Friday, July 1, 2022

यंदा गुरुजी बँकेत परिवर्तन करत भाकरी फिरवनार - दै. जनप्रवास

 शिक्षक बँक वार्तापत्र

मिरज - प्रतिनिधी...

🟥🟥🟥🟥🟥🟥🟥

मिरज तालुक्यात स्वाभिमानीला जोरदार प्रतिसाद

यंदा गुरुजी बँकेत परिवर्तन करत भाकरी फिरवनार

🟥🟥🟥🟥🟥🟥🟥


मिरज तालुका सर्वसाधारण गटातून अमोल शिंदे,शामागोंडा पाटील,मिलन नागणे व जिल्हा अनुसूचित राखीव गटातील उमेदवार अमोल माने या उमेदवारांनी मिरज तालुक्यात प्रचारात आघाडी घेतली आहे.



पारदर्शी कारभार...शिक्षक बँकेतील व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी स्वाभिमानी मंडळाने मांडलेल्या जाहीरनाम्यास  सभासदांचा जोरदार पाठींबा मिळत आहे. एक अंकी व्याजदर दोन अंकी डिव्हीडंट, निष्कर्जी  सभासदांना वीस लाख रुपये मदत,ऑटो डेबीट पद्धत या मुद्द्यांना पसंती मिळत आहे. जिल्ह्यातील 12 संघटना व त्यांचे पदाधिकारी प्रचारात सक्रिय झाल्याने निवडणुकीचा रंग बदलला आहे. सत्ताधाऱ्यांच्या कारभाराची अचूक तुलनात्मक व ऑडिट रिपोर्ट च्या माध्यमातून पोलखोल केल्याने सभासद जागृत झाले आहेत. स्वाभिमानीची वज्रमूठ सत्ताधाऱ्यांवर भारी पडणार असे दिसत आहे...21/0 होणार अशी चर्चा सभासदांत रंगली आहे.


सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या उमेदवारी वरून जत व मिरज मध्ये प्रचंड नाराजी असल्याची चर्चा आहे....तसेच पुरोगामी मधील सहभागी संघटना मध्ये झालेली बंडखोरी व खाजगी मधील सेवानिवृत्त नेत्याने आपल्याच कुटुंबाला वारंवार घेतलेला शिक्षक बँकेचा लाभ व पुन्हा यावर्षी स्वतःच्या मुलीला मिळवलेली उमेदवारी,तसेच पुरोगामीला पाठिंबा दिलेला खाजगी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांच्या नातेवाईकास बँकेत नोकरी लावली असून वैयक्तिक स्वार्थासाठी बँकेच्या निवडणुकीत पाठींबा देणाऱ्या नेत्यांबद्दल खाजगी शिक्षकांत नाराजी दिसत आहे.उर्दू शिक्षक संघटनेच जे नेतृत्व शिक्षकांसाठी नेहमी लढते त्यांना सोडून सेवानिवृत्त उर्दू शिक्षक नेत्यांना बँकेच्या तोंडावर पुन्हा प्रकाश झोतात आणत आमच्या सोबत इतर संघटना आहेत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.


दुसरीकडे महिलांना आम्ही अधिकचे प्रतिनिधित्व दिले असल्याचे पुरोगामी मंडळ सांगत आहे परंतु दोन महिला उमेदवार शिक्षक बँकेच्या माजी चेअरमन व  संचालक यांच्या पत्नी असून,एक खाजगी शिक्षक संघटनेच्या नेत्यांची कन्या आहे...तर मिरजेत आणि वेळी दोन वर्षांपूर्वी पासून तयारी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने सत्ताधाऱ्यांना उमेदवार मिळत नव्हता...त्यामुळे बंडखोरीच्या पवित्र्यात असलेल्या महिला उमेदवारास उमेदवारी जाहीर केली.त्यामुळे केवळ दाखवायचे दात व खायचे दात वेगळे असल्याचे सभासदांना लक्षात आले आहे....


सोलापूर जिल्ह्यात आदर्श शिक्षक समितीने स्वाभिमानीला दिलेल्या पाठिंब्यामुळे सत्ताधारी मंडळींची सोलापूर जिल्ह्याच्या मतावर सत्तेत येण्याचे स्वप्न भंगले आहे.अंकुश काळे सर व सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांनी स्वाभिमानीच्या प्रचारात घेतलेली आघाडी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या परिवर्तनाची नांदी असून 12 वर्षाची सत्ता परिवर्तन करून स्वाभिमानी च्या संचालक मंडळाला व्यवस्था परिवर्तन करण्याची संधी यावेळी सभासद उपलब्ध करून देतील असे चित्र आहे.


यंदाच्या निवडणुकीत सांगली व सोलापूर मधील सभासद स्वाभिमानीच्या पाठीशी ठाम उभे असून मोठ्या अंतराने स्वाभिमानी विजयी होणार असा अंदाज वर्तवला जात आहेत... पुरोगामी मंडळाच्या जिल्हा मेळाव्याला जेवढी उपस्थिती होती त्यापेक्षा स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाच्या प्रत्येक तालुका मेळाव्यांना अधिक गर्दी असल्याने सरळ सरळ परिवर्तनाच्या दिशेने शिक्षक बँक असून यंदा गुरुजी भाकरी फिरवणार असेच चित्र आहे....


💥💥💥💥💥💥

No comments:

Post a Comment