Friday, June 26, 2020

जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करा- मागणी ट्विटर वर ट्रेंडिंगमध्ये ऑनलाईन आंदोलनात पाच तासात ३लाख ८० हजार ट्विट


#RestoreOldPension हा हॅश टॅग वापरत जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करा या मागणीसाठी  देशव्यापी लक्षवेधी ऑनलाईन आंदोलनात ट्विटरच्या माध्यमातून दुपारी 12 ते 5 या वेळेत करण्यात आले. या आंदोलनाचे संयोजन राष्ट्रीय पुरानी पेन्शन बहाली कृती समिती(NMOPS)चे राष्ट्रीय अध्यक्ष विजयजी बंधू व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी केले.

माजी RBI गवर्नर विमल जालान आणि रघुराम राजन यांच्या Twitter Account वरुन  ही या हैशटैग सह ट्वीट करून जुनी पेन्शन चे समर्थन केले असून ही बाब या लढ्यासाठी सकारात्मक असून या आंदोलनात कर्मचारी वर्गाने केलेल्या मागणीचा सरकारने सकारात्मक विचार करून सर्वांना जुनी पेन्शन लागू करावी.अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनचे राज्य समन्वयक सागर खाडे यांनी केली.




सुरुवातीला 12 ते 3 पर्यंत असलेले हे आंदोलन 2 तास वाढवावे ही विनंती महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन राज्याध्यक्ष  श्री वितेश खांडेकर यांनी  NMOPS राष्ट्रीय अध्यक्ष श्री विजय कुमार बंधूजी यांना केली आणि 3 वाजे पासून ते 5 वाजे पर्यंत आंदोलनाचा कालावधी वाढवण्यात आला..!

आजच्या या आंदोलनात महिला कर्मचाऱ्यांची संख्याही अतिशय लक्षणीय होती..ट्विटर अकाउंट कसे चालू करावे व कसे वापरावे याबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली ने तयार केलेल्या युट्यूब व्हिडिओचा चांगला परिणाम दिसला.

MRJPHS सोलापूर टीम चे राज्यात प्रभावी नियोजन
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सोलापूरच्या ट्विटर टीमने राज्यभरात आंदोलन जागृतीचे प्रभावी काम केले.यामध्ये नवनाथ धांडोरे,रामराव शिंदे, प्रशांत लंबे,किरण काळे,आशिष चव्हाण, प्रकाश कोळी यांनी आंदोलनाचा प्रभावी प्रचार व प्रसार केला.

देशभरातील अनेक राजकीय विश्लेषकांनी समर्थन देत या विषयावर ट्वीट केले.. सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्ति, जुनी पेन्शन धारक अधिकारी आणि कर्मचारी यांनी ही ट्वीट करत जुनी पेन्शन मुद्द्यावर समर्थन केले.

एकच मिशन जुनी पेन्शन,
कमी करायचे असेल अर्थकारणाचे टेन्शन,सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करा जुनीच पेन्शन,
हमको पुष्प वर्षा नहीं,
पुरानी पेन्शन चाहिए।।
शासनाच्या तिजोरीवरील बोजा कमी करण्यासाठी NPS योजना बंद करा.शासनाचे अब्जावधी रुपये वाचतील.

आशा विविध भावना ट्विट करत जुनी पेन्शन मागणी मांडण्यात आली.सध्या कोरोना संकटामुळे महागाई भत्ता वाढ न करण्याबाबत, 7 व्या आयोगाचा 2 रा हफ्ता रोखीने 1वर्ष पुढे ढकलण्याबाबत निर्णय घेण्यात आले. याच पार्श्वभूमीवर  DCPS/NPS धारकांचा वेतनातून 10 टक्के प्रमाणे करण्यात आलेली कपात व शासन हिस्सा या संकट काळात सरकारने घ्यावा व सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केल्यास सध्या अंशदान पेन्शन योजनेसाठी सरकारला प्रतिमहा शासन हिस्सा देण्यासाठी करावा लागणारा खर्च थांबेल व आजपर्यंत  करण्यात आलेली कपातीची रक्कम ही कोरोना संकटात उपयोगी पडेल.यामुळे अंशदान पेन्शन योजना बंद करून सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी भूमिका अनेक युवा सरकारी कर्मचाऱ्यानी आजच्या ट्विटर वरील मोहिमेत व्यक्त केली.

सांगली जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनचे अमोल शिंदे, राहुल कोळी, राजकुमार भोसले, पी.डी.शिंदे, नेताजी भोसले, विरेश हिरेमठ, स्वप्निल मंडले, गुरुबसु वाघोली, पांडुरंग पोळ, महादेव जंगम, रवींद्र सतारी, तानाजी यादव, संभाजी पाटील, रमेश मगदूम, मिलन नागणे, प्रशांत हिटनळी,नितीन गळवे,तात्यासाहेब खोत,जालिंदर पाटील,अजित मोहिते,मासिद्धा पुजारी,रोहित गुरव,संदीप माने,ज्ञानेश्वर पांपटवार,रमेश कोळी,गजानन मोरलवार,शंकर ढेरे,अनिल मोहिते यांनी या आंदोलनाचे संयोजन केले.जिल्ह्यातून विविध कर्मचारी संघटना,ज्येष्ठ शिक्षक व कर्मचारी यांनी ही या आंदोलनात सहभाग घेतला.

3 comments:

  1. जूनी पेन्शन मिळावी.

    ReplyDelete
  2. छान प्रतिसाद मिळाला आज...
    टॉप ट्रेंड मध्ये #Restoreoldpension हे राहिले..👌👌

    ReplyDelete