Sunday, February 28, 2021

शिक्षकांचा पगार वेळेत होण्यासाठी शालार्थ प्रणालीत सुधारणा करण्याची महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनची मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे मागणी...

शिक्षकांचे पगार शालार्थ वेतन प्रणाली मधून होतात.पण आज जवळपास सहा सात वर्षे ही प्रणाली अस्तित्वात येवुन ही केवळ ऑनलाईन बिले बनवणे याच्यापुढे या प्रणालीचा थेट फायदा शिक्षकांना झाला नाही.उलट ONLINE व OFFLINE डबल बिले देण्याचा व्यापच वाढला आहे.शिक्षकांचे वेतन नियमित महिन्याच्या 1 तारखेला होण्यासाठी शालार्थ प्रणालीत आवश्यक बदल करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने  मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे भेट घेवून केली.यावेळी शालार्थ प्रणालीतील सुधारणे बाबत सविस्तर निवेदन देण्यात आले.




शालार्थ प्रणाली मध्ये सुचवलेले बदल खालीलप्रमाणे....

                      1.शालार्थ बिल तयार होताना मुख्याध्यापक~ गट शिक्षणाधिकारीशिक्षणाधिकारी असे तयार होते पण पगार वर्ग होताना मुख्य वित्त व लेखाधिकारी शिक्षणाधिकरीगटविकास अधिकारीकेंद्रप्रमुख~शिक्षक असा आहे त्यामध्ये बदल होणे आवश्यक आहे.पगार थेट सीएमपी प्रणाली द्वारे जिल्ह्यातून शिक्षकाच्या खात्यावर जमा झाल्यास प्रत्येक टप्प्यावर होणारा कालावधी वाचेल.

                    2.DDO 1 मुख्याध्यापक याना न करता केंद्र प्रमुख याना करण्यात यावे.अनेक शाळा दोन शिक्षकी शाळा.तेथे मुख्याध्यापक पद मंजूर नसताना तेथील शिक्षकास ही DDO 1 जबाबदारी पार पाडावी लागत आहे.यात बदल होणे आवश्यक.

                     3.CMP प्रणाली सुरू करून पगार जिल्हा स्तरावरून थेट शिक्षकांच्या खात्यात जमा होण्यासाठी  शालार्थ मधून बल्क पेमेंट ऑप्शन सुरू करण्यात यावा.

                     4.NON GOVERMENT DIDUCTION रक्कम केंद्र प्रमुख यांच्या पगार खात्यावर जमा करून तेथून ते आदा करण्यात यावेत.किंवा शालार्थ मधूनच ते थेट जमा होण्यासाठी आवश्यक सुधारणा शालार्थ मध्ये होणे आवश्यक आहे.

                     तरी वरील पद्धतीने शालार्थ मध्ये बदल करण्याची आमची संघटन कडून मागणी असून शासन स्तरावर संबधित विभागास याबाबत अवगत करून शिक्षक पगारात सुसूत्रता येण्यासाठी आवश्यक पत्रव्यवहार व्हावा ही विनंती केली.या निवेदनावर जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, जिल्हा सरचिटणीस राहुल कोळी, जिल्हा कोषाध्यक्ष राजकुमार भोसले,जिल्हा कार्यवाहक नेताजी भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष वीरेश हिरेमठ यांची स्वाक्षरी आहे.

                     प्रत्येक महिन्याच्या पगाराला संघटना सातत्याने पगार नियमित व्हावा म्हणून पाठपुरावा करतात.पण महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनने पगार नियमित वेळेत न होण्याची कारणे समजून घेत आवश्यक सुधारणा सुचवल्या आहेत.

                      यावेळी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी साहेब यांनी वित्त व सामान्य प्रशासन विभाग अत्यंत कार्यतत्परतेन सर्व बाबी करत आहेत.शालार्थ प्रणाली मध्ये संघटन कडून सुचवलेल्या बाबी लक्षात घेवून शालार्थ मध्ये आवश्यक बदल करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याबाबत आश्र्वस्त केले.

                       यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे,जिल्हा सरचिटणीस राहुल कोळी,जिल्हा कार्याध्यक्ष विरेश हिरेमठ,जिल्हा संघटक मिलन नागने,जिल्हा कार्यवाहक राजकुमार भोसले,जिल्हा कार्यवाहक नेताजी भोसले,जत तालुकाध्यक्ष गुरुबसु वाघोली उपस्थित होते....


आपल्यासाठी आपणच

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली

1 comment: