२४/०२ व २०/०३ मध्ये मंजूर झालेल्या वरिष्ठ वेतन श्रेणी यादीमधील शिक्षकांचे वेतन निश्चिती आदेश यापूर्वी तयार केले होते. या संदर्भातील काम पंचायत समिती कार्यालयातील क्लार्क एस.डी. पाटील करत होते. त्यांनी तयार केलेले वेतन निश्चिती आदेश मधील वेतनाचे अंतिम आकडे जरी बरोबर असले तरी वेतन निश्चितीची पद्धत थोडी चुकीची होती.
या सर्व गोष्टींचा व वेतन निश्चिती त्रुटींचा अभ्यास करून अमोल शिंदे सर , पी. डी. शिंदे सर व मी शनिवार व रविवार दोन दिवस प्रत्येक बाबीवर चर्चा करून पी. डी. शिंदे सरांच्या मदतीने अचूक असे वेतन निश्चिती आदेश पुन्हा तयार केले.
प्रत्येक टप्प्यावर पी.डी.शिंदे सरांनी केलेले सहकार्य अतिशय मोलाचे होते .त्यांचे टीम मिरज याच्या वतीने मनःपूर्वक आभार.
सुधारित आदेशावर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. जगधने साहेब यांच्या आज सह्या घेतल्या.
वरिष्ठ वेतन श्रेणी वेतन निश्चिती च्या नोंदी काल सर्वांचे सेवा पुस्तकात केल्या होत्या. त्या सर्व सेवा पुस्तकावर आज माननीय जगधने साहेब यांच्या सह्या घेतल्या.
२४/०२ व २०/०३ मधील वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर शिक्षकांचे कार्यालयीन काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. आता फक्त सेवा पुस्तके वेतन पडताळणी साठी जिल्हा परिषदेला पाठवायचे आहेत. त्या संदर्भातील आवश्यक पत्र पंचायत समितीचे क्लार्क श्री प्रवीण कांबळे यांना तयार करायला सांगितले आहे.
- श्री. रमेश मगदूम, तालुकाध्यक्ष MRJPHS मिरज
No comments:
Post a Comment