आज स्वतः मा.मंत्री महोदय बच्चूभाऊ कडू साहेब यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पत्र लिहून शिक्षणसेवक मानधन वाढ करणे आवश्यक असल्याची विनंती केली.मंत्री महोदय बच्चूभाऊ कडू साहेब यांनी केलेल्या मागणीने शिक्षण सेवकांच्या रास्त मागणीला बळ मिळाले असून राज्यातील शिक्षण सेवकांच्या मानधन वाढीच्या आशा पल्लवीत झाल्या.ना.बच्चूभाऊ कडू यांनी केलेल्या विनंती बद्दल राज्यभरातील शिक्षणसेवकानी त्यांचे विविध समाज माध्यमातून आभार व्यक्त केले.
गेली काही दिवस शिक्षणसेवक मानधन वाढ विषय थांबला होता.नवनियुक्त शिक्षण सेवक मानधन वाढ यावी याबाबत विविध माध्यमातून सतत पाठपुरावा करत आहेत.केवळ 6000 इतक्या वेतनावर आपला उदरनिर्वाह चालवणे जिकिरीचे बनल्याने लवकरात लवकर मानधन वाढ करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.शिक्षण सेवक यांची मागणी नेमकी काय आहे?याबद्दल नुकतेच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली ने याबाबत शिक्षणसेवक मानधन वाढ का गरजेची? याबाबत यू ट्यूब वर व्हिडिओ बनवून शिक्षण सेवकांची व्यथा समोर आणण्याचा प्रयत्न करत शिक्षणसेवक मानधन वाढीची आग्रही न्याय मागणी पुढे आणली आहे,तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांना संघटन कडून निवेदन दिले.त्यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला.सद्या शिक्षणसेवक मानधन वाढ गरजेची आहे. *स्वतः ना.बच्चूभाऊ कडू यांनी मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे पत्राद्वारे केलेली मागणी महत्वपूर्ण आहे.* याबाबत सर्व स्तरातून होत असलेले सातत्यपूर्ण प्रयत्न नक्कीच बदल घडवतील.यासाठी राज्यभरातील शिक्षण सेवक करत असलेल्या धडपडीला सर्व शिक्षक व शिक्षक संघटनांनी साथ देणे गरजेचे आहे.सोशल मीडिया व ऑनलाईन माध्यमातून मेल,sms,twiter वर मानधन वाढ करणेसाठी राबवत असलेल्या मोहिमेत सर्वांनी भाग घ्यावा...कारण हा लढा केवळ शिक्षण सेवकांचा नाही तर सर्वांचा आहे.असे आवाहन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन सांगली जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी केले.
शिक्षण सेवक मानधन वाढ करू - ग्रामविकास मंत्री यांचे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन ला आश्वासन
बातमी पाहण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा
आपला
अमोल शिंदे...
जिल्हाध्यक्ष
MRJPHS SANGLI
9420453475
No comments:
Post a Comment