Sunday, October 18, 2020

सांगली जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या डीसीपीएस हिशेब स्लीप 24 ऑक्टोबरपूर्वी मिळणार.....

 

हिशेब स्लीप तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात...

Dcps हिशेब स्लीप संदर्भात जवळपास 2018/19 पर्यंत सर्व कामकाज पूर्ण झाले असून 2019/20 अखेर पर्यंतचे काम येत्या गुरुवार पर्यंत पूर्ण होईल.शक्यतो हिशेब स्लीप वाटप करण्यास दिनांक 23 ऑक्टोबर 2020 पासून सुरवात होईल.

आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी साहेब यांनी दिनांक 24 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या बैठकीत याबाबत सदर प्रश्न 24 ऑक्टोबर 2020 पर्यंत मार्गी लावला जाईल.हिशेब पत्रक दिले जाईल असा शब्द दिला होता.ते कार्य पूर्णत्वास येत आहे. सीईओ साहेबांनी घेतलेली मीटिंग व त्यानंतर दिलेले टाईम लिमिट,त्यानंतर वित्त विभाग व शिक्षण विभाग यांनी  मिशनमोड वर केलेले काम यामुळे एक दीर्घकाळ प्रलंबित काम पूर्णत्वास जात आहे.आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी साहेब यांचे मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏


मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र गाडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे  काम पूर्णत्वास आणण्यासाठी सातत्याने मेहनत घेणारे उपमुख्य लेखाधिकारी राहुल कदम साहेब यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. वित्त विभागातील विक्रम जोशी सर,अभिजित वरगे व  यासाठी योगदान देणारे सर्व कर्मचारी,गेली काही दिवस योगदान देणारे प्रत्येक तालुक्यातील शिक्षक यांचे संघटन कडून धन्यवाद....
 सर्व DCPS धारक शिक्षकांना यामुळे दीर्घ काळानंतर हिशेब स्लीप मिळणार आहेत.संघटन याबाबत करत असलेल्या प्रयत्नावर विश्वास ठेवून संघटनांसोबत प्रत्येक भूमिकेत ठाम राहणाऱ्या जिल्ह्यातील DCPS धारक बंधू - भगिनीचे मनपूर्वक धन्यवाद....
📲📲📱📱📱📱📱

(आज पासून प्रत्येक तालुक्यात संघटन कडून होणाऱ्या online संवाद मेळाव्यात आपले सर्व प्रश्न स्वतः उपस्थित राहत विचारू शकता.)


आपला
अमोल शिंदे
जिल्हाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली
9420453475
आपल्यासाठी आपणच.....
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈

2 comments: