आज दिनांक 15 मे 2020 रोजी मा.ना.विश्वजित कदम सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा राज्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली कडून covid-19 संदर्भाने चेक पोस्ट व अन्य ठिकाणी कार्य करत असलेल्या शिक्षक कर्मचारी यांच्या सुरक्षितता व विमा व राष्ट्रीयकृत बँकेत वेतन बाबत जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे,जिल्हा कोषाध्यक्ष राजकुमार भोसले,जयसिंग पाटील सर यांनी निवेदन देवून चर्चा केली.
यावेळी जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कोळी वस्ती येथे कार्यरत असणारे शिक्षक नानासो सदाशिव कोरे यांचे covid-19 साथ रोखण्यासाठी चेक पोस्ट वर कर्तव्य बजावताना ट्रक चालकाने चिरडल्याने दुर्दैवी निधन झाले. या दुःखद घटनेने covid-19 विरोधात
कार्य करणाऱ्या शिक्षक कर्मचार्यांच्या बाबतीत संघटनेच्या वतीने काही मागण्या निवेदनातून करण्यात आल्या..
1. Covid-19 संसर्ग रोखण्यासाठी कार्यरत शिक्षकांच्या सुरक्षिततेविषयी पुरेशी काळजी घेण्यात यावी.आरोग्य सेवक व पोलीस यांच्यासाठी विम्याची योजना सरकारने घोषित केली आहे. ती शिक्षकांना ही लागू आहे किंवा नाही. याबाबत स्पष्ट शासन आदेश निर्गमित करून covid 19 बाबत कार्यरत शिक्षकांना विमा संरक्षण देण्यात यावे.
2.सर्व शासकीय निधी व सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन राष्ट्रीयीकृत बँकेत करण्याबाबत दिनांक 13 मार्च 2020 रोजी शासन आदेश निर्गमित झालेले आहेत.त्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयीकृत बँकेत करण्याबाबत कार्यवाही होणेबाबत आदेश देण्यात यावेत.असे झाल्यास राष्ट्रीयकृत बँकेमार्फत देण्यात येणारे सॅलरी पॅकेज अंतर्गत लाभ शिक्षकांना मिळतील. यामुळे जवळपास 25 लाख रुपयांचे विमा कवच शिक्षकांना मिळणारच आहे.तरी याबाबत अग्रक्रमाने कार्यवाही करून शिक्षकांची पगार खाती राष्ट्रीयीकृत बँकेत करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी.नुकतेच जत तालुक्यात कर्तव्य बजावताना नानासो कोरे यांचे निधन झाले.त्यांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत असते तर सॅलरी पॅकेज मधून अधिकचे लाभ मिळाले असते.तरी अधिक काळ न घालवता लवकरात लवकर शासन आदेशानुसार सर्व सांगली मध्ये सर्व जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत होण्याबाबत कार्यवाही करणेबाबत सूचित करण्यात यावे.
3. कर्तव्य बजावताना दुःखद निधन झालेल्या कै.नानासो कोरे यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस अनुकंप अंतर्गत सेवेत घेण्यात यावे. नानासो कोरे 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आले असल्याने त्यांना नवीन पेन्शन योजना लागू आहे.यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्ती वेतन योजना लाभ मिळत नाही. विशेष बाब म्हणून नानासो कोरे यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन योजनेचा लाभ देण्याची मागणी केली.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली
✊✊✊✊✊✊✊✊
आपल्यासाठी आपणच....

No comments:
Post a Comment