दिनांक 11 जून 2019
जिल्हा परिषदेत मा.मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत साहेब यांची स्वर्गीय नानासो कोरे सर यांच्या विमा प्रस्ताव व अनुकंपा प्रस्ताव संदर्भात भेट घेतली यावेळी खालील काही प्रश्नाबाबत ही चर्चा करून निवेदन देण्यात आले.
⚫विविध शालेय अनुदान शाळांना वर्ग करण्याबाबत दिनांक 23 मार्च रोजी आदेश निघाले.शाळांच्या खात्यावर सदर अनुदान 15 एप्रिल रोजी जमा झाले आहे.16 मार्च पासून लॉक डाऊन असल्याने सर्व दुकाने,व्यवसाय बंद
होते त्यामुळे सदर अनुदान 31 मार्च पूर्वी खर्च करणे शक्य नव्हते.सदर अनुदान खर्च करण्यासाठी ऑगस्ट 2020 पर्यंत मुदत वाढ देण्यात यावी.सदर अनुदान खर्च करण्याबाबत मार्गदर्शक पत्र निर्गमित करण्यात यावेत ही विनंती करण्यात आली.
⚫दरवर्षी 15 जून रोजी नियमित शाळा सुरू होत होत्या परंतु यावर्षी लॉक डाऊन मुळे 15 जून रोजी प्रत्यक्ष शाळा सुरू होणे शक्य नाही.ऑनलाईन माध्यमातून शक्य तेथे विद्यार्थ्या पर्यंत शिक्षण पोहचवण्याचा प्रयत्न होत आहे.15 जून पासून नियमित सुट्टी संपत आहे.30 जून पर्यंत शाळा सुरू करण्याबाबत शासनाकडून आदेश नाहीत.पुढील शासन आदेश व वेळोवेळी देण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही केली जाईल.
⚫ कोव्हिड 19 मुळे इतर जिल्ह्यात असणाऱ्या शिक्षकांना पुन्हा जिल्ह्यात येताना पास घेवून त्यांना जिल्ह्यात यावे लागणार आहे. अंतर- जिल्हा प्रवासी वाहतुक बंद असल्याने,अडचणी येत आहेत.शेजारील जिल्ह्यातून नियमित येणाऱ्या शिक्षकांना परवानगी देण्याबाबत विनंती केली.
प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे मॅडम यांची भेट घेण्यात आली यावेळी खालील मुद्द्यांबाबत चर्चा झाली
⚫दिनांक 13 मार्च 2020 शासन आदेशानुसार शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत होण्यासंदर्भात केंद्र प्रमुख यांची करंट खाती उघडण्यास परवानगी देण्याबाबत गट शिक्षणाधिकारी यांना सूचित करण्यात यावे ही विनंती केली.याबाबत वित्त विभागाकडे टिपनी ठेवली असल्याचे मॅडमनी सांगितले.
⚫विषय शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी मंजुरी फाईल शिक्षण विभागात दीर्घ काळ प्रलंबित असून सदर पात्र शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी लवकरात लवकर मंजूर करण्यात यावी.ही विनंती केली.संबंधित लिपीकाना सूचना देण्यात आल्या 9 विषय शिक्षकांची यादी तयार असून,अन्यही काही नव्याने आलेले प्रस्ताव,त्रुटी पूर्तता केलेले प्रस्ताव यांची यादी तयार करून या महिना अखेर पर्यंत कार्यवाही पूर्ण केली जाईल.
⚫तीन वर्षे शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झालेल्या शिक्षकांनी नियायमितीकरन प्रस्ताव जिल्हा परिषद शिक्षण विभागास सादर केले आहे.सदर प्रस्तावास मंजुरी देण्याबाबत विनंती केली.
⚫जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना सातवा वेतन आयोग अंतर्गत रोखीने द्यायचा डीसीपीएस रक्कमेचा नियमित दुसरा हप्ता 1 जुलै ला देण्याबाबत विनंती केली.याबाबतीत शिक्षण संचालक कार्यालयाकडून आजच माहिती मागवली असून तालुक्यातून आवश्यक अनुदान बाबत माहिती घेतली असून कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले.
माध्यमिक शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग साहेब यांची भेट
⚫जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचा सातवा वेतन आयोग अंतर्गत रोखीने द्यायचा डीसीपीएस पहिला हप्ता 1 जुलै 2019 ला देण्याबाबत शासन आदेश होते पण आज अखेर सदर हप्ता जमा करण्यात आलेला नाही. गत वर्षीचा पहिला व यावर्षीचा दुसरा हप्ता देण्याबाबत संबंधिताना सूचना व्हाव्यात ही विनंती केली.माध्यमिक शिक्षणाधिकारी साहेबांनी वेतन पथक अधीक्षक ढेपे साहेब याना फोनवरून याबाबत कार्यवाही करण्यास सांगितले.यावेळी जिल्हा कोषाध्यक्ष राजकुमार भोसले,जिल्हा सरचिटणीस राहुल कोळी सर, संघटनचे मार्गदर्शक प्रदीप पोलकर सर उपस्थित होते...
आपला
अमोल शिंदे
जिल्हाध्यक्ष
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली टिम राज्याला दिशादर्शक काम करत असते, आपण उत्कृष्ट ब्लॉग बनवला आहे , संघटनसाठी माहितीचा खजिना असेल. पुणे जिल्हा टिमकडून आपणांस खूप खूप शुभेच्छा
ReplyDelete