Friday, July 1, 2022

वास्तव आणि अपेक्षा - भाग ०५ - बक्षीस व बोनस पगाराची खैरात सभासदांच्या मुळावर

 सर्व सामान्य सभासदांच्या नजरेत सांगली शिक्षक बँक...

🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔

(✒️✒️ रमेश मगदूम -मिरज एक सर्वसामान्य सभासद फोन नं.9767290767)

कोणत्याही वित्तीय संस्थेच्या वाटचालीत त्या संस्थेतील कर्मचाऱ्यांचे व व्यवस्थापनाचे योगदान महत्वाचे असते. वित्तीय सहकारी संस्थेमध्ये कर्मचाऱ्यांनी आपले अधिकचे योगदान देऊन अपेक्षित नफ्यापेक्षा जास्त नफा मिळवून दिल्यास बक्षीस व बोनस पगार देऊन कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची प्रथा रूढ आहे. जर अपेक्षित नफा मिळाला नाही तर बक्षीस व बोनस पगार कर्मचाऱ्यांना देणे बंधनकारक नसते.

     सांगली शिक्षक बँकेचे सध्याचे एकूण खेळते भांडवल व उलाढाल बघता प्रतिसेवक वार्षिक नफा किमान 4 लाख रु होणे अपेक्षित असून त्याच्यापेक्षा जास्त नफा मिळाल्यास कर्मचाऱ्यांना शाबासकी म्हणून बक्षीस व बोनस पगार देणे संस्थेच्या हिताचे आहे.

🔔 सांगली शिक्षक बँक - सन 2020-21 मधील आकडेवारी🔔👇🏻

वार्षिक नफा - रु.4 कोटी 49 लाख

प्रतिसेवक नफा - रु.2लाख 67हजार

तरतूद केलेला बक्षीस पगार रक्कम - 62 लाख रुपये (प्रति सेवक एक महिन्याचा पगार)

🔔 नगर शिक्षक बँक - सन 2020-21 मधील आकडेवारी🔔👇🏻

वार्षिक नफा - रु.6 कोटी 37 लाख

प्रतिसेवक नफा - रु.6 लाख 06 हजार

तरतूद केलेला बक्षीस पगार रक्कम - 37 लाख रुपये (प्रति सेवक एक महिन्याचा पगार)

 सांगली शिक्षक बँकेत २०१५ पासून गेल्या ७ वर्षात एकूण 11 अतिरिक्त पगार कर्मचाऱ्यांना बक्षीस व बोनस पगाराच्या स्वरूपात विद्यमान संचालक मंडळाने देण्यात आले आहेत. एका मासिक पगारासाठी सरासरी 60 लाख रुपये लागतात.

गेल्या ७ वर्षात बक्षीस व बोनस पगारावर खर्च झालेली रक्कम = 60 लाख × 11 पगार = 6 कोटी 60लाख रुपये

 गेल्या ७ वर्षातील प्रत्येक वर्षीचा प्रतिसेवक नफा बघितल्यास कर्मचाऱ्यांना बक्षीस व बोनस पगार देणे संस्थेच्या हिताचे नव्हते , असे असताना जवळजवळ प्रत्येक वर्षी कर्मचाऱ्यांवर बक्षीस व बोनस पगाराची खैरात केली गेली आहे.

🔔 सन 2015-16 🔔👇🏻👇🏻

वार्षिक नफा - रु. 1,32,39745/-

प्रतिसेवक नफा - रु. 83,795/- 

🔔 सन 2016-17 🔔👇🏻👇🏻

वार्षिक नफा - रु. 1,86,27,268/-

प्रतिसेवक नफा - रु. 1,17,894/-

🔔 सन 2017-18🔔👇🏻👇🏻

वार्षिक नफा - रु. 2,56,23,355/-

प्रतिसेवक नफा - रु. 1,58,168 /-

🔔 सन 2018-19 🔔👇🏻👇🏻

वार्षिक नफा - रु. 3,37,49,801 /-

प्रतिसेवक नफा - रु. 1,96,219 /-

🔔 सन 2019-20 🔔👇🏻👇🏻

वार्षिक नफा - रु. 2,61,26,290 /-

प्रतिसेवक नफा - रु. 1,51,897 /-

🔔 सन 2020-21 🔔👇🏻👇🏻

वार्षिक नफा - रु. 4,49,37,574 /-

प्रतिसेवक नफा - रु. 2,67,485 /-

संस्था व सभासद हित डोळ्यासमोर ठेऊन गेल्या ५-७ वर्षात बक्षीस व बोनस पगार देणं टाळलं असतं तर प्रत्येक सर्वसामान्य सभासदांना गेल्या ५ वर्षात रु.9200 अधिकचा डिव्हिडंड मिळाला असता.

संस्था व सभासद हिताला फाटा देऊन संचालक मंडळाच्या व कारभाऱ्यांच्या मनामध्ये कर्मचाऱ्यांना बक्षीस व बोनस पगार देण्याचा इंटरेस्ट का असतो?? या प्रश्नाचे उत्तर आपणा सर्व सभासदांच्या मनामध्ये आहेच , त्यामुळे सुज्ञास अधिक सांगणे नको.

        सभासद बंधू भगिनींनो , सांगली शिक्षक बँक आपली कामधेनू असून ती टिकली पाहिजे , वाचली पाहिजे , वाढली पाहिजे पण सभासदांचे शोषण करून नव्हे तर सभासदांचे पोषण करून. (वरील आकडेवारीमध्ये आक्षेप असला तर संपर्क करावा , पुराव्यानिशी चर्चा करू🙏)

मित्रांनो , वय कमी ,कदाचित अनुभवही कमी मात्र वास्तव परिस्थितीशी भिडण्याची इच्छाशक्ती मात्र तितकीच दुर्दम्य...अशक्य काहीच नाही...व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईत फक्त पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा..

येणाऱ्या निवडणूकीत सर्वसामान्य सभासदांच्या हितासाठी , सभासदांच्या स्वाभिमानासाठी 3 जुलै रोजी आपले अनमोल मत व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईत "स्वाभिमानी शिक्षक मंडळाला" देऊन आपणच आपला आधार होऊया.

क्रमशः ....

🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻

आपलाच ,

  रमेश मगदूम 

  स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळ ,सांगली

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment