Wednesday, June 15, 2022

वास्तव आणि अपेक्षा - भाग ०२ - कर्मचाऱ्यांचे तुलनात्मक प्रमाण

 सर्व सामान्य सभासदांच्या नजरेत सांगली शिक्षक बँक...

   📸 वास्तव आणि अपेक्षा - भाग ०२📸

🎯 विषय - कर्मचाऱ्यांचे तुलनात्मक प्रमाण🎯


(अहमदनगर शिक्षक बँकेचा सरसकट व्याजदर सर्वात कमी म्हणजे 8.70% आहे , तो ज्या काही कारणामुळे कमी आहे , त्यातील एक महत्वाचे कारण खालील पोस्ट वाचल्यावर लक्षात येईल🙏)

🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔

(✒️✒️ रमेश मगदूम -मिरज एक सर्वसामान्य सभासद फोन नं.9767290767)





 🔦 शिक्षक बँकेची तुलना शिक्षक बॅंकेशी🔦

💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫

🔔 अहमदनगर शिक्षक बँक🔔

एकूण सभासद संख्या - 11,035

कार्यरत कर्मचारी - 105

🎯 105 सभासदांमागे 1 कर्मचारी🎯

( अहमदनगर बँकेप्रमाणे सभासद /कर्मचारी प्रमाण सांगली बँकेत ठेवले असते तर सांगली बँकेत 69 कर्मचारी असायला हवे होते पण आज 168 कर्मचारी आहेत.)


🔔 कोल्हापूर शिक्षक बँक🔔

एकूण सभासद संख्या - 6217

कार्यरत कर्मचारी - 109

🎯 57 सभासदांमागे 1 कर्मचारी🎯

( कोल्हापूर बँकेप्रमाणे सभासद /कर्मचारी प्रमाण सांगली बँकेत ठेवले असते तर सांगली बँकेत 126 कर्मचारी असायला हवे होते पण आज 168 कर्मचारी आहेत.)


🔔 सातारा शिक्षक बँक🔔

एकूण सभासद संख्या - 10,267

कार्यरत कर्मचारी - 172

🎯 60 सभासदांमागे 1 कर्मचारी🎯

( सातारा बँकेप्रमाणे सभासद /कर्मचारी प्रमाण सांगली बँकेत ठेवले असते तर सांगली बँकेत 121 कर्मचारी असायला हवे होते पण आज 168 कर्मचारी आहेत.)


🔔 सांगली शिक्षक बँक - आपली शिक्षक बँक🔔

एकूण सभासद संख्या - 7 ,200

कार्यरत कर्मचारी - 168

🎯 42 सभासदांमागे 1 कर्मचारी🎯


मिरज तालुक्यातील आरग शाखेतील सभासद संख्या 155 असून कार्यरत कर्मचारी 5 आहेत. तेथील प्रमाण👇🏻

🎯 31 सभासदांच्या मागे 1 कर्मचारी🎯


मित्रांनो , वरील आकडेवारी व सर्व शिक्षक बँकांशी तुलना बघता आपली बँक जास्तीत जास्त 128 कर्मचाऱ्यांवर चालू शकते. 

असे केले असते तर सभासद म्हणून काय फायदा झाला असता?? वाचा👇🏻

एका कर्मचाऱ्याचा मासिक किमान रु.25,000/- प्रमाणे वार्षिक 3 लाख पगार होतो.

40 कर्मचारी ×3 लाख = 1कोटी 20 लाख खर्च कमी झाला असता.


विद्यमान संचालक मंडळाने बँकेच्या भल्यासाठी कर्मचारी भरती करू नका , असा ऑडिट रिपोर्टअसताना 2017 साली 13 कर्मचाऱ्यांची भरती करून सभासदांच्या डोक्यावर वार्षिक 40 लाखाचा भार वाढवला व तो 2017 पासून प्रत्येक वर्षी वाढत जाणार आहे , हे वास्तव आपल्या सर्वांसमोर आहे.

      सभासद बंधू भगिनींनो , सांगली शिक्षक बँक आपली कामधेनू असून ती टिकली पाहिजे , वाचली पाहिजे , वाढली पाहिजे पण सभासदांचे शोषण करून नव्हे तर सभासदांचे पोषण करून... इतर सर्व शिक्षक बँकांची सभासद संख्या व कार्यरत कर्मचारी यांचे प्रमाण बघता सभासदांच्या तुलनेत सर्वात जास्त कर्मचारी सांगली शिक्षक बँकेत आहेत , हे सहज लक्षात येते. (वरील आकडेवारीमध्ये आक्षेप असला तर संपर्क करावा , पुराव्यानिशी चर्चा करू🙏)


मित्रांनो , वय कमी ,कदाचित अनुभवही कमी मात्र वास्तव परिस्थितीशी भिडण्याची इच्छाशक्ती मात्र तितकीच दुर्दम्य...अशक्य काहीच नाही...व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईत फक्त पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा..

येणाऱ्या निवडणूकीत सर्वसामान्य सभासदांच्या हितासाठी , सभासदांच्या स्वाभिमानासाठी 3 जुलै रोजी आपले अनमोल मत व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईत सार्थकी लावून आपणच आपला आधार होऊया

क्रमशः ....

🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻

आपलाच ,

  रमेश मगदूम ,तालुकाध्यक्ष

  महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन ,मिरज.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment