Friday, May 29, 2020

शिक्षकांच्या पगारा बाबत निघणार पत्रक


महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगलीचे सातत्यपूर्ण प्रयत्न..

1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू नाही. आशावेळी राष्ट्रीयकृत बँकेत सॅलरी पॅकेज अंतर्गत पगार झाल्यास विमा संरक्षण मिळते.नुकतेच बँक ऑफ बडोदा ने या योजने अंतर्गत सर्वाधिक 40 लाख विमा संरक्षण देणारी योजना आणली असून,बँक ऑफ इंडिया,स्टेट बँक ऑफ इंडिया,युनियन बँक याही कमी अधिक प्रमाणात लाभ देतात.यातील अधिक लाभ देणारी व सोयीस्कर बँक निवडण्याचे स्वातंत्र्य शिक्षकांना असावे....

त्या अनुषंगाने 13 मार्च रोजी वेतन व अन्य शासकीय ठेवी खाती राष्ट्रीयकृत बँकेत ठेवण्याबाबत शासन निर्णय निर्गमित झाला आहे. शिक्षकांना त्यांचा पगार त्यांना हव्या त्या बँकेत घेण्याचे स्वातंत्र्य
आहे.त्यास अनुसरून जिल्हा परिषदेने पत्रक काढावे याबाबत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सातत्याने प्रयत्नशील आहे.याबाबत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब याना निवेदन देण्यात आले होते.आज याबाबत पुन्हा विनंती केली असून पुढील आठवड्यात याबाबत  जिल्हा परिषद मार्गदर्शक पत्रक काढेल असे आदरणीय साहेबांनी सांगितले आहे.आदरणीय साहेबांचे मनपूर्वक धन्यवाद..


-अमोल शिंदे, जिल्हाध्यक्ष MRJPHS सांगली

No comments:

Post a Comment