Saturday, July 2, 2022

वास्तव आणि अपेक्षा - भाग ०७ - हीच ती वेळ -अभी नहीं तो कभी नहीं

🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔

(✒️✒️ रमेश मगदूम -मिरज एक सर्वसामान्य सभासद फोन नं.9767290767)

               सर्व शिक्षकांची कामधेनू , सांगली शिक्षक बँकेची निवडणूक उद्या रविवार दि.३ जुलै रोजी होत असून यानिमित्ताने गेल्या 20 दिवसांपासून वास्तव आणि अपेक्षा या सदराखाली अतिशय वस्तुनिष्ठ मांडलेल्या लेखमालिकेला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

                  इतर वित्तीय संस्था ,शिक्षक बँका यांच्या तुलनेत कर्जाचे व्याजदर कमी करण्यात आलेले अपयश , दिलेला शब्द डावलून केलेली कर्मचारी भरती ,100% वसुली शक्य असताना कोट्यवधी रुपयांची थकबाकी , संगणक खरेदी - दुरुस्ती ते फर्निचरवर अवाजवी खर्च करून केलेला भ्रष्टाचार यासह अनेक मुद्यांवर सर्वसामान्य सभासदांच्या मनामध्ये प्रचंड नाराजी होती. या नाराजीचे प्रतिनिधित्व करत आम्ही काही वस्तुनिष्ठ मुद्यांसह वास्तव आकडेवारी आपल्यासमोर मांडली आहे. वरील मुद्यांवर व्यवस्था परिवर्तनाच्या उद्देशाने धोरणाच्या आधारे आम्ही प्रचार करत असताना अजूनही सगळं काही आमच्याच खिशात हवं या उद्देशाने गेल्या ७-८ दिवसांत प्रचारासाठी कोणकोणती आयुधं वापरली आहेत , याचे साक्षीदार आपण सर्वजण आहोत. आता आपल्यासारख्या सर्वसामान्य सभासदांची जबाबदारी वाढली आहे. यापूर्वी सादर केलेली सर्व लेखमालिका लिंकच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्यासमोर pdf स्वरूपात मांडत आहे. त्यातील प्रत्येक लेख शक्य झाल्यास वाचा आणि ठरवा मतदान कोणाला व का करायचे ते... नक्कीच आपलं मन योग्य उत्तर देईल...तर मग चला..उठा...व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईचे साथीदार व साक्षीदार व्हा...आता नाही तर कधीच नाही.

परिवर्तन माझ्यासाठी

परिवर्तन आपल्यासाठी

परिवर्तन सर्वांसाठी


आपला लढा विकासात्मक परिवर्तनासाठी आणि पारदर्शी बँक कारभारासाठी

🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻


उद्याच्या निवडणूकीत सर्वसामान्य सभासदांच्या हितासाठी , सभासदांच्या स्वाभिमानासाठी उद्या 3 जुलै रोजी आपले अनमोल मत व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईत "स्वाभिमानी शिक्षक मंडळाला" देऊन आपणच आपला आधार होऊया

माझे मत कपबशीला...माझे मत परिवर्तनाला...माझे मत स्वाभिमानीला

☕️☕️☕️☕️☕️☕️☕️☕️☕️☕️☕️☕️

क्रमशः ....

🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻

आपलाच ,

  रमेश मगदूम 

  स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळ ,सांगली

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment