Thursday, June 4, 2020

मिरज तालुका गटशिक्षणाधिकारी साहेब यांचे स्वागत व भेट

आज महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन मिरज च्या वतीने पंचायत समिती मिरज या ठिकाणी नव्याने हजर झालेले गटशिक्षणाधिकारी श्री. कालगावकर साहेब यांची भेट घेण्यात आली. संघटनच्या वतीने साहेबांचे स्वागत करण्यात आले.तसेच शिक्षक  प्रश्नांसंदर्भातील निवेदन देऊन साहेबांशी तालुक्यातील विविध शिक्षक प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यात आली.

 शैक्षणिक विषयावर चर्चा करत जवळ जवळ तासभर साहेबांनी संघटन साठी वेळ देत कार्यालयीन स्तरावरीलकोणताही प्रश्न प्रलंबित रहाणार नाही असे आश्वासन देत तालुक्याच्या शैक्षणिक विकासात संघटनांची भूमिका पूरक असावी , अशी अपेक्षा व्यक्त केली.


  निवेदनात नमूद केलेल्या प्रत्येक विषयावर साहेबांशी चर्चा झाले.त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँकेत केंद्रप्रमुख पगार



  खाते काढण्यासंदर्भात कार्यालयीन पत्र आवश्यक असल्याचे साहेबांच्या निदर्शनास आणून दिले.सदर बाबत मा गटविकास अधिकारी मिरज यांचे केंद्रप्रमुख यांचे करंट खाते बाबत पत्र उद्यापर्यंत मिळेल , अशी माहिती मिळाली.


   यावेळी जिल्हा कार्यवाहक नेताजी भोसले सर , संघटनचे कार्याध्यक्ष दिलीप नरूटे सर ,जिल्हा कोषाध्यक्ष राजकुमार भोसले सर , संघटनेचे प्रवक्ते अमोल सातपुते सर उपस्थित होते.


🤝🤝 आपल्यासाठी आपणच👊🏻👊🏻

🖋️ तालुकाध्यक्ष 🖋️
श्री रमेश मगदूम
 व टीम MRJPHS , मिरज.

No comments:

Post a Comment