Friday, July 1, 2022

वास्तव आणि अपेक्षा - भाग ०६ - इतर आणि किरकोळ खर्च : एक न उलगडलेले कोडे

 सर्व सामान्य सभासदांच्या नजरेत सांगली शिक्षक बँक...

🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔

(✒️✒️ रमेश मगदूम -मिरज एक सर्वसामान्य सभासद फोन नं.9767290767)

   शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेच्या तोंडावर आपल्या हातात पडतो तो वार्षिक अहवाल...याचा बारकाईने अभ्यास केल्यास खर्चाचा ताळेबंद सादर करताना इतर खर्च व किरकोळ खर्च या दोन बाबींवर स्वतंत्र खर्च दाखवून सर्वसामान्य सभासदांना इतर व किरकोळ यातील फरक सहज लक्षात येऊ नये ,याची जणू व्यवस्थाच केलेली असते की काय? असा मनात प्रश्न निर्माण होतो. इतर खर्च या सदराखाली उपखर्चात पुन्हा *किरकोळ खर्च व  इतर खर्च* स्वतंत्र कसा काय दाखवता येतो ? हा संशोधनाचा विषय.

उदा. 2020-21 मध्ये एकूण इतर खर्च 2कोटी 49 लाख रु. असून त्यातील उपखर्चात स्वतंत्र किरकोळ खर्च 2लाख 80 हजार व इतर खर्च 5लाख 21 हजार दाखवलेला आहे.


वर्षनिहाय इतर खर्च👇🏻👇🏻

🔔🔔 2015 -16🔔🔔

खर्च = रु.1कोटी 42 लाख

भांडवली खर्चाशी प्रमाण = 3.06%

🔔🔔 2016 -17🔔🔔

खर्च = रु.1कोटी 28 लाख

भांडवली खर्चाशी प्रमाण = 2.61%

🔔🔔 2018 -19🔔🔔

खर्च = रु.1कोटी 13लाख

भांडवली खर्चाशी प्रमाण = 2.19%

🔔🔔 2019 -20🔔🔔

खर्च = रु.2कोटी 14 लाख

भांडवली खर्चाशी प्रमाण = 3.79

🔔🔔 2020 -21🔔🔔

खर्च = रु.2कोटी 49 लाख

भांडवली खर्चाशी प्रमाण = 4.19%


   संस्थेच्या भांडवली खर्चात कर्मचाऱ्यांवर(वेतन ,फंड, बोनस) होणारा खर्च सर्वात जास्त 16.73% असून त्यांनतरचा सर्वात जास्त खर्च "इतर खर्च"या प्रकारचा असून तो 4.19% आहे.

     इतर खर्च व किरकोळ खर्च या सदराखाली अनेक "इतर" खर्च करण्याची संधी साधली जाते आणि याचा बुर्दंड सर्वसामान्य सभासदांवरच पडतो.

उदा.सन 2020-21 मध्ये कॉम्प्युटर घसारा नावाखाली झालेला खर्च 58 लाख रु असून पुन्हा इतर खर्च या सदराखाली कॉम्प्युटर मेंटेनन्स खर्च 36लाख 12 हजार रु झालेला आहे.(इतर खर्चातील काही खर्च अपरिहार्य व गरजेचे आहेत ;मात्र काही खर्च टाळून संस्थेला पर्यायाने सभासदांना थोडा अधिकचा दिलासा देणे शक्य आहे.)

        सभासद बंधू भगिनींनो , सांगली शिक्षक बँक आपली कामधेनू असून ती टिकली पाहिजे , वाचली पाहिजे , वाढली पाहिजे पण सभासदांचे शोषण करून नव्हे तर सभासदांचे पोषण करून. (वरील आकडेवारीमध्ये आक्षेप असला तर संपर्क करावा , पुराव्यानिशी चर्चा करू🙏)

मित्रांनो , वय कमी ,कदाचित अनुभवही कमी मात्र वास्तव परिस्थितीशी भिडण्याची इच्छाशक्ती मात्र तितकीच दुर्दम्य...अशक्य काहीच नाही...व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईत फक्त पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा..

येणाऱ्या निवडणूकीत सर्वसामान्य सभासदांच्या हितासाठी , सभासदांच्या स्वाभिमानासाठी 3 जुलै रोजी आपले अनमोल मत व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईत "स्वाभिमानी शिक्षक मंडळाला" देऊन आपणच आपला आधार होऊया


🔔 माझे मत कपबशीला...माझे मत परिवर्तनाला...माझे मत स्वाभिमानीला🔔

☕️☕️☕️☕️☕️☕️☕️☕️☕️☕️☕️☕️

क्रमशः ....

🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻

आपलाच ,

  रमेश मगदूम 

  स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळ ,सांगली

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment