काम गेली वर्षभर सातत्याने सुरू असून जवळपास सदर काम पूर्णत्वास गेले आहे.आता त्या नोंदी सॉफ्टवेअर वर घेवून आपल्याला आपले हिशेब पुढील काही काळात दिले जातील.परंतु खरा प्रश्न हा आहे की केवळ हिशेब दिला म्हणजे झाले काय???


आपण हे लक्षात घ्यायला हवे आपल्या पगारातून 2009 पासून कपात होते.खरेतर शिक्षकांच्या बाबतीत 29 ऑक्टोबर 2010 ला  DCPS बाबत कार्यपद्धती आली पण आपल्या येथे कपात 2009 पासून सुरु झाली.2015 पर्यंत हे सुरू होते.दर वर्षी फंडाच्या स्लीप वेळेत मिळाव्यात म्हणून धडपड दिसत होती.पण आमचे अंशदान पेन्शन साठी पैसे कपात होतात त्याचे काय होते?याचा प्रश्न या सहा वर्षात कोणाला ही पडला नाही हे दुर्दैव....महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन निर्मिती नंतर सांगली संघटन ने माहिती अधिकार अंतर्गत याबाबत माहिती मागवली,त्यानंतर तीव्र आंदोलन केले....हिशेब बाबत कार्यवाही सुरू झाली....मात्र खरा प्रश्न हा आहे ज्या अंशदान पेन्शन योजनेसाठी गेली 11 वर्षे आमच्या पगारातून कपात झाली.त्या योजनेनुसार आमच्या कपातीच्या सममूल्य शासन हिस्सा जमा करून एकत्रित रक्कम फंड मॅनेजर कंपनी कडून मार्केट मध्ये गुंतवणे आवश्यक होते.पण आज अखेर याबाबत कार्यवाही झाली नाही.एकीकडे आमच्या पगारातून कपात केली...पण शासनाने आपला हिस्सा वेळीच दिला नाही....आमचा हिस्सा ही या योजनेनुसार गुंतवला नाही?पुढे आता 11 वर्षानंतर आम्हाला NPS मध्ये तुमची जमा रक्कम व तितका शासन हिस्सा व व्याज घेवून जा असे सांगितले जाते.पण 11 वर्षात या योजनेत आमची रक्कम गुंतवली गेली नसल्याने मार्केट मधील चढ उताराचा जो लाभ मिळणार होता तो मिळणार नाही...कोणत्याही योजनेत सुरवातीच्या गुंतवणुकीवर सर्वाधिक लाभ मिळत असतात.पण येथे सुरवातीची गुंतवणूक केलीच गेली नाही.याला  कारणीभूत शासकीय व्यवस्था असताना त्याचा फटका आम्हा कर्मचारी वर्गास का??दरम्यान मृत झालेल्या कर्मचाऱ्यांना एक रुपया शासन मदत मिळाली नाहीच पण त्यांची जमा रक्कम ही मिळाली नाही.जर ही योजना सर्वासाठी लागू होती तर काही जिल्ह्यात कपात सुरू तर काही जिल्ह्यात कपात आजही बंद हे कसे??शालेय शिक्षण विभाग पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीबाबत तितकासा गंभीर नसल्याचा फटका शिक्षकांना का??


बंधू भगिनींनो केवळ हिशेब मिळवणे हे आपले ध्येय नव्हते व नसेल.हिशेब हा प्रशासन देईल.त्यानिमित्ताने या योजनेच्या अंमलबजवणीमधील दोष आपल्या व सर्वांच्या लक्षात आणून देणे हा उद्देश होता.आताही NPS बाबत कार्यवाही सुरू होत असताना केवळ हिशेब नव्हे तर वरील मुद्यांबाबत ही आपण प्रशासनाकडून उत्तरे मागितली पाहिजेत.काहीही झाले तर धोरण ठरवण्याचा अधिकार शासनास असला तरी ठरवलेल्या धोरणाची अंमलबजावणी व्यवस्थित न झाल्यास त्याचा फटका संबंधित कर्मचाऱ्यास बसू नये याची दक्षता घेणे हे कर्तव्य ही शासनाचे आहे.त्यामुळे DCPS मधील अपयश पाहता जुनी पेन्शन योजना लागू करून शिक्षकांना न्याय दिला पाहिजे.त्या अनुषंगाने एक अर्जाचा नमुना सोबत देत आहोत.तो अर्ज आपण आपल्या DDO 1 मुख्याध्यापक,केंद्र प्रमुख व गट शिक्षणाधिकारी यांना देवून आपले म्हणणे मांडू.DCPS व आता NPS शासनाने आणल्या असल्या तरी कर्मचारी म्हणून आम्हास जुनी पेन्शन योजनाच  हवी आहे.


🖋️अमोल शिंदे🖋️

जिल्हाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली

9420453475


1 comment: