Saturday, July 2, 2022

वास्तव आणि अपेक्षा - भाग ०७ - हीच ती वेळ -अभी नहीं तो कभी नहीं

🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔

(✒️✒️ रमेश मगदूम -मिरज एक सर्वसामान्य सभासद फोन नं.9767290767)

               सर्व शिक्षकांची कामधेनू , सांगली शिक्षक बँकेची निवडणूक उद्या रविवार दि.३ जुलै रोजी होत असून यानिमित्ताने गेल्या 20 दिवसांपासून वास्तव आणि अपेक्षा या सदराखाली अतिशय वस्तुनिष्ठ मांडलेल्या लेखमालिकेला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

                  इतर वित्तीय संस्था ,शिक्षक बँका यांच्या तुलनेत कर्जाचे व्याजदर कमी करण्यात आलेले अपयश , दिलेला शब्द डावलून केलेली कर्मचारी भरती ,100% वसुली शक्य असताना कोट्यवधी रुपयांची थकबाकी , संगणक खरेदी - दुरुस्ती ते फर्निचरवर अवाजवी खर्च करून केलेला भ्रष्टाचार यासह अनेक मुद्यांवर सर्वसामान्य सभासदांच्या मनामध्ये प्रचंड नाराजी होती. या नाराजीचे प्रतिनिधित्व करत आम्ही काही वस्तुनिष्ठ मुद्यांसह वास्तव आकडेवारी आपल्यासमोर मांडली आहे. वरील मुद्यांवर व्यवस्था परिवर्तनाच्या उद्देशाने धोरणाच्या आधारे आम्ही प्रचार करत असताना अजूनही सगळं काही आमच्याच खिशात हवं या उद्देशाने गेल्या ७-८ दिवसांत प्रचारासाठी कोणकोणती आयुधं वापरली आहेत , याचे साक्षीदार आपण सर्वजण आहोत. आता आपल्यासारख्या सर्वसामान्य सभासदांची जबाबदारी वाढली आहे. यापूर्वी सादर केलेली सर्व लेखमालिका लिंकच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्यासमोर pdf स्वरूपात मांडत आहे. त्यातील प्रत्येक लेख शक्य झाल्यास वाचा आणि ठरवा मतदान कोणाला व का करायचे ते... नक्कीच आपलं मन योग्य उत्तर देईल...तर मग चला..उठा...व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईचे साथीदार व साक्षीदार व्हा...आता नाही तर कधीच नाही.

Friday, July 1, 2022

यंदा गुरुजी बँकेत परिवर्तन करत भाकरी फिरवनार - दै. जनप्रवास

 शिक्षक बँक वार्तापत्र

मिरज - प्रतिनिधी...

🟥🟥🟥🟥🟥🟥🟥

मिरज तालुक्यात स्वाभिमानीला जोरदार प्रतिसाद

यंदा गुरुजी बँकेत परिवर्तन करत भाकरी फिरवनार

🟥🟥🟥🟥🟥🟥🟥


मिरज तालुका सर्वसाधारण गटातून अमोल शिंदे,शामागोंडा पाटील,मिलन नागणे व जिल्हा अनुसूचित राखीव गटातील उमेदवार अमोल माने या उमेदवारांनी मिरज तालुक्यात प्रचारात आघाडी घेतली आहे.



पारदर्शी कारभार...शिक्षक बँकेतील व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी स्वाभिमानी मंडळाने मांडलेल्या जाहीरनाम्यास  सभासदांचा जोरदार पाठींबा मिळत आहे. एक अंकी व्याजदर दोन अंकी डिव्हीडंट, निष्कर्जी  सभासदांना वीस लाख रुपये मदत,ऑटो डेबीट पद्धत या मुद्द्यांना पसंती मिळत आहे. जिल्ह्यातील 12 संघटना व त्यांचे पदाधिकारी प्रचारात सक्रिय झाल्याने निवडणुकीचा रंग बदलला आहे. सत्ताधाऱ्यांच्या कारभाराची अचूक तुलनात्मक व ऑडिट रिपोर्ट च्या माध्यमातून पोलखोल केल्याने सभासद जागृत झाले आहेत. स्वाभिमानीची वज्रमूठ सत्ताधाऱ्यांवर भारी पडणार असे दिसत आहे...21/0 होणार अशी चर्चा सभासदांत रंगली आहे.

वास्तव आणि अपेक्षा - भाग ०६ - इतर आणि किरकोळ खर्च : एक न उलगडलेले कोडे

 सर्व सामान्य सभासदांच्या नजरेत सांगली शिक्षक बँक...

🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔

(✒️✒️ रमेश मगदूम -मिरज एक सर्वसामान्य सभासद फोन नं.9767290767)

   शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेच्या तोंडावर आपल्या हातात पडतो तो वार्षिक अहवाल...याचा बारकाईने अभ्यास केल्यास खर्चाचा ताळेबंद सादर करताना इतर खर्च व किरकोळ खर्च या दोन बाबींवर स्वतंत्र खर्च दाखवून सर्वसामान्य सभासदांना इतर व किरकोळ यातील फरक सहज लक्षात येऊ नये ,याची जणू व्यवस्थाच केलेली असते की काय? असा मनात प्रश्न निर्माण होतो. इतर खर्च या सदराखाली उपखर्चात पुन्हा *किरकोळ खर्च व  इतर खर्च* स्वतंत्र कसा काय दाखवता येतो ? हा संशोधनाचा विषय.

उदा. 2020-21 मध्ये एकूण इतर खर्च 2कोटी 49 लाख रु. असून त्यातील उपखर्चात स्वतंत्र किरकोळ खर्च 2लाख 80 हजार व इतर खर्च 5लाख 21 हजार दाखवलेला आहे.


वर्षनिहाय इतर खर्च👇🏻👇🏻

वास्तव आणि अपेक्षा - भाग ०५ - बक्षीस व बोनस पगाराची खैरात सभासदांच्या मुळावर

 सर्व सामान्य सभासदांच्या नजरेत सांगली शिक्षक बँक...

🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔

(✒️✒️ रमेश मगदूम -मिरज एक सर्वसामान्य सभासद फोन नं.9767290767)

कोणत्याही वित्तीय संस्थेच्या वाटचालीत त्या संस्थेतील कर्मचाऱ्यांचे व व्यवस्थापनाचे योगदान महत्वाचे असते. वित्तीय सहकारी संस्थेमध्ये कर्मचाऱ्यांनी आपले अधिकचे योगदान देऊन अपेक्षित नफ्यापेक्षा जास्त नफा मिळवून दिल्यास बक्षीस व बोनस पगार देऊन कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची प्रथा रूढ आहे. जर अपेक्षित नफा मिळाला नाही तर बक्षीस व बोनस पगार कर्मचाऱ्यांना देणे बंधनकारक नसते.

     सांगली शिक्षक बँकेचे सध्याचे एकूण खेळते भांडवल व उलाढाल बघता प्रतिसेवक वार्षिक नफा किमान 4 लाख रु होणे अपेक्षित असून त्याच्यापेक्षा जास्त नफा मिळाल्यास कर्मचाऱ्यांना शाबासकी म्हणून बक्षीस व बोनस पगार देणे संस्थेच्या हिताचे आहे.

🔔 सांगली शिक्षक बँक - सन 2020-21 मधील आकडेवारी🔔👇🏻

वार्षिक नफा - रु.4 कोटी 49 लाख

प्रतिसेवक नफा - रु.2लाख 67हजार

तरतूद केलेला बक्षीस पगार रक्कम - 62 लाख रुपये (प्रति सेवक एक महिन्याचा पगार)

Thursday, June 30, 2022

वास्तव आणि अपेक्षा - भाग ०४ - वाढते थकीत कर्ज -सभासदांच्या डिव्हिडंडला कात्री

आजच्या भागात वाचा शाखानिहाय थकबाकी व थकबाकीदार संख्या... चिंतन करा..

🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔

(✒️✒️ रमेश मगदूम -मिरज एक सर्वसामान्य सभासद फोन नं.9767290767)

     आर्थिक वर्ष 2021-22 सालची थकबाकी आहे रु.4,13,61,121/- ( 4 कोटी 13 लाख 61 हजार)

एकूण सभासद संख्या = 7385

एकूण थकबाकीदार सभासद = 128

सर्वसामान्य सभासदांच्या खिशाला बसलेली झळ = रु. 5600/-

🎯 थकबाकीदार सभासद 128...ओझं मात्र 7300 सभासदांवर🎯

💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫

👇🏻 शाखानिहाय थकबाकीबाबतची आकडेवारी👇🏻

Wednesday, June 15, 2022

वास्तव आणि अपेक्षा - भाग ०३ - थकबाकी : सभासदांच्या मानगुटीवरील भूत

 सर्व सामान्य सभासदांच्या नजरेत सांगली शिक्षक बँक...

   📸 वास्तव आणि अपेक्षा - भाग ०३📸

🎯 विषय - थकबाकी : सभासदांच्या मानगुटीवरील भूत🎯

🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔

(✒️✒️ रमेश मगदूम -मिरज एक सर्वसामान्य सभासद फोन नं.9767290767)

वास्तव आणि अपेक्षा - भाग ०२ - कर्मचाऱ्यांचे तुलनात्मक प्रमाण

 सर्व सामान्य सभासदांच्या नजरेत सांगली शिक्षक बँक...

   📸 वास्तव आणि अपेक्षा - भाग ०२📸

🎯 विषय - कर्मचाऱ्यांचे तुलनात्मक प्रमाण🎯


(अहमदनगर शिक्षक बँकेचा सरसकट व्याजदर सर्वात कमी म्हणजे 8.70% आहे , तो ज्या काही कारणामुळे कमी आहे , त्यातील एक महत्वाचे कारण खालील पोस्ट वाचल्यावर लक्षात येईल🙏)

🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔

(✒️✒️ रमेश मगदूम -मिरज एक सर्वसामान्य सभासद फोन नं.9767290767)




वास्तव आणि अपेक्षा - भाग ०१ - तुलनात्मक व्याजदर

 सर्व सामान्य सभासदांच्या नजरेत सांगली शिक्षक बँक...

वास्तव आणि अपेक्षा - भाग ०१

विषय - तुलनात्मक व्याजदर

🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔

(✒️✒️ रमेश मगदूम -मिरज एक सर्वसामान्य सभासद फोन नं.9767290767)


कमी व्याजदरात गृह कर्ज व शैक्षणिक कर्ज योजना राबवली जाणार...

 शिक्षक बँकेत व्यवस्था परिवर्तन म्हणजे नेमके काय होणार??

🖋️अमोल शिंदे 🖋️

स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळ सांगली

बदल छोटा...परिणाम मोठा...

          🎗️भाग क्रमांक 2🎗️

कमी व्याजदरात गृह कर्ज व शैक्षणिक कर्ज योजना राबवली जाणार...


सभासद बंधू भगिनींनो 🙏🙏

🌈🌈🌈🌈🌈🌈🌈

जिल्हाभरातील शिक्षक बंधू भगिनी यांच्याशी संवाद साधताना त्या सर्वाकडून कमी व्याजदरात गृह कर्ज व शैक्षणिक कर्ज योजना राबवण्याची मागणी होत आहे.

ऑटो डेबिट पद्धत अवलंबली जाणार ती कशी ? व तिचे फायदे...

  शिक्षक बँकेत व्यवस्था परिवर्तन म्हणजे नेमके काय होणार??

🖋️अमोल शिंदे 🖋️

स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळ सांगली

शिक्षक बॅंकेतून सभासदांना लाभ देण्यासाठी खूप मोठ्या आर्थिक तरतुदीची आवश्यकता नाही... सभासद हित करण्याची इच्छाशक्ती महत्वाची आहे. काही छोट्या बाबी बदलून आपण कसा लाभ सामान्य सभासदांना देवू शकतो आपण क्रमशः पाहणार आहोत....

बदल छोटा...परिणाम मोठा...

        🎗️भाग क्रमांक 1🎗️

ऑटो डेबिट पद्धत अवलंबली जाणार ती कशी व तिचे फायदे जाणून घेवू.स्वाभिमानी मंडळ सत्तेवर आल्यावर पहिल्या वर्षात प्राधान्याने ही पद्धत अस्तित्वात आणली जाईल.......

सभासद बंधू भगिनींनो आपण शिक्षक बँकेचे कर्ज काढतो...महिन्याला आपला कर्जाचा हप्ता  वेतनातून कपात होतो.पण आपले वेतन प्रत्येक महिन्यात पुढे मागे होते.यामुळे

Sunday, February 28, 2021

शिक्षकांचा पगार वेळेत होण्यासाठी शालार्थ प्रणालीत सुधारणा करण्याची महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनची मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे मागणी...

शिक्षकांचे पगार शालार्थ वेतन प्रणाली मधून होतात.पण आज जवळपास सहा सात वर्षे ही प्रणाली अस्तित्वात येवुन ही केवळ ऑनलाईन बिले बनवणे याच्यापुढे या प्रणालीचा थेट फायदा शिक्षकांना झाला नाही.उलट ONLINE व OFFLINE डबल बिले देण्याचा व्यापच वाढला आहे.शिक्षकांचे वेतन नियमित महिन्याच्या 1 तारखेला होण्यासाठी शालार्थ प्रणालीत आवश्यक बदल करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने  मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे भेट घेवून केली.यावेळी शालार्थ प्रणालीतील सुधारणे बाबत सविस्तर निवेदन देण्यात आले.

Monday, December 21, 2020

शिक्षक बँक निवडणुकीत व्यवस्था परिवर्तनासाठी पेन्शन हक्क संघटन कटिबद्ध

 युती व उमेदवार निवड करण्याचे अधिकार निवडणूक निर्णय समितीस - जिल्हा व तालुका कार्यकारिणीच्या एकत्रित बैठकीत सर्वानुमते निर्णय

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

निवडणूक निर्णय समितीच्या जिल्हाध्यक्षपदी स्वप्नील मंडले यांची सर्वानुमते निवड

 ✊✊✊✊✊✊✊              

                       महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली ची जिल्हा कार्यकारणी बैठक तासगाव येथे पार पडली.या सभेमध्ये शिक्षक बँक निवडणूक बाबत उपस्थित तालुकाध्यक्ष,जिल्हा कार्यकारणी सदस्य यांनी मते मांडली. प्राथमिक शिक्षक बँक निवडणूकीत स्वतंत्र निवडणूक लढवली तर सध्याच्या सभासदांची संख्या पाहता निर्णायक बदल न होता केवळ इतराना लाभ होईल.

Monday, December 7, 2020

शिक्षणसेवक मानधन वाढ करणेबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली कडून ग्रामविकास मंत्र्यांना निवेदन

 महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली कडून मा.ना. हसन मुश्रीफ साहेब, ग्राम विकास मंत्री महाराष्ट्र शासन यांना शिक्षण सेवक पद्धत बंद करणे  शिक्षणसेवक मानधन वाढ करणेबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली कडून निवेदन देण्यात आले.याबाबत मंत्रिमंडळात चर्चा आश्वासन यावेळी ग्रामविकास मंत्री महोदयांनी दिले.


यावेळी दिलेल्या निवेदनात  राज्यातील शिक्षण सेवक पद्धत बंद करण्यात यावी.त्याचवेळी याबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत शिक्षणसेवकाना 24000 मानधन देण्यात यावी.अशी मागणी करण्यात आली.

Thursday, October 29, 2020

मिरजेचे नूतन तहसीलदार डी.एस.कुंभार यांचे महारष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन कडून स्वागत...

 


"जिल्हा परिषद शाळातच गुणवत्तापूर्ण शिक्षण;प्रयत्नवादी शिक्षकांच्या प्रयत्नांना साथ देणार" -नूतन तहसीलदार डी.एस.कुंभार 

आज मिरजेचे नूतन तहसीलदार डी.एस.कुंभार साहेब यांचे महारष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन कडून स्वागत जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे,तालुकाध्यक्ष रमेश मगदूम,कार्याध्यक्ष राहुल गणेशवाडे,महिला आघाडी प्रमुख जयश्री कुंभार,मिरज तालुका संघटक शुभांगी पाटील,सविता जाधव यांनी केले.


यावेळी नूतन तहसीलदार डी.एस.कुंभार साहेब यांनी जिल्हा परिषद शाळातच गुणवत्तापूर्ण शिक्षण;प्रयत्नवादी शिक्षकांच्या प्रयत्नांना साथ देवू असे प्रतिपादन केले.आज अनेक यशस्वी लोक जिल्हा परिषद शाळांमधून शिकलेले आहेत.जिल्हा परिषद शाळा खूप महत्वाच्या असून शिक्षक हा समाजाला दिशा देणारा घटक असून सक्षम शिक्षक,सक्षम समाज घडवतात असे उद्गार काढले.यावेळी शाळांच्या भौतिक विकासासाठी व गुणात्मक वाढीसाठी मार्गदर्शन करण्याची विनंती संघटन कडून करण्यात आली.

Sunday, October 18, 2020

सांगली जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या डीसीपीएस हिशेब स्लीप 24 ऑक्टोबरपूर्वी मिळणार.....

 

हिशेब स्लीप तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात...

Dcps हिशेब स्लीप संदर्भात जवळपास 2018/19 पर्यंत सर्व कामकाज पूर्ण झाले असून 2019/20 अखेर पर्यंतचे काम येत्या गुरुवार पर्यंत पूर्ण होईल.शक्यतो हिशेब स्लीप वाटप करण्यास दिनांक 23 ऑक्टोबर 2020 पासून सुरवात होईल.

आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी साहेब यांनी दिनांक 24 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या बैठकीत याबाबत सदर प्रश्न 24 ऑक्टोबर 2020 पर्यंत मार्गी लावला जाईल.हिशेब पत्रक दिले जाईल असा शब्द दिला होता.ते कार्य पूर्णत्वास येत आहे. सीईओ साहेबांनी घेतलेली मीटिंग व त्यानंतर दिलेले टाईम लिमिट,त्यानंतर वित्त विभाग व शिक्षण विभाग यांनी  मिशनमोड वर केलेले काम यामुळे एक दीर्घकाळ प्रलंबित काम पूर्णत्वास जात आहे.आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी साहेब यांचे मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏


Monday, October 5, 2020

DCPS सुरळीत राबवली असती तर......???

सन 2009 ते आज अखेर अंशदान कपात अंदाजपत्रक फाईल डाऊनलोड करण्यासाठि खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा. 


🖋️अमोल शिंदे🖋

1 नोव्हेंबर 2005 पासून सेवेत आलेल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार..!

                          महाराष्ट्र शासनाने 1 नोव्हेंबर 2005 पासून सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी 1982 ची पेन्शन योजना बंद केली व नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना(DCPS) लागू केली.ही योजना लागू करून 15 वर्षे झाली.त्यानंतर आता आपण सर्व शिक्षकांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (NPS) मध्ये वर्ग करण्याची तयारी शासन करत आहे.मुळात आता 15 वर्षानंतर योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (NPS) मध्ये वर्ग करणे हे वरातीमागून घोडे असा प्रकार आहे.गेल्या 15 वर्षात नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना(DCPS) योजना राबवण्यात अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले असून ही योजना राबवण्यात पूर्णतः अपयश आले आहे हे दिसते.15 वर्षानंतर केवळ DCPS मधून NPS मध्ये वर्ग केल्याने सर्व काही ठीक होईल असा कोणाचा समज असेल तर तो चुकीचा समज ठरेल.केवळ योजनेचे नाव बदलून स्वरूप तेच ठेवून 15 वर्षे उशिरा अंमलबजावणी केल्याने अनेक तोटे संबंधित कर्मचाऱ्यास भोगावे लागणार असून सध्या ही दुर्दैवाने दरम्यानच्या काळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना या लाल फितीच्या कारभारामुळे खूप मोठ्या यातनांना सामोरे जावे लागले आहे. तरीही काही लोक NPS खूप उत्तम असल्याचे सांगत आहेत.खरेतर आता चांगले - वाईट ही तुलना करण्यापेक्षा आम्हाला जी योजना मंजूर करण्यात आली ती त्यावेळी राबवली का गेली नाही?? व त्यावेळी ती सुरळीत न राबवल्याने होणाऱ्या नुकसानीस कोण जबाबदार?होणारे नुकसान कसे भरून निघणार हा प्रश्न आहे.

Saturday, September 26, 2020

तासगाव तालुका जुनी पेन्शन हक्क संघटन कडून ऑक्सीजन मशीन व आवश्यक औषधे पंचायत समिती तासगाव कडे सुपूर्द



 

पेन्शन हक्क संघटन माध्यमातून शिक्षकांनी जपली सामाजिक बांधिलकी

 

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन तासगाव कडून दोन ऑक्सीजन मशीन व आवश्यक औषधे पंचायत समिती तासगाव सभापती कमलकाकी पाटील यांच्याकडे जुनी पेन्शन हक्क संघटन जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे पंचायत समिती सदस्य संतोष आठवले,संभाजी पाटील,अर्जुन (बापू) पाटील जिल्हा परिषद सदस्य सांगली, दिपाली पाटील सहाय्यक गटविकास अधिकारी तासगाव, प्रकाश कांबळे प्रभारी गटशिक्षणाधिकारी, गीता शेंडगे शिक्षण विस्तार अधिकारी,अनिल सुर्यवंशी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

 

Friday, September 4, 2020

NPS मध्ये वर्ग करण्यापूर्वी DCPS चा व्याज व शासन हिश्श्यासह हिशेब द्या - शिक्षण उपसचिव यांचे पत्र

 


आधी हिशेब नंतर NPS ही भूमिका घेत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन ने NPS फॉर्म भरण्यावर टाकला होता बहिष्का* सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने दिनांक 21 ऑगस्ट 2020 रोजी दिनांक 13 ऑगस्ट 2020 रोजी शिक्षण संचालक यांच्या पत्राचा संदर्भ देत शिक्षकांकडून NPS बाबत फॉर्म 30 ऑगस्ट 2020 अखेर जमा करण्याबाबत पत्र निर्गमित केले होते.यावर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली कडून तीव्र आक्षेप घेत शिक्षण उपसचिव यांच्या 28 जुलै 2020 रोजी च्या पत्रानुसार राष्ट्रीय पेन्शन योजनेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची नोंदणी करण्यापूर्वी परिभाषेत अंशदान निवृत्ती वेतन योजनेसाठी यापूर्वी कपात रकमांचे हिशेब देण्याची कार्यवाही करावी.आधी हिशेब नंतर NPS अशी भूमिका घेत फॉर्म भरण्यावर बहिष्कार घातला.जिल्ह्यातील 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांनी याबाबत नकार पत्र भरून त्याबद्दल असंतोष व्यक्त केला.जिल्ह्यातील एकाही जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने NPS फॉर्म भरून दिला नाही. दिनांक 3 सप्टेंबर रोजी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिव यांनी राष्ट्रीय पेन्शन योजनेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची नोंदणी करण्यापूर्वी परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेसाठी यापूर्वी कपात रकमांचे हिशेब देण्याची कार्यवाही तातडीने करण्याबाबत शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक माध्यमिक,प्राथमिक यांना पत्राने कळवले आहे. अंशदान पेन्शन योजनेच्या आमलबजावणीत अनेक त्रुटी आहेत.जसजसा हिशेब समोर येईल तसा राज्यभरातील या पेन्शन योजनेतील सावळागोंधळ समोर येणार असून शासनाने ही योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन प्रयत्न करत राहील - अमोल शिंदे,जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली.... आपल्यासाठी आपणच...... आपला.... अमोल शिंदे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली... 9420453475

Tuesday, August 18, 2020

हिशेब मिळाला म्हणजे झाले ???

 PDF स्वरूपात सोबत एक अर्ज नमुना देत आहोत. योग्य वाटल्यास आपण तो देवून आपला असंतोष व्यक्त करू...

खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन अर्ज नमुना डाऊनलोड करा.


🖋️अमोल शिंदे🖋️

जिल्हाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली

9420453475

शिक्षकांना NPS मध्ये वर्ग करण्याबाबत सुरू कार्यवाही संदर्भात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.NPS मध्ये वर्ग होताना पूर्वी झालेल्या कपातीचा हिशेब मिळाला म्हणजे झाले??

आपल्याला माहीत आहे यापूर्वी आपण हिशेब चिट्टी मिळण्यासाठी आंदोलन केले होते.त्यानंतर 2016 पर्यंत हिशेब देण्यात आला होता.त्यात अनेक त्रुटी होत्या.मुळात आपल्या कपातीचा हिशेब देणे प्रशासनाची जबाबदारी आहे.पण DCPS योजना अमलबजाणीकडे इतके दुर्लक्ष होते की आपल्या पगारातून कपात रकेमचे शेड्युल नियमित जिल्ह्याला तालुक्यातून पाठवली गेली नाहीत.त्यामुळे प्रत्यक्ष पगारातून झालेली कपात व मिळालेल्या हिशेब चिट्टी यांच्यात तफावत दिसत होती.यानंतर सदर सर्व शेड्युल पंचायत समिती कडून मागवून सर्व नोंदी वित्त विभागात रजिस्टर वर करण्याचे काम गेली वर्षभर सातत्याने सुरू असून जवळपास सदर काम पूर्णत्वास गेले आहे.आता त्या नोंदी सॉफ्टवेअर वर घेवून आपल्याला आपले हिशेब पुढील काही काळात दिले जातील.परंतु खरा प्रश्न हा आहे की केवळ हिशेब दिला म्हणजे झाले काय???

Sunday, August 16, 2020

शिक्षकांचे भविष्य NPS रुपी दरीमध्ये कडेलोट करून संपवण्यापेक्षा जुनी पेन्शन रुपी संजीवनी द्या..

 राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांची आर्त हाक...


🖋अमोल शिंदे🖋

जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली


NPS मध्ये वर्ग करण्यापूर्वी 15 वर्षे DCPS योजना राबवून काय मिळवले जाहीर करावे...15 वर्षात झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नुकसानीची जबाबदारी कोणाची???

💰💰💶💶⚖️⚖️💶💶💰💰

15 वर्षापूर्वी परिभाषित निवृत्ती वेतन योजना ( DCPS)लागू करण्याबाबत निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी करण्यात शासन यशस्वी झाले नाही.आता 15 वर्षानंतर पुन्हा एकदा सर्व माहिती भविष्य राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या ( NPS) हाती न देता जुनी पेन्शन योजना लागू करून शासनाने कर्मचारी भविष्य सुरक्षित करायला हवे.


परिभाषित निवृत्ती वेतन योजना ( DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत (NPS) मध्ये समाविष्ट करण्याबाबत दिनांक 28 जुलै 2020  रोजीचे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग उपसचिव यांचे शिक्षण आयुक्त पुणे यांना पत्र लिहिले.त्यानंतर मा.शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य पुणे 1 यांचे दिनांक 13 ऑगस्ट 2020 रोजी एक पत्र काढले.त्यास अनुसरून बऱ्याच जिल्ह्यात शिक्षणाधिकारी व अधीक्षक,वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक(प्राथमिक व माध्यमिक) यांनी तातडीने मुख्याध्यापक, गट शिक्षणाधिकारी याना पत्र लिहून शिक्षकांचे NPS मध्ये वर्ग करण्याबाबत कार्यवाही तातडीने सुरू केली. कोरोना काळात दाखवलेली तत्परता पाहून काही प्रश्न पडत आहेत....