Wednesday, June 15, 2022

वास्तव आणि अपेक्षा - भाग ०१ - तुलनात्मक व्याजदर

 सर्व सामान्य सभासदांच्या नजरेत सांगली शिक्षक बँक...

वास्तव आणि अपेक्षा - भाग ०१

विषय - तुलनात्मक व्याजदर

🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🔔

(✒️✒️ रमेश मगदूम -मिरज एक सर्वसामान्य सभासद फोन नं.9767290767)



    शिक्षक बँकेची तुलना इतर पतसंस्था किंवा शिक्षक सोसायटीशी न करता शिक्षक बॅंकेशीच तुलना करावी आणि मग बोलावं असा मतप्रवाह पुढं आला आणि एक प्रयत्न केला शिक्षक बँकेची तुलना शिक्षक बॅंकेशी करण्याचा.. ही तुलना करताना वास्तव परिस्थिती व आकडेवारीनिशी तुलना आपल्या समोर मांडतोय..सर्वसामान्य सभासदांनी आपली सद्सद्विवेकबुद्धी पणाला लावून जरूर विचार करावा ,योग्य काय आणि अयोग्य काय?

💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫

🔔 अहमदनगर शिक्षक बँक🔔

कर्जमर्यादा 35 लाख

१)जामीनकी कर्ज मर्यादा- 28 लाख

कर्जाचा व्याजदर - 8.70%

२) शैक्षणिक कर्ज , वाहन कर्ज , गृहकर्ज मर्यादा - 7 लाख

कर्जाचा व्याजदर  - 8.20%


🔔 कोल्हापूर शिक्षक बँक🔔

कर्जमर्यादा - 40 लाख

सर्व कर्जाचा व्याजदर - 10%


🔔 सातारा शिक्षक बँक🔔

कर्जमर्यादा 40 लाख

१)दिर्घमुदत कर्ज मर्यादा- 25 लाख

कर्जाचा व्याजदर - 10.5%

२) शैक्षणिक कर्ज  मर्यादा - 7 लाख

 कर्जाचा व्याजदर  - 7.50%

३)वाहन व गृहकर्ज मर्यादा- 40 लाख

  कर्जाचा व्याजदर - 8.50%


🔔 सांगली शिक्षक बँक - आपली शिक्षक बँक🔔

कर्जमर्यादा 40 लाख

१)जामीनकी कर्ज मर्यादा- 30 लाख

कर्जाचा व्याजदर - 12.75%

२)जामीनकी नं.०१ - कर्जमर्यादा -10 लाख

कर्जाचा व्याजदर - 12.00%

३) जामीनकी नं.०२ - कर्जमर्यादा 16 लाख

कर्जाचा व्याजदर - 9.90%  ( जो व्याजदर ५ महिन्यांपूर्वी 11% होता)

४) शैक्षणिक कर्ज मर्यादा - 1 लाख

व्याजाचा दर - 9%

 ५)गृहकर्ज मर्यादा - 7.5 लाख

कर्जाचा व्याजदर  - 11.5%

६) स्पेशल कर्ज मर्यादा 3 लाख

  कर्जाचा व्याजदर - 11.75%


  सभासद बंधू भगिनींनो , सांगली शिक्षक बँक आपली कामधेनू असून ती टिकली पाहिजे , वाचली पाहिजे , वाढली पाहिजे पण सभासदांचे शोषण करून नव्हे तर सभासदांचे पोषण करून...वरील सर्व शिक्षक बँकांची तुलना करून आपली बँक व्याजदरांच्या बाबतीत किती मागे आहे ,हे आपल्या लक्षात येईल कारण जाहिरात फक्त 9.90 ची पण ते सोडून वास्तव आकडेवारी व व्याजदर आपल्यासमोर आहेत. (वरील आकडेवारीमध्ये आक्षेप असला तर संपर्क करावा , पुराव्यानिशी चर्चा करू🙏)


  सर्वसामान्य सभासदांचे आज सरासरी कर्ज 20 लाख रुपये असून या कर्जाचा व्याजदर किमान 1% कमी झाला (जो सहज शक्य आहे) तर वार्षिक 20 हजार रुपये व मासिक रु.1666 चा फायदा आज होऊ शकतो. फक्त इच्छाशक्ती पाहिजे.


मित्रांनो , वय कमी ,कदाचित अनुभवही कमी मात्र वास्तव परिस्थितीशी भिडण्याची इच्छाशक्ती मात्र तितकीच दुर्दम्य...अशक्य काहीच नाही...व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईत फक्त पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा..

येणाऱ्या निवडणूकीत सर्वसामान्य सभासदांच्या हितासाठी , सभासदांच्या स्वाभिमानासाठी 3 जुलै रोजी आपले अनमोल मत व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईत सार्थकी लावून आपणच आपला आधार होऊया

क्रमशः ....

🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻

आपलाच ,

  रमेश मगदूम ,तालुकाध्यक्ष

  महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन ,मिरज.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment