Sunday, October 18, 2020

सांगली जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या डीसीपीएस हिशेब स्लीप 24 ऑक्टोबरपूर्वी मिळणार.....

 

हिशेब स्लीप तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात...

Dcps हिशेब स्लीप संदर्भात जवळपास 2018/19 पर्यंत सर्व कामकाज पूर्ण झाले असून 2019/20 अखेर पर्यंतचे काम येत्या गुरुवार पर्यंत पूर्ण होईल.शक्यतो हिशेब स्लीप वाटप करण्यास दिनांक 23 ऑक्टोबर 2020 पासून सुरवात होईल.

आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी साहेब यांनी दिनांक 24 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या बैठकीत याबाबत सदर प्रश्न 24 ऑक्टोबर 2020 पर्यंत मार्गी लावला जाईल.हिशेब पत्रक दिले जाईल असा शब्द दिला होता.ते कार्य पूर्णत्वास येत आहे. सीईओ साहेबांनी घेतलेली मीटिंग व त्यानंतर दिलेले टाईम लिमिट,त्यानंतर वित्त विभाग व शिक्षण विभाग यांनी  मिशनमोड वर केलेले काम यामुळे एक दीर्घकाळ प्रलंबित काम पूर्णत्वास जात आहे.आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी साहेब यांचे मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏


Monday, October 5, 2020

DCPS सुरळीत राबवली असती तर......???

सन 2009 ते आज अखेर अंशदान कपात अंदाजपत्रक फाईल डाऊनलोड करण्यासाठि खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा. 


🖋️अमोल शिंदे🖋

1 नोव्हेंबर 2005 पासून सेवेत आलेल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार..!

                          महाराष्ट्र शासनाने 1 नोव्हेंबर 2005 पासून सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी 1982 ची पेन्शन योजना बंद केली व नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना(DCPS) लागू केली.ही योजना लागू करून 15 वर्षे झाली.त्यानंतर आता आपण सर्व शिक्षकांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (NPS) मध्ये वर्ग करण्याची तयारी शासन करत आहे.मुळात आता 15 वर्षानंतर योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (NPS) मध्ये वर्ग करणे हे वरातीमागून घोडे असा प्रकार आहे.गेल्या 15 वर्षात नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना(DCPS) योजना राबवण्यात अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले असून ही योजना राबवण्यात पूर्णतः अपयश आले आहे हे दिसते.15 वर्षानंतर केवळ DCPS मधून NPS मध्ये वर्ग केल्याने सर्व काही ठीक होईल असा कोणाचा समज असेल तर तो चुकीचा समज ठरेल.केवळ योजनेचे नाव बदलून स्वरूप तेच ठेवून 15 वर्षे उशिरा अंमलबजावणी केल्याने अनेक तोटे संबंधित कर्मचाऱ्यास भोगावे लागणार असून सध्या ही दुर्दैवाने दरम्यानच्या काळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना या लाल फितीच्या कारभारामुळे खूप मोठ्या यातनांना सामोरे जावे लागले आहे. तरीही काही लोक NPS खूप उत्तम असल्याचे सांगत आहेत.खरेतर आता चांगले - वाईट ही तुलना करण्यापेक्षा आम्हाला जी योजना मंजूर करण्यात आली ती त्यावेळी राबवली का गेली नाही?? व त्यावेळी ती सुरळीत न राबवल्याने होणाऱ्या नुकसानीस कोण जबाबदार?होणारे नुकसान कसे भरून निघणार हा प्रश्न आहे.

Saturday, September 26, 2020

तासगाव तालुका जुनी पेन्शन हक्क संघटन कडून ऑक्सीजन मशीन व आवश्यक औषधे पंचायत समिती तासगाव कडे सुपूर्द



 

पेन्शन हक्क संघटन माध्यमातून शिक्षकांनी जपली सामाजिक बांधिलकी

 

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन तासगाव कडून दोन ऑक्सीजन मशीन व आवश्यक औषधे पंचायत समिती तासगाव सभापती कमलकाकी पाटील यांच्याकडे जुनी पेन्शन हक्क संघटन जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे पंचायत समिती सदस्य संतोष आठवले,संभाजी पाटील,अर्जुन (बापू) पाटील जिल्हा परिषद सदस्य सांगली, दिपाली पाटील सहाय्यक गटविकास अधिकारी तासगाव, प्रकाश कांबळे प्रभारी गटशिक्षणाधिकारी, गीता शेंडगे शिक्षण विस्तार अधिकारी,अनिल सुर्यवंशी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

 

Friday, September 4, 2020

NPS मध्ये वर्ग करण्यापूर्वी DCPS चा व्याज व शासन हिश्श्यासह हिशेब द्या - शिक्षण उपसचिव यांचे पत्र

 


आधी हिशेब नंतर NPS ही भूमिका घेत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन ने NPS फॉर्म भरण्यावर टाकला होता बहिष्का* सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने दिनांक 21 ऑगस्ट 2020 रोजी दिनांक 13 ऑगस्ट 2020 रोजी शिक्षण संचालक यांच्या पत्राचा संदर्भ देत शिक्षकांकडून NPS बाबत फॉर्म 30 ऑगस्ट 2020 अखेर जमा करण्याबाबत पत्र निर्गमित केले होते.यावर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली कडून तीव्र आक्षेप घेत शिक्षण उपसचिव यांच्या 28 जुलै 2020 रोजी च्या पत्रानुसार राष्ट्रीय पेन्शन योजनेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची नोंदणी करण्यापूर्वी परिभाषेत अंशदान निवृत्ती वेतन योजनेसाठी यापूर्वी कपात रकमांचे हिशेब देण्याची कार्यवाही करावी.आधी हिशेब नंतर NPS अशी भूमिका घेत फॉर्म भरण्यावर बहिष्कार घातला.जिल्ह्यातील 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांनी याबाबत नकार पत्र भरून त्याबद्दल असंतोष व्यक्त केला.जिल्ह्यातील एकाही जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने NPS फॉर्म भरून दिला नाही. दिनांक 3 सप्टेंबर रोजी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या उपसचिव यांनी राष्ट्रीय पेन्शन योजनेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची नोंदणी करण्यापूर्वी परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेसाठी यापूर्वी कपात रकमांचे हिशेब देण्याची कार्यवाही तातडीने करण्याबाबत शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक माध्यमिक,प्राथमिक यांना पत्राने कळवले आहे. अंशदान पेन्शन योजनेच्या आमलबजावणीत अनेक त्रुटी आहेत.जसजसा हिशेब समोर येईल तसा राज्यभरातील या पेन्शन योजनेतील सावळागोंधळ समोर येणार असून शासनाने ही योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन प्रयत्न करत राहील - अमोल शिंदे,जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली.... आपल्यासाठी आपणच...... आपला.... अमोल शिंदे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली... 9420453475

Tuesday, August 18, 2020

हिशेब मिळाला म्हणजे झाले ???

 PDF स्वरूपात सोबत एक अर्ज नमुना देत आहोत. योग्य वाटल्यास आपण तो देवून आपला असंतोष व्यक्त करू...

खाली दिलेल्या बटणावर क्लिक करुन अर्ज नमुना डाऊनलोड करा.


🖋️अमोल शिंदे🖋️

जिल्हाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली

9420453475

शिक्षकांना NPS मध्ये वर्ग करण्याबाबत सुरू कार्यवाही संदर्भात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.NPS मध्ये वर्ग होताना पूर्वी झालेल्या कपातीचा हिशेब मिळाला म्हणजे झाले??

आपल्याला माहीत आहे यापूर्वी आपण हिशेब चिट्टी मिळण्यासाठी आंदोलन केले होते.त्यानंतर 2016 पर्यंत हिशेब देण्यात आला होता.त्यात अनेक त्रुटी होत्या.मुळात आपल्या कपातीचा हिशेब देणे प्रशासनाची जबाबदारी आहे.पण DCPS योजना अमलबजाणीकडे इतके दुर्लक्ष होते की आपल्या पगारातून कपात रकेमचे शेड्युल नियमित जिल्ह्याला तालुक्यातून पाठवली गेली नाहीत.त्यामुळे प्रत्यक्ष पगारातून झालेली कपात व मिळालेल्या हिशेब चिट्टी यांच्यात तफावत दिसत होती.यानंतर सदर सर्व शेड्युल पंचायत समिती कडून मागवून सर्व नोंदी वित्त विभागात रजिस्टर वर करण्याचे काम गेली वर्षभर सातत्याने सुरू असून जवळपास सदर काम पूर्णत्वास गेले आहे.आता त्या नोंदी सॉफ्टवेअर वर घेवून आपल्याला आपले हिशेब पुढील काही काळात दिले जातील.परंतु खरा प्रश्न हा आहे की केवळ हिशेब दिला म्हणजे झाले काय???

Sunday, August 16, 2020

शिक्षकांचे भविष्य NPS रुपी दरीमध्ये कडेलोट करून संपवण्यापेक्षा जुनी पेन्शन रुपी संजीवनी द्या..

 राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांची आर्त हाक...


🖋अमोल शिंदे🖋

जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली


NPS मध्ये वर्ग करण्यापूर्वी 15 वर्षे DCPS योजना राबवून काय मिळवले जाहीर करावे...15 वर्षात झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नुकसानीची जबाबदारी कोणाची???

💰💰💶💶⚖️⚖️💶💶💰💰

15 वर्षापूर्वी परिभाषित निवृत्ती वेतन योजना ( DCPS)लागू करण्याबाबत निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी करण्यात शासन यशस्वी झाले नाही.आता 15 वर्षानंतर पुन्हा एकदा सर्व माहिती भविष्य राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या ( NPS) हाती न देता जुनी पेन्शन योजना लागू करून शासनाने कर्मचारी भविष्य सुरक्षित करायला हवे.


परिभाषित निवृत्ती वेतन योजना ( DCPS) केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत (NPS) मध्ये समाविष्ट करण्याबाबत दिनांक 28 जुलै 2020  रोजीचे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग उपसचिव यांचे शिक्षण आयुक्त पुणे यांना पत्र लिहिले.त्यानंतर मा.शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य पुणे 1 यांचे दिनांक 13 ऑगस्ट 2020 रोजी एक पत्र काढले.त्यास अनुसरून बऱ्याच जिल्ह्यात शिक्षणाधिकारी व अधीक्षक,वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक(प्राथमिक व माध्यमिक) यांनी तातडीने मुख्याध्यापक, गट शिक्षणाधिकारी याना पत्र लिहून शिक्षकांचे NPS मध्ये वर्ग करण्याबाबत कार्यवाही तातडीने सुरू केली. कोरोना काळात दाखवलेली तत्परता पाहून काही प्रश्न पडत आहेत....

Tuesday, August 11, 2020

बदलीने जिल्हा बदलला तरी नाते आहे तसेच राहील... निर्माण झालेले ऋणानुबंध अधिक दृढ करू...

 🖋️अमोल शिंदे🖋️

आज आंतरजिल्हा बदली झालेली यादी पाहिली एककिकडे आनंद तर दुसरीकडे जीवाभावाचे  सहकारी दूर जात असल्याचे दुःख.

 आज महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली जेथे आहे तेथे पोहचवण्यात ज्या  बांधवांनी खूप मोलाचे योगदान दिले.स्वराज्यातील मावळे ज्या निष्ठेने योगदान द्यायचे त्याच तोडीचे योगदान या जुनी पेन्शन चळवळीत या लढाऊ शिलेदारांनी दिले.विशेषतः जत तालुक्यातील कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर पंपटवार मूळ नांदेड जिल्ह्याचे असणारे सर कधी परजिल्ह्यातील आहेत असे वाटत नव्हते.जत शहरात आपल्या सुस्वभावाने मोठा मित्रवर्ग जोडलेला...हिवरे मधून सोरडीला बदली झाल्याने पूर्व व पश्चिम दोन्ही भागातील शिक्षकांचा चांगला संपर्क.क्रिकेटची उत्कृष्ट गोडी व जिल्हा परिषद सांस्कृतिक कार्यक्रमात ज्यांच्या टीमचे नृत्य सर्व सभागृह दणाणून सोडे,अगदी  सीईओ साहेबांनी ही गाणे वन्स मोअर घ्यायला लावून स्वतः सहभाग घेतला. शिवाजी अवताडे सर नेहमी कोणतेही काम जबाबदारीने पूर्ण करणारे व्यक्तिमत्व ....आटपाडी मधील विठ्ठल गुट्टे  सर मला कार्यप्रवण करणारे व्यक्तिमत्व...कारण कोणताही प्रश्न निर्माण झाला की सरांचा मेसेज यायचा व मी वाचून दिला नाही की लगेच सरांचा मेसेज अमोलराव रिप्लाय द्या....मला ही हा हक्काचा मेसेज बरा वाटतो...म्हणून अनेकदा रिप्लाय उत्तर असून ही सरांचा तसा मेसेज यायची वाट बघत असतो... दशरथ अतीवाडकर अलिकडल्या काळात परिचय झालेले एक दिलखुलास व्यक्तिमत्व....जत टीम स्टेजवर तर सभागृहात खुर्चीवर दशरथ सर व त्यांची टीम याना पाहण्याचा आनंद वेगळाच...अगदी विनोदी पण खोचक वक्तृत्व.... मैड सर आटपाडी तालुक्यातील एक तंत्रस्नेही शिक्षक मित्र.सर्व आटपाडीकरांचा अंशदान पेन्शन हिशेब चोख ठेवणारे व्यक्तिमत्व...


 शिराळ्याचे वैभव डाकरे,प्रवीण डाकरे या दोन बंधूंनी जिल्ह्याच्या शैक्षणिक उठावात दिलेले योगदान खूप महत्वाचे.वाळव्याचे सचिन पाटील,संदीप कोळी निर्मळ मनाचे मित्र.विठ्ठल पाटील,गणेश पारधी, मेश्राम सर,अमोल खरात,सुर्यवंशी सर,विनोद जाधव यासोबत आमचे ज्येष्ठ बांधव केंद्र प्रमुख भास्कर गंभीरे, दिगंबर तोरकड,आमच्या महिला भगिनी बदलीने आपल्या जिल्ह्यात जात आहेत. हे सगळे आपापल्या जिल्ह्यात जात आहेत याचा आनंद आहे सोबतच हे आपले आपल्या परिवारातील लोक थोडे दूर चालले याचे दुःख ही आहे....


आपण सर्वांनीच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन परिवाराचे सदस्य म्हणून सदैव आपले कर्तव्य पार पाडले. संघटन सक्षम करण्यात योगदान दिले.यापुढे ही आपली बदली झाली असली तरी हे ऋणानुबंध अधिक दृढ राहतील.आपल्या प्रत्येक अडचणीत,सुख दुःखाच्या प्रसंगात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन परिवार एकजुटीने सोबत असेल.आपल्या पुढील वाटचालीस मनस्वी शुभेच्छा....आपल्या जिल्ह्यात आपल्याला इच्छित सोयीचा तालुका मिळावा,त्या तालुका व जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात आपले योगदान महत्त्वाचे असावे याच माझ्याकडून आपणास सदिच्छा....संघटन वाटचालीस आपले मार्गदर्शन नेहमी आपण हक्काने करावे....


MRJPHS सांगलीचे आपले ब्रिद....आपल्यासाठी आपणच..

हे सदैव आपण असाल तेथे जपत राहू....

सदैव आपला...

🖋️अमोल शिंदे🖋️

जिल्हाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली

9420453475