Wednesday, June 15, 2022

कमी व्याजदरात गृह कर्ज व शैक्षणिक कर्ज योजना राबवली जाणार...

 शिक्षक बँकेत व्यवस्था परिवर्तन म्हणजे नेमके काय होणार??

🖋️अमोल शिंदे 🖋️

स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळ सांगली

बदल छोटा...परिणाम मोठा...

          🎗️भाग क्रमांक 2🎗️

कमी व्याजदरात गृह कर्ज व शैक्षणिक कर्ज योजना राबवली जाणार...


सभासद बंधू भगिनींनो 🙏🙏

🌈🌈🌈🌈🌈🌈🌈

जिल्हाभरातील शिक्षक बंधू भगिनी यांच्याशी संवाद साधताना त्या सर्वाकडून कमी व्याजदरात गृह कर्ज व शैक्षणिक कर्ज योजना राबवण्याची मागणी होत आहे.

अनेक शिक्षकांची मुले वेगवेगळ्या  नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेत असतात...अशावेळी शैक्षणिक कर्ज सुलभ व कमी व्याजदरात मिळाल्यास सभासदांना मोठा लाभ होणार आहे.... तसेच शिक्षक बँकेच्या माध्यमातून सभासदांच्या भावी पिढीला मदत होवून शिक्षक बँक ही कामधेनू प्रमाणे आपल्या सोबत नेहमी असल्याची भावना वाढीस लागणार आहे.

शैक्षणिक कर्ज व गृहकर्ज योजना

कर्ज मर्यादा - 10 लाख

व्याजदर - 8 टक्के


इतर सर्व कर्जाच्या तुलनेत यांचा व्याजदर कमी असेल. अहमदनगर शिक्षक बँकेप्रमाणे *8 टक्के दरम्यान या कर्जाचा व्याजदर स्वाभिमानी ठेवणार आहे.तो कमीत कमी असावा यासाठी प्रयत्न असेल.तसेच सुरवातीला कर्ज मर्यादा 10 लाख रुपये ठेवण्याचा व तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेवून ही कर्ज योजना अधिक सुलभ करणार आहोत.*

या कर्जाच्या माध्यमातून इन्कम टॅक्स मध्ये ही सुटीस लाभ मिळेल.

सभासद हितासाठी सकारात्मक निर्णय घेण्यासाठी स्वाभिमानी मंडळास साथ देवू..... स्वाभिमानीच्या सर्व 21 उमेदवारांना आपले बहुमूल्य मत देवून सेवेची संधी द्यावी...🙏

आपले,

स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळ सांगली

सभासदांच्या हक्कासाठी..सभासदांच्या हितासाठी

केवळ भावनिक मुद्दे करून मते घ्यायची नाहीत तर धोरणात्मक सुधारणा करून सभासदांना न्याय देवू.....

No comments:

Post a Comment