Wednesday, June 15, 2022

वास्तव आणि अपेक्षा - भाग ०३ - थकबाकी : सभासदांच्या मानगुटीवरील भूत

 सर्व सामान्य सभासदांच्या नजरेत सांगली शिक्षक बँक...

   📸 वास्तव आणि अपेक्षा - भाग ०३📸

🎯 विषय - थकबाकी : सभासदांच्या मानगुटीवरील भूत🎯

🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔

(✒️✒️ रमेश मगदूम -मिरज एक सर्वसामान्य सभासद फोन नं.9767290767)

शिक्षक बँकेतील सर्वसामान्य सभासदांच्या जिव्हाळ्याचे दोनच विषय महत्त्वाचे एक कर्जाचा व्याजदर आणि दुसरा मिळणारा डिव्हीडंट...सहकार क्षेत्रात वार्षिक व्यवसायातील नफा हा सभासदांना डिव्हिडंड स्वरूपात वाटला जातो. गेल्या 5-6 वर्षात डिव्हिडंड कमी मिळण्याच्या काही कारणांपैकी थकबाकी हे कारण प्रकर्षाने समोर येत आहे. पगारदार नोकरांची 100%वसुली होणारी संस्था असताना थकबाकी पडतेच कशी व ती टप्प्याटप्प्याने वाढतच कशी चालली आहे ? हा प्रश्न चिंतनीय आहे(अपवादात्मक परिस्थितीत एखादे खाते थकबाकीत जाऊ शकते हे मान्य पण खूपच मर्यादित स्वरूपात) . रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार एकूण नफ्यातील रक्कमेतून थकबाकी बाजूला काढून (रिझर्व्ह ठेऊन) नफा वाटावा लागतो , त्यामुळे सर्वसामान्य सभासदांना मिळणारा डिव्हिडंडच्या स्वरूपातील नफा खूप कमी होतो

💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫

👇🏻 वर्ष निहाय वाढत गेलेली थकबाकी👇🏻

🔔 2014-15 = 46 लाख 83 हजार🔔


🔔 2015-16 = 49 लाख 99 हजार🔔

🎯 थकबाकी वाढ = 7%🎯


🔔 2016-17 = 59 लाख 10 हजार🔔

🎯 थकबाकी वाढ = 18%🎯


🔔 2017-18 = 76 लाख 98 हजार🔔

🎯 थकबाकी वाढ = 30%🎯


🔔 2018-19 = 1 कोटी 17 लाख 35 हजार🔔

 🎯 थकबाकी वाढ = 52% 🎯


🔔 2019-20 = 1 कोटी 43 लाख 12 हजार🔔

 🎯 थकबाकी वाढ = 22%🎯


🔔 2020-21 = 2 कोटी 68 लाख 61 हजार🔔

 🎯 थकबाकी वाढ = 87%🎯


🔔 2021-22 = गेल्या आर्थिक वर्षातील नफा ,थकबाकी व संभाव्य डिव्हिडंड इतर शिक्षक बँकांनी जाहीर केला पण सांगली शिक्षक बँकेने फक्त "साडेबारा कोटी" नफा इतकीच गोष्ट जाहीर करून थकबाकी मात्र गुलदस्त्यात ठेवली...असं जरी असलं तरी "ढोबळ नफा साडेबारा कोटी व निव्वळ नफा 6 कोटी" यातच वरील गुलदस्ता मोकळा होतोय.

  एखाद्या सभासदाच्या क्षमतेपेक्षा जास्त कर्जवाटप , वसुली यंत्रणेतील तांत्रिक दोष , कर्मचारी म्हणून कर्जवसुलीतील केलेला हलगर्जीपणा या व अशा काही कारणाने कर्जखाती NPA मध्ये जाऊन थकबाकी टप्प्याटप्प्याने वाढली व त्यामुळे सर्वसामान्य सभासदांच्या खिशावर नाहक टाच पडल्याचे सचित्र आकडे आपल्या समोर आहेत.

      सभासद बंधू भगिनींनो , सांगली शिक्षक बँक आपली कामधेनू असून ती टिकली पाहिजे , वाचली पाहिजे , वाढली पाहिजे पण सभासदांचे शोषण करून नव्हे तर सभासदांचे पोषण करून. (वरील आकडेवारीमध्ये आक्षेप असला तर संपर्क करावा , पुराव्यानिशी चर्चा करू🙏)

मित्रांनो , वय कमी ,कदाचित अनुभवही कमी मात्र वास्तव परिस्थितीशी भिडण्याची इच्छाशक्ती मात्र तितकीच दुर्दम्य...अशक्य काहीच नाही...व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईत फक्त पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा..

येणाऱ्या निवडणूकीत सर्वसामान्य सभासदांच्या हितासाठी , सभासदांच्या स्वाभिमानासाठी 3 जुलै रोजी आपले अनमोल मत व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईत "स्वाभिमानी शिक्षक मंडळाला" देऊन आपणच आपला आधार होऊया

क्रमशः ....

🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻

आपलाच ,

  रमेश मगदूम ,तालुकाध्यक्ष

  महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन ,मिरज.

No comments:

Post a Comment