Wednesday, June 15, 2022

ऑटो डेबिट पद्धत अवलंबली जाणार ती कशी ? व तिचे फायदे...

  शिक्षक बँकेत व्यवस्था परिवर्तन म्हणजे नेमके काय होणार??

🖋️अमोल शिंदे 🖋️

स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळ सांगली

शिक्षक बॅंकेतून सभासदांना लाभ देण्यासाठी खूप मोठ्या आर्थिक तरतुदीची आवश्यकता नाही... सभासद हित करण्याची इच्छाशक्ती महत्वाची आहे. काही छोट्या बाबी बदलून आपण कसा लाभ सामान्य सभासदांना देवू शकतो आपण क्रमशः पाहणार आहोत....

बदल छोटा...परिणाम मोठा...

        🎗️भाग क्रमांक 1🎗️

ऑटो डेबिट पद्धत अवलंबली जाणार ती कशी व तिचे फायदे जाणून घेवू.स्वाभिमानी मंडळ सत्तेवर आल्यावर पहिल्या वर्षात प्राधान्याने ही पद्धत अस्तित्वात आणली जाईल.......

सभासद बंधू भगिनींनो आपण शिक्षक बँकेचे कर्ज काढतो...महिन्याला आपला कर्जाचा हप्ता  वेतनातून कपात होतो.पण आपले वेतन प्रत्येक महिन्यात पुढे मागे होते.यामुळे

1.जितके दिवस उशिरा हप्ता कर्जास जमा होतो तितके अधिकचे व्याज कारण नसताना सभासदाला द्यावे लागते.

2. ठराविक तारखेला वेतन झाले नाही व कर्जाचा हप्ता जमा झाला नाही तर कर्ज थकित दिसते.यामुळे आपल्या बँकेचं कर्जदार व्यक्तींचा सिबिल स्कोर कमी दिसतो.यामुळे अनेकदा राष्ट्रीयीकृत बँकेत होम लोन, कार लोन घेताना आपल्याला अडचणी येतात...हप्ते तर आपण देतो पण ते थकीत दिसल्याने सिबिल खराब होतो.सभासदांचा कोणताही दोष नसताना सभासदास फटका बसतो.

आपले वेतन उशिरा झाल्याने नव्या स्वरूपात आपल्याला बसणारा फटका व सिबील स्कोर खराब होण्यापासून मुक्तता होण्यासाठी *स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळ ऑटो डेबिट पद्धत बँकेत अमलात आणणार....*

🌈🌈🌈🌈🌈🌈🌈

ऑटो डेबिट पद्धत कार्यपद्धती👇

कर्ज मंजूर करताना एक कर्जाचा संभाव्य हप्ता सेव्हींग खात्यावर ठेवला जाईल.प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला आपल्या सेव्हिंग खात्यातून हप्ता रक्कम कर्ज खात्यास जमा होईल...पुढे जेव्हा महिन्यात वेतन येईल तेव्हा हप्ता रक्कम सेव्हिंग खात्यावर वर्ग केली जाईल.

यामुळे सभासदांना दिवसागणिक द्यावे लागणारे व्याज वाचेल....त्यातून बचत होईल...

काही दुर्दैवी प्रकरणात शिक्षकांच्या खात्यातून रक्कम कपात झाली पण बँकेकडे वर्ग होण्यासाठी उशीर झाला....दरम्यान शिक्षकाचा मृत्यू झाला.पण रक्कम थकीत हे तांत्रिक कारण दाखवून काही कुटुंबे मृत संजीवनी योजना लाभापासून वंचित राहिली.ऑटो डेबिट पद्धत आणली तर कर्ज वसुली मध्ये एकसूत्रता येईल. सिबिल सुधारेल...थकीत कमी होईल असे लाभ सर्वांना मिळतील....

सदर योजना राबवण्यासाठी स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळास आपण सर्वांनी संधी द्यावी. स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाच्या सर्व 21 उमेदवारांना आपले  बहुमूल्य मत द्यावे...


आपला,

अमोल शिंदे

9420453475

मिरज तालुका सर्वसाधारण गटातील उमेदवार..


स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळ सांगली

सभासदांच्या हक्कासाठी .. सभासदांच्या हितासाठी

No comments:

Post a Comment